४ खाण्याचे पदार्थ ज्यांमुळे केस गळती होऊ शकते

केस गळती बद्दल काहीच अंदाज करता येत नाही. आणि ती विविध कारणांमुळे होऊ शकते. केस गळण्याचे नेमके कारण फक्त एक व्यावसायिक त्वचाशास्त्रज्ञाद्वारे निदान केले जाऊ शकते. काही त्वचेच्या शास्त्रज्ञांच्या मते, पोषण ही केस गळून पडण्याची मुख्य समस्या आहे. जेव्हा अनियंत्रित खाण्याच्या पद्धती आणि केस गळून पडणे हे एकत्रित दिसून येते, तेव्हा ही अतिशय स्पष्ट गोष्ट आहे की आपण जे पदार्थ घेत आहात ते केसांना नुकसानकारक आहेत आणि त्यामुळे ते पदार्थ घेण्याचे बंद करणे आवश्यक आहे. हे अगदी खरे आहे कि काही अन्न पदार्थांपासून लांब राहणेच उत्तम आहे, कारण त्यांच्यामुळे हेयरलाईनवर प्रभावशाली असणाऱ्या पदार्थांचे प्राशन कमी होते आणि केस गळतीच्या आगमनाला सुरुवात होऊ शकते.

Also Read: What is hormonal hair fall and is there any way to stop it?

हे पदार्थ न खाण्यामागील करणे

पहिला आणि सर्वात मोठा नियम असा आहे की जे पदार्थ विलंबित ऍलर्जिक प्रक्रियेस कारणीभूत होऊ शकतात असे पदार्थ टाळणे हेच आहे. हे पदार्थ शेंगदाणे आणि कवच असलेले जलचर प्राणी यांच्या सारखेच असतात, ज्यांच्यामुळे काही लोकांना त्वरित ऍलर्जिक प्रक्रियेचा अनुभव येतो. वाढीव प्रतिरक्षित प्रतिसादामुळे देखील काही लोकांना विलंबित ऍलर्जिक प्रक्रियेचा अनुभव येऊ शकतो. हे सुद्धा हेयर फॉलिकलना रक्ताचा पुरवठा कमी होऊन केस गळतीच्या रुपात परिणामकारक होऊ शकते.

काही लोक अल्कधर्मी आणि अम्लीय पदार्थांसाठी काही ठराविक नियम वापरून समस्या अनुभवतात. ध्येय असे आहे कि आम्लधर्मी पदार्थ घेणे कमी करून अल्कली पदार्थांचे प्राशन वाढविले पाहिजे, जे केस गळतीच्या प्रक्रियेला उलट करून केस वाढण्याकडे वळवेल.

Also Read: Is Excess Protein Bad for Your Hair?

केस गळतीला प्रवृत्त करणारे खाद्य पदार्थ

  • साखर – केस गळतीसाठी साखर जबाबदार असल्याचे असे कुठले ठराविक कारण नाही, पण काही तज्ञांच्या मताप्रमाणे साखरेच्या अति उपभोगामुळे स्काल्पवर सूज येऊ शकते. साखरच नव्हे, तर काही इतर खाद्य पदार्थ, जसे कार्बोहायड्रेट, बटाटे, ब्रेड, पांढरे तांदूळ आणि पास्ता यामध्ये खूप जास्त प्रमाणावर ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे अगदी सहज साखरेच्या घटकांमध्ये विघटित होतात आणि तसाच परिणाम देतात. त्याच बरोबर साखर ही इन्सुलिन आणि अँड्रोजेन नावाचे पुरुषांचे हार्मोन्स तयार करतात जे हेयर फॉलिकलना निमुळते बनवतात आणि केस गळतीला कारणीभूत ठरतात. खरं तर, तृणधान्यामधील साखरेचे प्रमाण रक्तातील साखरेच्या पातळीला वाढवू शकते, ज्यामुळे मेल पॅटर्न बाल्ड्नेसच्या सर्वप्रथम टप्प्याची सुरवात होऊ शकते.
  • तळलेले पदार्थ- तळलेले पदार्थ स्वादिष्ट असू शकतात, पण ते केसांनाच नव्हे तर सर्वतः शारीरिक आरोग्यास सुद्धा हानिकारक असतात. अधिक चरबीयुक्त आहार टेस्टोस्टेरोन चे प्रमाण वाढण्यास प्रवृत्त करू शकते ज्यामुळे मेल पॅटर्न बाल्ड्नेसचे आगमन होऊ शकते. तळलेले पदार्थ प्रत्यक्ष रक्तवाहिन्यांना बुजवून ठेवतात आणि स्काल्पवर तेलकट कातडी होण्यास सुद्धा जबाबदार असतात. या स्थितीमुळे हेयर फॉलिकलचे आकुंचन होते जे मर्यादित रक्त पुरवठ्याला आणि घर्म रंघ्रांच्या बुजण्यास कारणीभूत असते. एक चांगला शाम्पू मात्र का तेलकटपण धुवून टाकण्यास मदत करतो आणि स्काल्पला नवीन केसांसाठी तयार करतो.
  • सेलेनियम, मर्क्युरीयुक्त मासे, अधिक विटामीन ए असणारे खाद्य पदार्थ – सेलेनियम हे एक दुसरे खाद्यपदार्थ आहे ज्याचे अधिक प्रमाणात प्राशन केस गळतीला जबाबदार असते. आपल्या शरीराला या क्षाराची अति सूक्ष्म पातळीवरच गरज असते, आणि त्यापेक्षा जास्त प्रमाणावर ते घेतल्यास केस गळतीची समस्या चालू होते. ब्राझील नट, ट्युना मासा आणि ऑयस्टर ह्यांच्या शरीरात सेलेनियम चे भरपूर साठे असतात. काही डर्मॅटॉलॉजिस्ट यांनी शोधून काढले आहे की ट्युना आणि मॅकेरेल सारखे मासे, ज्यांमध्ये मर्क्युरी चे प्रमाण खूप जास्त असते, ते केस गळतीला जबाबदार असू शकतात, कारण त्या माशामधील मर्क्युरी हे मिथाइलमर्क्युरी मध्ये रूपांतरित होते जो शरीरातील एक विषारी घटक असतो. त्याच बरोबर, मल्टीविटामिन मध्ये काही विटामीन ए शक्यतो केसांच्या आरोग्यास तडजोड नाही करत, पण जास्त विटामीन घेतल्याने केसांवर प्रतिकूल परिणाम होतो आणि केस गळतीची सुरुवात होऊ शकते.
  • ऍस्पार्टेम- हा एक घटक आहे जो आर्टिफिशल स्वीटनर म्हणून वापरला जातो, आणि तो केसांच्या विरळ होण्यास निश्चितच संबंधित आहे. डायट सोड्यामधील हा एक सामान्य घटक आहे. डायट शुगरच नव्हे, तर कुठलेही कार्बोनेटेड शीत पेय अतिशय आम्लधर्मी असते आणि केस गळतीसाठी जबाबदार असते. इन्सुलिनची संवेदनशीलता, ज्यामुळे रक्तात साखरेच्या पातळीचा अतिरेक होतो, प्राथमिक मेल पॅटर्न बाल्ड्नेसला उकसवते याचा अगदी ठोस पुरावा आहे. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे की केस गळती आणि विरळपणा ह्या क्रियांना उलटवण्यासाठी अशा आहार पद्धतींपासून लांब राहावे.