केस गळतीवर मात करण्याचे उपाय

केस गळती ही समस्या बर्‍याच लोकांनी अनुभवलेली असते. ही मुख्यत: तेव्हाच निर्माण होते जेव्हा केसांच्या फोलीकलची वाढ थांबते आणि केस गळत राहतात . ह्या स्थितीला आलोपेशीया म्हणतात. असे म्हणतात की दिवसाला साधारणपणे 100 केस गळतात आणि ही अगदी सामान्य बाब आहे. नैसर्गिक केस गळती केसांच्या जीवन चक्रात घडून येते. ज्यात  केस वाढ होणे आणि वाढ थांबणे या अवस्थांमधून जातात. केसांच्या वाढीचा काळ साधारणपणे 2 ते 3 वर्षांचा असतो. या काळात केस दर महिन्याला सुमारे 1/2 इंच वाढतात. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना विपुल प्रमाणात केस गळण्याचा अनुभव येतो आणि ही अवस्था केस विरळ होणे किंवा टक्कल पडणे ह्यात परिवर्तीत होते.

केस गळतीचे प्रकार

पॅटर्न [नमूना असलेले] टक्कल -हे बहुमतांशी आनुवांशिक किंवा जनुकीय परंपरेने आलेले टक्कल असून अँड्रोजेनिक अलोपेशिया या नावाने प्रचलित आहे. हे टक्कल मोठ्या प्रमाणावर दिसते.  कारण प्रचंड केस गळतीनंतर शरीर नवीन केस उगविण्यास असमर्थ ठरते. हा प्रश्न स्त्रिया आणि पुरुष या दोघात सारख्याच प्रमाणात आढळतो. पुरुष नमुन्याच्या टक्कलामध्ये कमी होत जाणारी केसांची रेषा आणि डोक्यावर माथ्याभोवती विरळ होत जाणारे केस आणि नंतर केस विरहित डोके यांचा अंतर्भाव होतो. स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्री नमुन्याचे टक्कल निर्माण होऊ शकते. किंवा केस गळती होते जी बऱ्याच वेळा रजोनिवृत्ती नंतर दिसून येते.

अलोपेशिया आरेटा– बोडके चुट्टे,डोक्याची त्वचा, दाढी आणि कदाचित भुवया आणि पापण्यांवर सुद्धा दिसू लागतात. ह्याला ऑटोइम्युन डिसीज असे म्हणतात ज्यात रोग प्रतिकार शक्तीची यंत्रणा केसांच्या फॉलिकल वर हल्ला चढविते. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेवरचे केस तसेच इतर भागांवरचे केस गळतात. काही दुर्मिळ उदाहरणात डोक्यावरचे केस काही प्रमाणात किंवा संपूर्णपणे गळून गेल्याचे सुद्धा दिसून आले आहे.

टिनी कपिटिस  – ह्या प्रकारची केस गळती डोक्यावरच्या त्वचेला झालेल्या बुरशीच्या जंतु संसर्गामुळे होते. आणि यावर औषधोपचारांच्या सहायाने सहजपणे उपचार करता येतात.

हार्मोन्स मधील बदल -थायरोइड ग्रंथीच्या अति कार्यक्षमतेमुळे किंवा कमी कार्यक्षमता हेच केस गळतीचे एकमेव कारण असू शकते. ह्याच्यावर पण उपचार होऊ शकतो.

ट्राक्शन आलोपेशीया – अशा काही केशरचना आहेत ज्यात केस  प्रचंड प्रमाणात घट्ट ताणले जातात. परिणामी केसांचे फोलीकल गळून पडतात.

याशिवाय आणखी काही कारणाने सुद्धा केस गळतात जसे काही विशिष्ट

औषधोपचार,रोग,आणि आहार.

उपचार आणि औषधे -भिन्न प्रकारच्या केस गळतीच्या समस्यांवर यशस्वीरीत्या उपचार होऊ शकणारे असे काही परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. असे जरी असले तरी काही प्रकारच्या केस गळतीवर उपचार होऊ शकत नाहीत. आणि त्या [केस गळती] कायम स्वरुपाच्या असतात. केस गळतीच्या उपचारांमध्ये साधारणतः औषधोपचार,शस्त्रक्रिया, लेजर थेरपी, आणि गंगावन यांचा अंतर्भाव असतो. असे जरी असले तरी उत्कृष्ट परिणाम साधण्यासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम ठरेल या बाबत फक्त डॉक्टरच सुचवू शकतात. सरतेशेवटी उपचाराचे अंतिम ध्येय केसांची वाढ होणे व केस गळतीचे प्रमाण कमीत कमी करणे हे आहे.

