गायनॅकोमास्टिया व्यायामाने कमी होऊ शकतो का?

गायनॅकोमास्टिया ही अशी स्थिती आहे जी पुरुषांमध्ये सामन्यात: छातीच्या ग्रंथी मधील उतींच्या फुगण्याशी संबंधित असते. गायनॅकोमास्टिया सामान्यत: शरीरातील हार्मोन्स असंतुलन जेंव्हा पुरुष हार्मोन्स टेस्टॉस्टेरोनची पातळी इस्ट्रोजेन किंवा स्त्री हार्मोन्सच्या तुलनेत कमी होते याचा परिणाम म्हणून होतो. असे असले तरीही कांही औषधांच्या दुष्परिणाम  जसे, काही विशिष्ट औषधे,प्रतिजैविके, (अँटीबायोटिक्स) हि सुद्धा गायनॅकोमास्टिया चे कारण होऊ शकतात. पुरुषांची छातीच्या आकारात वाढ होणे ह्याचे कारण हायपरथायरॉईडीझम,दुर्घर किडनी फेल्यूअर, स्थूलपण इत्यादी हे सुद्धा असू शकतात.

पुरुषांची छाती चा आकार वाढणे हि स्थिती नवजात शिशु, वयात येणारा मुलगा किंवा मध्यमवयीन किंवा वयस्क माणसांमध्ये सापडते. सुडो गायनॅकोमास्टिया आणि गायनॅकोमास्टिया  ह्यामध्ये फरक ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. खरा गायनॅकोमास्टिया सामन्यात: छातीत अल्प प्रमाणात असणाऱ्या ग्रंथीच्या टिश्यू ची वाढ झाल्याचा परिणाम असतो.

सर्वात सुरुवातीचे गायनॅकोमास्टियाचे लक्षण म्हणजे ग्रंथीतील जास्तीच्या टिश्यू मुळे पुरुषांच्या छातीचा आकार वाढतो. ह्यामुळे स्तनाग्रे रबरांसारखे आणि कडक होतात. अशी स्थिती दोन्ही किंवा एकाच स्तनावर परिणाम करते. बरेचदा पुरुषांना स्तनांवर थोडा मऊपण, वेदना आणि संवेदनशीलता जाणवते.

Also Read: Should you treat Gynecomastia as soon as possible? What are its side effects?

 गायनॅकोमास्टियावर उपचार

वाढलेल्या स्तनांची स्थिती किशोरवयीन मुलांमध्ये आढळते आणि बऱ्याच केसेस मध्ये हि लक्षणे कौमार्यावस्था संपता संपता नाहीशी पण होतात. पण जेंव्हा कौमार्यावस्था संपून काही वर्षे जाऊन देखील लक्षणे नाहीशी झाली नाही तर समस्या उद्भवते. सध्या गायनॅकोमास्टिया मुळे काही मोठी  शारीरिक लक्षणे उद्भवत नसली तरी लोकांमध्ये अवघडलेपणाची स्थिती होण्यास जबाबदार असते. तेंव्हा पुरुषांनी पहिली गोष्ट करायची ती म्हणजे जी औषधे आणि उपचार स्तनांच्या विस्तारला जबाबदार असतील ती थांबविणे.

यावर काही वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत जे विशेषेकरून ह्या समस्येवर तोडगा काढतात. पण दुर्दैवाने अशा औषधांचा परिणाम मर्यादित आहे आणि अशी कुठलीही औषधे FDI ने प्रमाणित केलेली नाहीत. तरीसुद्धा काही लोकांच्या बाबतीत प्रारंभिक अवस्थेमध्ये औषध योजना परिणामकारक होऊ शकते. नेहमी पुरुष छातीचे स्नायू घट्ट होण्यासाठी विशिष्ट व्यायाम करण्याची निवड करतात.

