आयुष्य बदलून टाकणारा गायनॅकोमास्टिया मेक-ओवर

गायनॅकोमास्टिया हा एक पुरुषांना होणारा रोग आहे ज्यामध्ये त्यांची छाती अतिप्रमाणात विकसित होते आणि स्त्रियांच्या वक्षस्थळांसारखी दिसते. हा स्तनांच्या पेशींच्या संग्रहाची अति प्रमाणात वाढ म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो जो विशेषतः घट्ट, स्पष्ट किंवा लवचिक पेशींचा संग्रह म्हणून प्रस्तुत करतो  , जो स्तनाग्राच्या भोवती बाह्य दिशेने समक्रमितपणे पसरत जातो.

सूक्ष्म विश्लेषण अंतर्गत ही पुरुषस्तनग्रंथीच्या वाढीची एक सौम्य स्थिति आहे. दोन्ही स्तनांमध्ये हे सममितरित्या दिसून येते. गायनॅकोमास्टिया हा माणसांमध्ये संप्रेरकांचा असमतोलामुळे होतो, आणि ज्यामध्ये इस्ट्रोजेनच्या अती प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे इस्ट्रोजेन स्रावाचे वर्चस्व किंवा कमी प्रमाणात होणाऱ्या ऍंड्रोजेनिक संप्रेरक संश्लेषण असते. इस्ट्रोजेन हा एक महत्त्वाचा संप्रेरक आहे जो स्तनांच्या उतींची जलद वाढ होण्यास प्रेरित करतो ,याव्यतिरिक्त तो स्तनांच्या नलिकेमध्ये विकास घडविण्यास कारणीभूत  असतो, ज्यामुळे त्यांची विस्तृत वाढ आणि फैलाव होते. इस्ट्रोजेन स्तनांच्या उतींची अस्थिरता सुद्धा वाढविते. हा हार्मोन चा असमतोल बऱ्याच कारणांमुळे होतो जसे इस्ट्रोजेनिक औषधोपचार यौवनावस्था,किडनी चे आजार, लिव्हर चे आजार, हायपरथायरॉईडीझम, ट्यूमर,जे इस्ट्रोजेन चे आणि प्रोलाक्तीन चे उत्पादन करतात. कांही वेळा हे इस्त्रोजेनच्या संश्लेषणासाठी महत्वाचे असलेले ऍरोमॅटेज नावाच्या एंझाइमच्या वाढलेल्या कार्यशिलतेमुळे सुद्धा होते.

Read More : Gynecomastia How to Know About It

गायनॅकोमास्टिया जरी एक वैद्यकीय परिस्थिती आहे, तरी डळमळीत स्वाभिमान यासारख्या मानसिक समस्या उद्भवण्याचे हे एक स्वाभाविक कारण आहे, ज्याचे खराब झालेले आरोग्य, सामाजिक क्रिया आणि मानसिक स्वास्थ्य यांमध्ये विश्लेषण होते. हा रोग बरा करणे हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेचे असते. पुरुषी स्तनांचा आकार कमी करायचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे लिपोसक्शन ज्यात चरबीचा साठा बाहेर शोषून काढण्यासाठी स्तनामध्ये एक छोटे भोक पाडले जाते. दुसरा उपाय म्हणजे स्तनाग्राच्या भोवती छोटे भोक पडले जाते आणि अतिरिक्त स्तनांच्या पेशींचे संग्रह काढून टाकले जातात.

ही त्या लोकांसाठी  खुष खबर आहे जे ह्या परिस्थितीमुळे त्रस्त असतात, हो, तुम्ही हे ‘मॅन बूब्स’ पासून पूर्णपणे सुटका करून घेऊ शकता, जसे काही तुम्हाला ते आधी नव्हतेच मुळी. आणि उत्तर आहे लिपो सक्शन.