औषधोपचार – जर केस गळती एखाद्या रोगामुळे असेल तर विशिष्ट उपचारपद्धती आवश्यक आहे. औषधोपचारात अशा औषधांचा समावेश असतो, ज्यामुळे दाह कमीत कमी केला जातो आणि प्रतिकार यंत्रणा नष्ट केली जाते. [पॅटर्न ]नमूना टक्कलाच्या उपचारासाठी औषधोपचार उपलब्ध आहेत. आणि FDA मान्यता प्राप्त औषधोपचार खालील प्रमाणे-

मिनोसीडील [रोगेन]हा एक विशिष्ट द्रव किंवा फेस आहे जो केसांची वाढ होण्यासाठी दिवसातून दोनदा डोक्याच्या त्वचेवर रगडावा लागतो. हा द्राव पुरुष किंवा स्त्री दोघंही वापरू शकतात. आणि काही लोकांना हा उपचार उपयुक्त ठरल्याचे वास्तव सापडले आहे. त्यांना कमी वेग असला तरी केसांच्या परत वाढीचा अनुभव येत असेल . या औषधोपचाराच्या वापराच्या 16व्या आठवड्यांनंतर सर्वोच्च परिणाम मिळू शकतो. कायमस्वरूपी फायद्यासाठी औषधोपचार बिलकुल थांबवू नये. दुष्परिणामामध्ये त्वचेला खाज येणे, नको असलेल्या केसांची चेहरा आणि हातांच्या आजूबाजूला त्वचेवर वाढ होणे यांचा अंतर्भाव होतो.

फिनास्तेरोइड [प्रोपेशिया]हे डॉक्टरांच्या [नेमून दिलेल्या औषधोपचारांच्या] यादी बरहुकूम मिळणारे औषध असून फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे. याचे फायदे सतत मिळण्यासाठी प्रत्येक दिवशी गोळ्या घ्याव्या लागतात. फिनास्तेरोइड च्या क्वचित आढळणार्‍या दुष्परिणामात,कमी होणारी लैंगिक संबंधाची इच्छा आणि कार्यक्षमता यांचा समावेश होतो. गरोदर स्त्रियांनी तुटलेल्या किंवा चुरा झालेल्या गोळ्यांना स्पर्शही करणे पूर्णपणे टाळले पाहिजे.

शस्त्रक्रियेची कार्य पद्धती -कायम स्वरुपाच्या केसगळतीवर जास्तीत जास्त परिणामकारक उपचार म्हणजे केशारोपण प्रक्रिया. केशारोपण ही पूर्वावस्था प्राप्त करण्यासाठीची सर्जिकल प्रक्रिया आहे, जिच्यामुळे टक्कलावर परिणामकारक उपचार होऊ शकतो. प्रक्रियेमध्ये डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर केसांचे रोपण केले जाते. सर्जन बहुधा डोक्याच्या मागील भागाचे किंवा दोन्ही बाजूंचे केस काढून टकलाच्या भागावर किंवा केस विरळ झालेल्या भागावर रोपण करतात. ही प्रक्रिया खास करून लोकल भुलीच्या अमलाखाली बाह्य रूग्ण पातळीवर केली जाते. केशारोपण प्रक्रिया दोन तर्‍हेने करता येते. एक स्लीट ग्राफ्ट आणि दुसरी मायक्रोग्राफ्ट.स्लीटग्राफ्टमध्ये साधारणपणे प्रत्येक ग्राफ्टमध्ये 4 ते 10 केस असतात. तर मायक्रो ग्राफ्ट मध्ये 2 केस असतात. उपटून काढलेल्या ग्राफ्ट ची संख्या सामन्यात: विरळ झालेले केस किंवा टक्कल असलेल्या भागाच्या क्षेत्रावर अवलंबून असते. केशारोपण प्रक्रिया ही विशेषेकरून एक सर्जिकल प्रक्रिया आहे. परंतु यात कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. किंवा वेळ वाया जात नाही. या प्रक्रियेनंतर 1 दिवसानी रूग्ण आपली दैनंदिन कामे सुरू करू शकतो.