FUE हेयर ट्रांसप्लांट नंतर का्य परिणाम होऊ शकतात?

FUE HT सर्जरी नंतर च्या अवधीसाठी खाली दिलेली मार्गदर्शक तत्त्वे फ़क्त प्रतिनिधिक स्वरुपाची आहेत. ह्यांच्यात लक्षात येण्यासारखे वेगळेपण पण असू शकते. केस गळण्याच्या रोग्यांमध्ये खूप कमी गोष्टीं थोड्या काळासाठी जाणवतात;तर कांही लोकांना खूप काळापर्यंत त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. कोणा कोणाला 4-5 महिन्यांनी कांही कॉस्मेटिक बदल दिसतात;बऱ्याचशा लोकांना 8-12 महिन्यात परिणाम दिसायला लागतात. तर उरलेल्या लोकांना केस वाढत आहेत हे दिसायला 10-12 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागते.
पहिले कांही दिवस
कांही लोकांच्या कपाळावर आणि चेहर्‍यावर सूज येते. आणि कांही बाबतीत हि गोष्ट गंभीर होऊ शकते. परंतु हा जंतु संसर्ग झाल्याचा इशारा नाही आहे आणि सामान्यत: 3-5 दिवसांत कमी होतो, आणि तो वेदनामय नसतो. अर्थात गंभीर सुजेची अगदी कमी उदाहरणे आहेत. पुष्कळशा रोग्यांना वेदना होत नाही तर कांही रोग्यांना वेदनेसाठी पॅरासिटेमॉल ची गरज भासते. कधी कधी वेदना फारच जास्त होऊ शकतात.

पहिले 2 हप्ते

कांही लोकांना डोनर एरीयात वेदना जाणवतात. ह्यासाठी  पॅरासिटेमॉल पुरेसे आहे.

पहिले 12 हप्ते

खाज, मुरूम, पुटकुळ्या आणि रुक्ष त्वचा ह्या गोष्टी सामन्यात: अपेक्षित असतात. एंटी-हिस्टामिन [अलर्जी साठी उपयोगात आणले जाणारे], बेबी ओईल,किंवा अलो वेरा ह्यांचा फायदा होऊ शकतो. मोठ्या सर्जरी मध्ये विशेष रित्या रिसिपंट  एरिया बधिर होऊ शकतो. प्रत्यारोपित केस गळू शकतात पण त्वचेचे केस वाढण्याचे क्षेत्र सुरक्षित राहते.

3-4 महिन्यांनंतर

केस वाढू लागतात. सामन्यात: खाज, मुरूम,आणि पुटकुळ्या गायब होतात. रिसिपंट एरिया मध्ये मात्र बधिरता कायम राहू शकते.

6-8 महिन्यानंतर

कॉस्मेटिक बदल दिसायला लागतात. सर्व पेशंट चा बधिरपण जवळ जवळ गायब होतो.

1-1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षांपर्यंत

अंतिम परिणाम

कामावर आणि सार्वजनिक जीवनात परत हजर

जर  रिसिपंट क्षेत्रावर पूर्ण टक्कल नसेल तर विरळ केस असतील तर पुष्कळ रोगी डोक्या कडे लक्ष न देता सामान्यपणे नेहमीच्या हालचाली करू शकतात. जर रिसिपंट क्षेत्रावर पूर्ण टक्कल असेल किंवा जवळ जवळ टकला सारखे असेल,तर लक्षात न येण्या जोगे होण्यास 3-5 आठवड्यांची गरज असू शकते. तरी पण कांही बाबतीत 8 आठवड्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ फिकट गुलाबी रंग आणि आग होऊ शकते. FUE HT च्या पुष्कळ बाबींमध्ये 1mm पेक्षा कमी पॅच सहित डोनर एरिया कदाचित दोन आठवड्यात दिसेनासा होतो.

आपल्या किमती हेयर ट्रान्सप्लांट ची निगा

HT [हेयर ट्रान्सप्लांट] चे यशस्वी परिणाम मिळण्यासाठी पेशंट ने खाली निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या दैनंदिन कामकाजास लवकर सुरुवात करावी.

  • रोग्याला प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसानंतर 2-5 वेळा कमी दाबाच्या शॉवर घेण्याचा सल्ला दिला जातो. हे स्काब ला काढून टाकण्यासाठी मदत करते, आणि ऑपरेशन चे लक्षात येणार नाही ह्या प्रक्रियेला गती देते.
  • रोग्याला पहिल्या दोन रात्री दोन उशा घेऊन डोके थोडे उंचावर ठेवून झोपावे लागते. कपाळाच्या खालच्या बाजूला किंवा एक स्ट्रिप -निशाणी मध्ये ग्राफ्ट लावला असेल तरत्या बाबतीत रोग्याला दोन रात्री एका अंगावर झोपले पाहिजे.
  • FUE नंतर 72 तास अस्पिरीन किंवा अल्कोहोल घ्यायचे नाही तसेच धूम्रपान किंवा जास्त परिश्रम करायचे नाही.
  • एक आठवड्यांनंतर हलका व्यायाम (जॉगिंग,सायकल चालवणे,आणि हलके वजन उचलणे) पुन्हा सुरु करू शकतात.
  • 10 दिवसानंतर आपण आपल्या सामान्य वजनाच्या ६०% पर्यंत वजन वाढवू शकता. पहिल्या 2 आठवड्यात कुठलाही हिंसक खेळ(हॉकी,सोकर) किंवा संसर्गजन्य रोग होऊ शकणारे खेळ खेळू शकत नाही.
  • दोन आठवड्यात आपण आपल्या शारीरिक हालचाली पुन्हा सुरु करू शकता. आणि डोक्यावरून पूर्ण अंघोळ/ शॉवर शाम्पू करू शकता. जर स्काब अजूनही शिल्लक असतील तर शॉवर करताना किंवा नंतर हलके हलके बोटांच्या सहायाने( नखांनी नाही) घालवू शकता. फक्त एकाच खबरदारी घ्यायची ती म्हणजे पहिल्या 8 आठवड्यापर्यंत सूर्याच्या प्रत्यक्ष किरणांपासून रक्षण करणे.