लिपोसक्शन लिपो असे सुद्धा म्हणतात. ही एक अशा प्रकारची कॉस्मेटिक प्रक्रिया आहे जी शरीरातून चरबी काढून टाकते आणि जी सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रसिद्ध कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये एक आहे. लिपोसक्शन शस्त्रक्रिया तुमच्या शरीरावर शिल्पकाम करते, ज्यामुळे व्यायाम आणि आहार यांना विरोध करणारे चरबीचे साठे नेस्तनाबूत करते. इच्छित आकार मिळवण्यासाठी लिपोसक्शन इतर तंत्रांसोबत संयुक्त करून वापरली जाते. या तंत्राद्वारे तुम्ही त्या नको असलेल्या अतिरिक्त चरबीपासून सुटका मिळवू शकता आणि जास्त परिभाषा असणारे इच्छित शरीर मिळवू शकता.

लिपोसक्शन शस्त्रक्रियेमध्ये चरबी एक पोकळ नळी, ज्याला कॅन्युला म्हणतात आणि ऍस्पिरेटर नावाच्या सक्शन यंत्रातून काढली जाते. इंजेक्शनचे प्रमाण आणि कॅन्युलाची काम करण्याची यंत्रणा यांप्रमाणे लिपोसक्शनच्या पद्धती विभागल्या जातात. सर्वात आधी रक्तस्राव आणि आघात कमी करण्यासाठी पातळ स्थानिक ऍनेस्थेशिया दिला जातो. मग अतिरिक्त चरबी सैल करण्यासाठी एक कॅन्युला भोकांमधून घुसवून नियंत्रित पुढे-मागे करण्याच्या हालचालीचा वापर केला जातो. त्यानंतर, विस्थापित चरबी शरीरातून सर्जिकल व्हॅक्युम किंवा कॅन्युलाला जोडलेल्या सिरींजच्या सहाय्याने बाहेर शोषून काढली जाते.

Read More :  Can Gynecomastia be Reduced by Exercise?

शस्त्रक्रियेनंतर, तुम्हाला लवकरच तुमच्या शरीरात बदल घडलेला दिसेल आणि तुम्ही नको असणारे मुब्स किंवा  ‘ मॅन बूब्स पासून कायमची मुक्ति मिळवू शकाल. हा गायनॅकोमास्टिया मेक-ओवर तुमच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा असेल हे नक्कीच. लिपोसक्शन शस्त्रक्रियेच्या परिणामांमध्ये मजबूत , घट्ट छाती, जी बऱ्याच जणांना जास्त पुरुषी वाटते, वाढीव आत्मविश्वास आणि आणखी चांगली स्वतःची प्रतिमा यांचा समावेश असतो.

बरं हेही महत्त्वाचे असते की, तुम्ही तुमच्या सर्जनने दिलेल्या काळजी घेण्याच्या सूचना कटाक्षाने पाळाव्यात. यामध्ये कम्प्रेशन गारमेंट घालण्याचे ज्ञान, विहित केलेल्या अँटीबायॉटिक घेणे , आणि सुरक्षित मात्रांमध्ये हालचाल यांचा समावेश असतो. तुमच्या डॉक्टरने तुम्हाला साधारण लक्षणे किंवा काही संभाव्य गुंतागुंत याबद्दल सुद्धा तपशीलवार मार्गदर्शन दिले पाहिजे. प्रत्येक माणसाला बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो हे समजणे ही फार महत्त्वाचे आहे. लिपोसक्शन शस्त्रक्रियेचे परिणाम कायमस्वरूपी असतात कारण चरबीयुक्त पेशीच काढून टाकण्यात येतात. तुमची छाती एकदम सपाट होईल आणि यापुढे तुम्हाला शर्ट काढायला कधीच लाज वाटणार नाही. या लिपोसक्शन तंत्रज्ञानाने आयुष्य बदलून टाकणाऱ्या फायद्यांमध्ये मर्दानी दिसणारी शरीरयष्टी, आत्मविश्वासाला उत्तेजन, व्यवस्थित बसणारे कपडे, वाढीव सक्रिय जीवनशैली, सुधारित पवित्रा, इत्यादी समाविष्ट आहेत. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही परत एकदा अगदी सामान्य जीवन जगू शकता.