केस गळण्याचे अनेक कारण आहेत. आणि खूप वर्षांपासून बहुसंख्य लोक, स्त्रिया व पुरुष ह्या आजाराने त्रस्त होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत हेयर ट्रान्सप्लांट हाच एकमेव तारणहार आहे जी वैद्यकी  शास्त्राची एक प्रगती मानली जाते.

अलोपेशिया [alopecia] किंवा केस गळण्याचा आजार यामुळे त्रासलेल्या अगणित लोकांना हेयर ट्रान्सप्लांट मुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळाली आहे. वस्तुत: हेयर ट्रान्सप्लान्टेशन ही एक सर्जिकल प्रोसिजर [शल्य चिकित्सा प्रक्रिया] आहे ज्या मध्ये डोनर जागेवरून फ़ॉलिकलला काढून रिसिपंट जागेवर हस्तांतर  करतात . ह्या प्रक्रियेचे चांगले निकाल येतच होते की, काही रुग्णांनी ह्या प्रक्रियेनंतर बरेचसे केस गळण्याची तक्रार केली. त्यांनी असे पण सांगितले की केवळ रोपण केलेले केस नाही तर मूळचे केस पण खूप गळाले. शेवटी त्यांनी  एकच प्रश्न विचारला, “हे असे केस गळणे स्वाभाविकच असते का?” सर्जनने उत्तर दिले “होय “.

हेयर ट्रान्सप्लांट नंतर केस गळती –

हेयर रेस्टोरेशन विशेषज्ञाने खुलासा केला की ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे की हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिये नंतर मूळ केस आणि रोपण केलेले केस पण गळतात. याचे कारण:

१] पोस्ट सर्जरी सर्जरी नंतर रोपण केलेल्या त्वचेचे (graft) गळणे :-

सर्जरी नंतर १-२ आठवड्यात प्रत्येक हेयर ट्रान्सप्लांट केलेल्या व्यक्तीच्या केसांचे सर्जरी नंतरचे गळणे (post surgery shedding) सुरु होते. याचे कारण आहे की ट्रान्सप्लांट केलेले केसांचे ग्राफ्ट जे स्काल्प मध्ये घुसवले जातात त्यांचा रक्त प्रवाह बंद होतो. यामुळेच नवीन ट्रान्सप्लांट केलेले ग्राफ्ट गळायला लागतात.

हे गळणे प्रक्रिये नंतर ६ आठवड्यां पर्यंत होत राहते. पण त्यात काही अपवाद पण आहेत. काही व्यक्ती असे आहेत की नवीन ट्रान्सप्लांट केलेल्या केसांच्या ग्राफ्ट गळण्याच्या समस्येला त्यांना तोंड द्यावे लागत नाही. तरी पण सर्जन खात्री देतात की किती ही ग्राफ्ट गळाले तरीही ट्रान्सप्लांट केलेल्या केसां वर काही परिणाम होत नाही आणि प्रक्रिये नंतर केसांचे साधारण वाढणे सुरू होते.

२] प्रक्रिये नंतर मूळ च्या केसांचे गळणे –

हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिये मधून गेलेल्या बऱ्याचश्या व्यक्तिंची तक्रार असते की त्यांचे केस महिनोन महिने गळतात. प्रत्यक्षात त्यांना ट्रान्सप्लांट केलेल्या केसांच्या वाढी आधीच मूळ केसांच्या गळण्याचा अनुभव आला असतो. तरी पण सर्जन लोकांचे म्हणणे आहे की, मूळ केस गळू शकतात आणि ही एक केवळ साधारण गोष्ट आहे. सर्जन ह्या अशा प्रकारच्या केसांच्या गळण्याला ‘shock loss’ असे नाव देतात, आणि त्याची वैद्यक शास्त्रातली संज्ञा आहे एफ्लूवियं (effluvium). हे बहुदा केसांच्या वाढण्याच्या चक्रात ज्यामध्ये ऍनाजेन, कॅटॅजेन आणि टॅलोजेन चे थर असतात त्याच्या शेवटच्या थरात असतात. ऍनाजेन अवस्थेमध्ये केस २८ दिवसात १ सेंटीमीटर वाढतात. हे केस २-६ वर्षां पर्यंत राहतात. त्या नंतर बद्लावस्था येते जिला कॅटॅजेन म्हणतात. ही २-३ आठवडे राहते. त्याच्या नंतर शेवटची टॅलोजेन अवस्था येते ज्याला विरामावस्था म्हणतात. या अवस्थेत बहुदा लोकांचे शेकडो केस गळतात.

तरी पण केसांच्या गळण्याचे प्रमुख कारण आहे हेयर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया. आपल्याला माहित आहे की हेयर ट्रान्सप्लांट ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात स्टॅब इन्सिजन साठी स्कॅल्प वर छोटे-छोटे खड्डे निर्माण करावे लागतात. मूळचे जे केस आहेत त्यांना हा धक्का बसतो आणि परिणामतः केस गळायला लागतात. म्हणून प्रक्रिये नंतर केसांचे गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, आणि त्याची चिंता करण्याचे कारण नाही. हेयर ट्रान्सप्लांट च्या वेळी जो धक्का बसतो त्या परिस्थितीशी आपले शरीर जुळवून घेत असते.

३] अंतिम निर्णय :-

यामुळे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की किती ही केस गळाले किंवा आखूड झाले तरी सुध्दा प्रक्रिये नंतर रुग्णाला साधारणपणे केसांच्या वाढण्याचा अनुभव येतो. म्हणून केस गळणे हे हेयर रिस्टोरेशन प्रक्रियेचा साधारण हिस्सा आहे आणि कुठल्याही हानिचा संकेत देत नाही. खरं पाहायला गेलं तर आपण त्या दिवसात केसांचे गळणे थांबवू शकत नाही. पण सर्जनच्या सांगण्यावरून मिनॉक्सिडील किंवा फिनॅस्टिरॉईड इत्यादी औषधे घेऊ शकता. जो पर्यंत नवीन केस उगवत नाहीत, तो पर्यंत धीर धारा आणि वाट पहा.

हॅपी हेयर ट्रान्सप्लांट !!!