या वर्षीच्या केस गळती प्रतिबंधाच्या सर्वोत्तम टिपा

वाढत्या प्रदूषणासह आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील  विषारीपणा  मुळे आपण विषारी श्वासोच्छवास करत असतो आणि बघावं तर बरे पण होत असतो. पण केसांच्या झालेल्या हानी बद्दल काय? होय, आपली त्वचा आणि शरीरासारख्याच आपल्या केसांना पण वातावरणातील प्रदूषण, स्ट्रेस, चिंता, केशभूषा यांसारख्या यातनामय शृंखलेतून जावे लागते, कलप सहन करावा लागतो, आणि ह्याचा शेवट केसांची हानी होण्यात होतो. तेंव्हा अशा तऱ्हेनं केसांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान कुठल्याही वयाच्या स्त्री पुरुषांमध्ये केस गळतीची गंभीर समस्या होऊ शकते.

अर्थात, केस गळती ही फक्त अशा कारणांमुळेच उद्भवत नाही, परंतु अशी असंख्य कारणे आहेत ज्यांच्यामुळे केसांच्या गळतीची गंभीर समस्या उद्भवते. त्वचाविकारतज्ञाच्या मते संप्रेरकात असंतुलन(हार्मोनल इनबॅलन्स), अनारोग्यपूर्ण जीवनशैली,तेलकट पदार्थ,हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर केसांच्या गळतीवर परिणाम करते. त्यामुळे केस गळती एक प्रचंड समस्या आहे जी तातडीने सोडविण्याची गरज आहे. म्हणून आपले लक्ष्य असे असावे की ह्या परिस्थितीवर मात करून  बऱ्याच केसांच्या गळतीच्या समस्यांवर सुलभतेने आणि घरगुती अशा सर्वोत्तम उपायांच्या मालिकेच्या मदतीने केस गळतीच्या प्रक्रिया उलट फिरविणे.

Also Read: What is hormonal hair fall and is there any way to stop it?

केसांवर घरगुती उपचार करणे

 • ज्यांना कमी प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात केस गळती आहे अशांसाठी तेलांचा मसाज हा एक खरोखर उत्तम उपाय आहे. ऑलिव्ह, खोबरेल तेल अशा तेलानी स्काल्पला मसाज केल्याने स्काल्पला रक्त प्रवाह मिळतो आणि तो हेयर फॉलिकल्सना  उत्तेजन देतो.
 • काही लोकांच्या मते, अंड्याचे तेल जे कोंडा घालविण्याचा आणि केसांना मऊ बनविण्याचा दावा करतात, ते सुद्धा तितकेच परिणामकारक आहे.
 • गरम तेलाचे उपचार ही सुद्धा हेयर फॉलिकल्सच्या वाढीस उत्तेजना देण्यास आणि मऊ करण्यास तितकीच परिणामकारक प्रक्रिया आहे.
 • मेंदीचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्यामुळे केस बळकट आणि आरोग्य पूर्ण बनतात. आणखी एक म्हणजे मेंदीमुळे केसांना रंग येतो. म्हणून केसांना हानिकारक रासायनिक कलप लावण्यापेक्षा लोक मेंदीचा उपयोग केसांना स्टाईल देण्यास व पांढरे केस लपविण्यास करू शकतात.
 • बरेच लोक सुचवितात की ग्रीन टी त्याच्यातील अँटी टॉक्सिडन्टमुळे केसांना निरोगी आणि चमकदार बनवतात. खरे म्हणजे ही अँटी टॉक्सिडन्ट केस गळणे थांबवतात आणि वाढीस मदत करतात.
 • मेथीचे दाणे सुद्धा हेयर फॉलिकल साठी चांगले आहेत असे आढळून आले आहे. आणि त्याच्या योग्य अशा नियमित वापराने केसांची चमक आणि बळकटी वाढते असा दावा करतात.
 • केसांचा लेप हा केसांना निरोगी ठेवण्यास आणि केस गळण्याचे थांबवण्यास उत्कृष्ट पर्याय आहे. असे म्हणतात की कोरफड आणि कडुलिंबाची पेस्ट यांचा लेप लावल्यास ती  स्काल्प कडे रक्त प्रवाह वाढविते. ही फक्त सर्वसामान्य केसांची वाढ करीत नाही तर स्काल्पला  ओलसर ठेवून त्याला निरोगी बनवते. अव्हाकडो हेयर मास्क मध्ये अंड्याचा बलक आणि मध ह्यांचे मिश्रण असते, जो एक केसांना बळकटी देणारा मास्क आहे.

Also Read: Is Excess Protein Bad for Your Hair?

जीवनशैलीत बदल घडविणे 

 • आरोग्यास घातक जीवनशैलीमुळे केसांच्या गळतीची समस्या उद्भवते. म्हणून काही डर्मॅटॉलॉजिस्ट च्या मते, आपल्या आहारात थोडे प्रोटीन युक्त खाद्य आणि भाज्यांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. विटामीन आणि प्रोटीन शरीराला अतिशय महत्वाचे असतात कारण ते शरीर आणि केस दोन्हीच्या एकूणच चांगल्या आरोग्याचे पोषण करते.  काही प्रोटीन बरोबरच विटामीन B-12 आणि Omega -3 फॅटी ऍसिडस हे सुद्धा निरोगी केस मिळविण्यासाठी तितकेच प्रभावी असतात.
 • लोकांनी सल्फेट फ्री शाम्पू वापरणे टाळावे कारण ते हेयर फॉलिकल ला जास्त स्वच्छ करीत नाही. ज्या केसांमध्ये नैसर्गिक तेलाची कमतरता आढळते ते सामन्यात: कोरडे,रूक्ष आणि केशरचना करण्यास अवघड असतात.
 • काही वेळा केस गळण्याचे मूळ कारण ताण/तणाव असते. म्हणून आपल्या आयुष्यातून ताण/तणाव कमी केल्यास हार्मोनल इनबॅलन्स पण परत जागेवर येऊ शकतो. ध्यान आणि व्यायाम हे सुद्धा आपल्या आयुष्यातील ताण/तणाव दूर करण्यास मदत करतात.
 • केस गळण्याचे आणखी एक सामान्य कारण म्हणजे सिगारेट ओढणे, जे आरोग्यावर जमेल त्या मार्गाने नकारात्मक परिणाम करतात. आणि ह्यामध्ये श्वसनाच्या आणि हृदया संबंधी समस्या आणि रोगांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त धूम्रपान हे केस गळतीला आणि पांढरे होण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकते. म्हणून धूम्रपान कायमचे सोडणे हा एक सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो.

आता जर यापैकी एकाही गोष्टीचा समाधान कारक परिणाम मिळाला नाही तर सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे एखाद्या अनुभवी डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे.फक्त अनुभवी डर्माटॉलॉजिस्टच पेशंटच्या शारीरिक अवस्थेचे विश्लेषण करू शकतो की पेशंटला अनुभवायला लागलेल्या केस गळतीचे नक्की कारण काय आहे आणि त्याचे सर्वात जास्त योग्य रीतीने निराकरण करण्याचा प्रयत्न करतो.