पुश-अप, जॉगिंग,  डंबेल प्रेस, सीटेड रो इत्यादी व्यायाम छातीच्या स्नायुंना घट्ट करण्यास उपयुक्त झाले आहेत. आणि त्यामुळे विस्तारलेल्या स्तनांच्या गंभीर अवस्थेवर मात करू शकतात. बऱ्याच केसेस मध्ये केवळ व्यायामामुळे गायनॅकोमास्टियावर  मात करणे होऊ शकत नाही. त्यांना सर्जरी करणे गरजेचे होते जो अशा अवस्थेवर शक्य असलेला कायमस्वरूपी इलाज आहे. गायनॅकोमास्टिया सर्जरी किंवा रिडक्शन मॅमोप्लास्टी  कायमस्वरूपी रिझल्ट आणण्यात जास्तीत जास्त उपयुक्त आहे.

Also Read: Know If Gynecomastia is The Safest Procedure or Not

 गायनॅकोमास्टिया सर्जरी

गायनॅकोमास्टिया सर्जरीचे उद्दिष्ट हे असते की  ज्या पुरुषांना ह्या अवस्थेवर मात करायची असते त्यांच्या  स्तनांचा आकार कमी करणे. ह्या कपातीच्या पद्धती मध्ये जास्तीच्या ग्रंथीच्या उती (टिश्यू) कापून काढण्याचा समावेश असतो किंवा दोन पद्धतींचे मिश्रण असते. प्रक्रिया सुरु होण्याअगोदर पेशंटला सामान्य भूल देऊन त्याला सर्जिकल प्रक्रियेमध्ये आरामदायी वाटावे अशी व्यवस्था केलेली असते. आता ज्या पुरुषांमध्ये गायनॅकोमास्टिया प्रामुख्याने जास्तीच्या चरबीच्या पेशींमुळे असतो त्यांना केवळ लिपोसक्शन पुरेसे होते. ह्या प्रक्रियेमध्ये कॅनूला  ही पातळ पोकळ ट्यूब असते जी बऱ्याच लहान छेदातून फिरविली जाते. कॅनूला नंतर मागे आणि पुढे फिरवून चरबीच्या पेशी सैल केल्या जातात. नंतर ह्या पातळ झालेल्या चरबीच्या पेशी व्हॅक्युम सक्शन ने शरीरातून काढून टाकल्या जातात. लीपोसक्षण च्या बऱ्याच तांत्रिक पद्धती आहेत त्यापैकी सर्जन साधारणपणे रुग्णाला योग्य असेल अशी निवडतो.

ज्या पुरुषांना छेद  तंत्रामुळे विस्तारित स्तनाची अवस्था प्राप्त होते त्यांना साधारणपणे टिश्यू छेड प्रक्रियेची शिफारीस केली जाते. ह्या प्रक्रियेमध्ये स्तनातील ग्रंथीच्या टिश्यू किंवा जास्तीची त्वचा काढून टाकून वाढलेले स्तन कमी करतात. छेद प्रक्रिया हि जर स्तनाभोवतीचा  घेरा कमी झाला किंवा स्तनाग्र पुन्हा जागेवर आणायचे असेल ज्याने पुरुषी रूपरेखा नैसर्गिक दिसेल अशा कारणांसाठी जरुरीची असते. तरीही, छेदाचे  नमुने  हे व्यक्तिगत विशिष्ट गरजेनुसार आणि सर्जिकल प्राधान्यानुसार वेगवेगळ्या असतात. काही गायनॅकोमास्टिया लीपोसक्षण आणि टिश्यू छेद प्रक्रिया या दोन्हीचा  उपयोग करून करतात.

स्वास्थ्य लाभ 

गायनॅकोमास्टिया  प्रक्रियेनंतर बरे होण्याचा काळ साधारणपणे अवस्था किती गंभीर होती यावर अवलंबून असतो. सामान्यपणे सर्वसाधारण माणसे एका आठवड्यात किंवा अशाच नॉर्मल ते थोड्या हालचाली करू शकतात. तरीही अचाट व्यायाम करण्यास पहिल्या तीन आठवड्यापर्यंत काही मनाई असते. सर्जन ऑपरेशन पश्चात् काही सूचना आणि नवीन छातीच्या आकारास आधार मिळावा आणि जलद बरे होण्यास गती मिळावी  म्हणून कोम्प्रेशन कापड देतात.