हेयर ट्रांस्प्लांट बद्दल सर्व काही

केस गळती मध्ये काहीच नवीन नाहीये, पण जर तुमची केस गळती लवकर सुरु झाली तर? हेयर ट्रांस्प्लांट सर्जरी हा एक असा चमत्कार आहे की जो तुम्हाला मानखंडने पासून वाचवतो आणि तुम्हाला नैसर्गिक केसांसारखेच नवीन केस उगवण्याचे वरदान देतो.

ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की ज्यामध्ये शरीराच्या एका भागावरून केस काढले जातात आणि जिथे टक्कल पडले असते तिथे ट्रांस्प्लांट केले जातात. जिथून केस काढले जातात त्या भागाला डोनर साईट म्हणतात आणि जिथे केस ट्रांस्प्लांट केले जातात त्या भागाला रेसिपियंट साईट म्हणतात.

हेयर ट्रांसप्लांट सर्जरी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे स्लिट ग्राफ्ट आणि दुसरे आहे मायक्रोग्राफ्ट. डॉक्टर क्षेत्राच्या  गरजेनुसार स्लीट ग्राफ्ट मध्ये प्रत्येक ग्राफ्ट मध्ये २ ते १० केस प्लांट करतात, आणि मायक्रोग्राफ्ट मध्ये प्रत्येक ग्राफ्ट साठी १ ते २ केस प्लांट केले जातात.

काही अशी माणसे असतात ज्यांना हेयर ट्रान्सप्लांटची गरज असते . पुरुष ज्यांना पॅटर्न बाल्ड्नेस असतो, स्त्रिया ज्यांचे केस विरळ होत असतात, आणि कोणी पण ज्यांचे केस भाजण्याने किंवा स्काल्पला इजा झाल्यामुळे गळाले आहेत अशा लोकांनी ही हेयर ट्रांस्प्लांट सर्जरी करून घेण्याचा प्रयत्न करावा. पण असे काही लोक आहेत ज्यांनी ही सर्जरी करून घेण्याचा प्रयत्न करू नये. स्त्रिया ज्यांना पूर्ण स्काल्प वर विस्तृत प्रमाणावर केस गळती असते, काही लोक ज्यांच्याकडे डोनर साईटचे प्रमाण कमी असते, ज्या लोकांना प्रत्येक सर्जरी नंतर केलॉइड स्कार (जाड, तंतुमय चट्टे) होण्याची प्रवृत्ती असते, आणि ज्या लोकांना औषधोपचारामुळे केस गळती होते अशा लोकांनी या सर्जरी पासून दूर राहिले पाहिजे.

Also Read: Best Hair Loss Prevention Tips in 2018 For Teenagers

ही प्रक्रिया फार साधी आहे आणि यामध्ये काही एकदम मुलभूत गोष्ठी आहेत. ह्या आहेत त्या गोष्ठी:

 • सर्वात आधी डोक्याच्या मागच्या भागाचे हेयर फॉलिकल काढले जातात आणि पुढच्या भागात जिथे टक्कल आहे तिथे प्लांट केले जातात.
 • सर्जरी करण्याअगोदर डोनर साईटचे केस कापून छोटे केले जातात.
 • यानंतर डोनर साईटवर ऍनेस्थेशिया दिला जातो.
 • डोनर भागातील पेशींचे संग्रह, जे टक्कल पडण्यास प्रतिरोधक आहेत त्यांना ठरवले जाते, मग ते शस्त्रक्रिया करून काढले जातात आणि शेवटी डोनर भागावर टाके शिवले जातात .
 • टाके शिवलेल्या भागावर केस विंचरले जातात म्हणजे टाके दिसत नाहीत. शस्त्रक्रियेच्या १० दिवसांनंतर हे टाके काढले जातात.
 • रुग्णाला स्थानिक ऍनेस्थेशिया दिल्यानंतर, रेसिपियंट भाग ट्रांस्प्लांट प्रक्रियेसाठी तयार केला जातो. या भागात केस कापण्याची किंवा काढण्याची गरज नसते.
 • रेसिपियंट भागामध्ये अनियमित रित्या पडलेल्या इंसिजनमध्ये फॉलिक्युलर युनिट ग्राफ्ट बसवले जातात.
 • छोटे ग्राफ्ट हेयरलाईनच्या पुढील भागात बसवले जातात आणि घनदाट ग्राफ्त त्यांच्या मागे बसवले जातात.
 • सर्जरी झाल्यानंतर ही हे इंसिजन अगदी स्पष्ट दिसतात.
 • शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही आठवड्यांनी, हे इंसिजन बरे होतात आणि लाल रंगाचे चट्टे नैसर्गिक रित्या गायब होतात आणि हे सर्व अगदी नैसर्गिक दिसते.

Also Read: What is hormonal hair fall and is there any way to stop it?

ही शस्त्रक्रिया उत्तम आहे ही वस्तुस्थिती असली, तरी ही याबद्दल काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे:

 • शस्त्रक्रिया झाल्यानंतर २ ते ४ आठवड्यांनी केस परत उगवायला लागतात.
 • स्थानिक ऍनेस्थेशिया ही प्रक्रिया एकदम वेदनारहित बनवतो आणि म्हणून रुग्णाला त्याच दिवशी घरी पाठविण्यात येते.
 • हेयर ट्रांस्प्लांट ही नॉन-सर्जिकल हेयर रिस्टोरेशन प्रक्रिया नाही ज्यामध्ये स्काल्पवर आधीच निवडलेला बेस ठरविला जातो.
 • ही नॉन-सर्जिकल हेयर रीस्टोरेशनपेक्षा वेगळी आहे कारण त्या मध्ये स्काल्पवर आधीच निवडलेला बेस ठरविला जातो.
 • हेयर ट्रांस्प्लांटचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला वेवी केस मिळतील, कारण याचा निकाल व्यक्ती-व्यक्ती मध्ये वेगळा असतो आणि त्यांच्या नैसर्गिक केसांवर अवलंबून असतो.
 • ग्राफ्टचे जास्त अंक किंमत वाढवितात.

आता तुम्हाला तुमच्या गळलेल्या केसांसाठी पर्याय मिळाला आहे आणि आता तुम्ही सर्वांसमोर लांच्छनास्पद स्थिती पासून वाचवले जाऊ शकता. पूर्ववत केसांसारखे अगदी नैसर्गिक दिसणार्‍या पूर्णपणे नवीन केसांसोबत आयुष्यातील ह्या अद्भुत प्रवासाचा अनुभव घ्या.