बॉलिवूड चे अभिनेते आणि हेयर ट्रान्सप्लांट
केस गाळणे हे अगदी नैसर्गिक आहे आणि कधी कधी ते वाढत्या वयामुळेच होते असेही नाही. वयस्कर लोकांपासून ते तरुण वयापर्यंत, अगदी षोडस वर्षांच्या मुलामुलींना सुद्धा केस गळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. बरेच वेळा केस गळणे हे आनुवांशिक असते, पण काही असे पण घटक आहेत जे केस गळण्याला आणि टक्कल पडण्याला कारणीभूत असतात. ह्या कारणांमध्ये शारीरिक आणि भावनात्मक ताण तणाव, अँटिडिप्रेसंटचा वापर,आणि रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेणे,वजन कमी होणे,केमोथेरपी,विटामीन बी ची कमतरता, हायपोथायरॉडिझम, ऍनेमिया, हार्मोनल बदल, प्रोटीन ची कमतरता, गरोदरपणा, विटामीन ए च्या प्रमाणाबाहेर गोळ्या घेणे, आणि अशा अनेक बाबींचा पण समावेश आहे .
आपल्यासारख्या नेहमीच्या लोकांनाच नाही तर बॉलिवूडच्या सेलेब्रिटीजना पण ह्या समस्येने ग्रासलेले असते. ते स्टार असल्याने आणि त्यांच्या छायाचित्र परिपूर्ण चेहर्यावर हजारो कॅमेरे रोखलेले असताना सगळ्या जगाला त्यांचा टकलेपणा दिसणे हि अवघडलेली परिस्थिती त्यांना आणखीच जागरूक राहण्यास प्रवृत्त करते. पण जे घडायचे असते ते घडतेच जरी तुम्ही त्याला तयार असा किंवा नसा.
टकलेपणा हि अशी स्थिती आहे. आणि तिने मोठ्या मोठ्या बॉलिवूडच्या सेलेब्रिटीजना आपल्या कचाट्यात पकडले आहे. अर्थात प्रत्येक गोष्टींना पर्याय असतात आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचा स्वीकारपण केला. टकलावर हेयर ट्रान्सप्लांट हा उपाय आहे तोच उपाय बऱ्याच सेलेब्रीटीजनी,जे ह्या परिस्थितीने गांजलेले होते त्यांनी आधीच करून पहिला. बॉलिवूडच्या अशा कांही सेलेब्रिटीज ज्यांनी हेयर ट्रान्सप्लांट करवून घेतली आहे त्यांचा आधीच खूप मोठा हंगामा झालेला आहे.
सलमान खान हा त्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहे. हि एक सर्वात जास्त उच्च श्रेणीची केस गळण्याची कथा आहे जी बॉलिवूडने आजपर्यंत ऐकली नसेल. त्याने हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी २०१७ मध्ये दुबई ला करून घेतली. हि सर्जरी अमेरिकन डॉक्टरानी केली.2007 ते 2013 पर्यंत तो नीट बरे होण्यासाठी अनेक सर्जरी करवून आणि यशस्वी हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रियेमधून गेला.
संजय दत्त हा दुसरा प्रसिद्ध हिंदी सिनेमातील अभिनेता जो त्याच समस्येने त्रस्त होता. आणि ह्यावर उपाय म्हणू तोही त्याच सर्जिकल प्रक्रिये मधून गेला ज्या मधून त्याचा जिवलग मित्र सलमान खान गेला होता,. दत्त ने खूप वर्षापूर्वीही सर्जरी अमेरिकेतून करवून घेतली आणि त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा तो थोडे केस ठेवतो तेंव्हा त्याच्या कपाळावर आडवी खूण दिसते.
गोविंदा, 80 आणि 90 च्या प्रसिद्ध चित्रपटात दिसला होता आणि तो दिग्दर्शकांचा हुकूमी एक्का होता. पण अखेरीस वयाने त्याच्यावर परिणाम दाखवलाच आणि त्याला केस गळण्याची समस्या भेडसावू लागली. तेंव्हा त्याने सलमान खानने स्वत: शिफारीस केलेली हेयर ट्रान्सप्लांटची सर्जरी करवून घेतली. कारण टक्कल पडून त्याच्या डोक्यावरच्या घनदाट जंगलाचे त्याला नुकसान करून घ्यायचे नव्हते.
अमिताभ बच्चन हा खरोखर महान अभिनेता आहे आणि जरी त्याला टक्कल पडले तरी लोक त्याच्यावर प्रेम करतील. पण त्यांना करणे तसे मान्य नव्हते. आणि म्हणून त्यांनी खूपच आधी म्हणजे त्यांच्यावर होणारा वयाचा परिणाम स्पष्टपणे लोकांच्या लक्षात येण्या अगोदरच हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी करून घेतली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर झालेले हेयर ट्रान्सप्लांट हे हेयर ट्रान्सप्लांट पैकी एक सर्वात उत्कृष्ट काम झालेले आहे. हे अगदी त्यांच्या नैसर्गिक केसांसारखेच दिसत आहे आणि इतकी वर्षे त्यांनी ते उत्तम प्रकारे जतन केले आहे यात शंकाच नाही.
अक्षय खन्नाला त्याच्या कारकिर्दीच्या आणि जीवनाच्या सुरुवातीलाच टक्कल पडले. म्हणून त्यानेही केस विणून घेण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याला चित्रपटाच्या मागण्या येण्याचे बंद झाले कारण त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभेलशी तरूणपणाची कुठलीच भूमिका राहिली नव्हती. म्हणून परिणामी, त्यालासुद्धा त्याची गुणवत्ता आणि किंमत ह्यांचा पुरावा देण्यासाठी सर्जरी करून घ्यावी लागली.
कपिल शर्माने त्याच्या मजेदार विनोदी कौशल्याने आणि लोकांना जेंव्हा जेंव्हा तो पडद्यावर यायचा तेंव्हा हसविण्याच्या आणि मजा वाटण्याच्या क्षमतेने मनोरंजनाच्या उद्योगात खळबळ माजविली होती. पण ह्या हास्य सम्राटाला पण त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला केस गळण्याचा शाप लागला आणि थोडे हि न थांबता त्याने हेयर ट्रान्सप्लांटचा पर्याय निवडला. हेयर ट्रान्सप्लांट यशस्वी तर झालेच पण हा अभिनेता सुद्धा नवीन रूपाने खुलून दिसू लागला.
टक्कल हा आजार नसून हि एक नैसर्गिक गोष्ट आहे. हो, हे खरे आहे की कधी कधी ही गोष्ट वेळेआधीच आणि कुठलीही पूर्वसूचना न देता येते. पण प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो तसेच टकलेपणावर पण आहे. आणि सर्व बॉलिवूड अभिनेते हे त्यांची कारकीर्द चांगली चालू राहण्यासाठी ही सर्जरी करून घेण्या इतके नक्कीच चतुर आहेत.