टकलेपणाची प्राथमिक लक्षणे

केस गळती आणि टकलेपणाचे वैशिष्ट्य असे आहे की ते आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कोणालाही होऊ शकते. टकलेपण हे केस गळतीपेक्षा खूप वेगळे असते आणि काही लक्षणे असतात ज्यांच्यावर टकलेपणाची प्राथमिक लक्षणे शोधण्यासाठी लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते. टकलेपणा हा पुरुष आणि स्त्रिया या दोन्हींमध्ये सामान्य असतो आणि तो मानसिक ताण, प्रदूषण, अनुवंशिकता, स्काल्पवर जंतुसंसर्ग, धुम्रपान आणि इतर विविध कारणांमुळे होतो. पण महत्त्वाचे असे की टकलेपणाच्या प्राथमिक लक्षणांकडे बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे, कारण टकलेपण एका रात्रीतून नाही येत. टकलेपणा शक्यतो मेल पॅटर्न बाल्ड्नेस आणि फिमेल पॅटर्न बाल्ड्नेस यांमध्ये विभागला जातो.

Also Read: What is hormonal hair fall and is there any way to stop it?

पुरुषांमध्ये केस गळती

पुरुषांमध्ये केस गळती बहुतेक वेळा पुढील भागात होते, कपाळाच्या जवळ आणि डोक्यावर.  हे एक उघड-उघड (स्पष्ट) लक्षण आहे ज्याच्या बद्दल लोकांनी जागरूक असले पाहिजे. दुसरे सामान्य लक्षण म्हणजे कमी होत असलेली हेयर लाईन किंवा विडोव्स पीक जिथे केस गळती हळुवार वेगाने होते आणि काय होत आहे ते समजायला वेळ लागू शकतो. सर्वात चांगली युक्ती म्हणजे केस गळतीच्या वेगवेगळ्या स्थितींची त्या-त्या वेळेस छायाचित्रे काढून त्यांची तुलना करणे. याने लोकांना या परिस्थितीची जाणीव आधीच व्हायला मदत होते आणि ते उशीर व्हायच्या आत काही प्रतिबंधक उपाय तरी करू शकतात. काही  प्रमुख आणि सुरवातीची लक्षणे आधीच कळू शकतात, जेव्हा आरशात  बघितल्यावर कपाळावरचे केस विरळ आणि छोटे दिसू लागतात.

हो, विरळ होणारे केस सुद्धा टकलेपणाच्या सुरवातीचे लक्षण म्हणून मानले जाऊ शकते. पण केस गळती तेव्हाच दिसून येते जेव्हा काही ठिकाणी केस परत उगवत नाहीत, आणि कुठलीही केस गळती स्पष्टपणे कळत नाही. केस विरळ होणे सुद्धा दिसते जेव्हा केस आणखी बारीक आणि बारीक होत जातात जे हेयर फॉलिकलच्या आकुंचन पावण्यामुळे होते. हेयर पार्टिशन मध्ये विस्तार होणे हे सुद्धा एक लक्षण आहे, विशेषतः जर वाढत्या फटीमुळे आणखी स्काल्प दिसायला लागले असेल, कारण ते थेट केस गळतीकडे किंवा अखेर माथ्यावर टकलेपणा कडे जाते. म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाचे आहे की या टकलेपणाच्या सुरवातीच्या लक्षणांवर बारीक नजर ठेवली पाहिजे आणि या समस्यांवर वेळीच उपाय केला पाहिजे.

तरीपण मेल पॅटर्न बाल्ड्नेस ही एक सामान्य स्थिती सुद्धा आहे जी दोन चातुर्थौंश पेक्षा जास्त पुरुष अनुभवतात. बऱ्याचशा प्रकारांमध्ये मेल पॅटर्न बाल्ड्नेस किंवा अँड्रोजेनिक ऍलोपेशिया ही अनुवांशिकतेवर ठरवली जाणारी परिस्थिती आहे जी कुठल्याही वयात चालू होऊ शकते. अँड्रोजेनिक ऍलोपेशिया DHT हॉर्मोनच्या वाढलेल्या पातळीमुळे होतो जे टेस्टोस्टेरोन हॉर्मोन आणि रक्तामधील ५-अल्फा-रिडक्टेज नावाच्या एन्झाइमशी परस्पर क्रिया होऊन निर्माण होते.

Also Read: Best Hair Loss Prevention Tips in 2018 For Teenagers

स्त्रियांमध्ये केस गळती

केवळ केस विरळ होणे हे स्त्रियांमधील फिमेल पॅटर्न बाल्ड्नेसचे सर्वात सामान्य लक्षण असते. पुरुषांसारखे स्त्रियांना कमी होणाऱ्या हेयरलाईनचा अनुभव येत नाही आणि ज्या थोड्याश्या प्रकरणांमध्ये हे सापडते तिथे त्या स्त्रीला पूर्ण पणे टक्कल पडते. स्त्रियांच्या केस गळतीमध्ये पूर्ण स्काल्प्वरील, विशेषतः कपाळाच्या ठिकाणी केस विरळ होणे ह्या प्रक्रियेचा समावेश असतो. स्त्रियांचे केस पुरुषांपेक्षा लांब असल्या कारणाने टकलेपणाच्या सुरुवातीची लक्षणे नजरेत येण्यास फार कठीण जाते. या समस्येचे मुल्यांकन करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे हेयरब्रश, उशांची कव्हरे आणि हेयर बँड यांच्यावर कडक नजर ठेवणे आणि किती केस गळत आहेत याचा अंदाज घेणे. अति आणि अनियंत्रित केस गळती टकलेपणा किंवा किमान केसांमध्ये फटी पडण्यास कारणीभूत ठरू शकतो. म्हणूण अशा लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि वेळीच अशा समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टकलेपणाची सुरवातीची लक्षणे दिसू लागल्यास काय करावे

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त गळत आहेत, तर सर्वप्रथम त्या रुग्णाने एक विख्यात डर्मॅटॉलॉजिस्ट शोधला पाहिजे जो उत्तमातील उत्तम उपाय करावयाचा सल्ला देऊ शकेल जे पुरुषांना आणि स्त्रियांना केस वाढीमध्ये एक उत्तेजन अनुभवण्यास मदत करेल. केस गळती ही एक अंदाज न येणारी स्थिती आहे जी अगणित कारणांमुळे होऊ शकते. तर सहाजिकच आहे की प्रत्येक रुग्णाची स्थिती सुधारण्याची प्रक्रिया एकमेकांपेक्षा वेगळी असणार. एक अनुभवी सर्जनच आपल्या रुग्णाला त्याची विशिष्ठ स्थिती सुधारण्यास उत्तमातील उत्तम अनुरूप असा उपचार, जो केस गळतीवर प्रत्यक्षात उच्चतम यशस्वी उपचार पुरवू शकतो.