काय गायनोमास्टियावर लवकरात लवकर उपचार केला पाहिजे?

गायनॉमास्टिया ही पुरुष आणि मुलांमध्ये छातीच्या उतींची सूज येण्याची अवस्था आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन ह्या हार्मोन्स मध्ये असंतुलन घडते आणि त्यामुळे एका किंवा दोन्ही स्तनांवर परिणाम होतो. स्तनांमध्ये फुगवटा येण्याचे मुख्य कारण स्तनाग्राच्या खाली व भोवतालची पेशींची बेसुमार वाढ होते. ही अवस्था जास्त करून नवीन जन्मलेले अर्भक,पौंगडावस्थेतील मुलं आणि वृद्ध पुरुष ह्यांच्या मध्ये आढळते.

तरीही गायनॉमास्टिया ही काही पुरुषांसाठी आणि मुलांसाठी गंभीर बाब नाही पण मानसिक अस्वस्थता निर्माण करण्या मागची अनेक मोठ्या कारणांपैकी ती एक असू शकते. खरोखरचा धोका म्हणजे नातेसंबंधांमध्ये आत्मविश्वास जातो,सामाजिक प्रदर्शनातून गैर हजेरी, न्यूनगंडाची भावना त्याच बरोबर लोकांमध्ये टवाळी होण्याचा संभव हा होय.

गायनॉमास्टिया वर का बरे उपचार केले पाहिजे?

वैद्यकीय जग वारंवार सांगत आले आहे की,गायनॉमास्टिया हा भला  उपयुक्त रोग आहे जो शरीराला हानी पोहोचवणारा नाही किंवा तो कुठल्याही तातडीची आरोग्याविषयी समस्या उभी करीत नाही. बऱ्याच केसेस मध्ये जेंव्हा पुरुषांमध्ये गायनोमास्टियाचे निदान केले जाते तेंव्हा कुठली गंभीर वैद्यकीय अवस्था होत नाही. क्वचित प्रसंगी काही केसेस मध्ये गायनॉमास्टिया ट्युमर सारख्या आरोग्याविषयी गंभीर अवस्थेला कारणीभूत होऊ शकते. बहुधा गायनॉमास्टिया वर उपचार करण्याची जरुरीपण नसते. कुमारांमध्ये वाढलेले स्तन २ ते ३ वर्षात नैसर्गिकरित्या मूळ पदावर येऊ शकतात. जर ह्यात बदल झाला नाही तर मात्र सर्जन काही औषधे लिहून देतात किंवा कदाचित सर्जिकल प्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला देतात.

ब्रेस्ट कॅन्सरमुळे गायनॉमास्टिया होणे असे क्वचितच घडते. आणि जर सर्जनला ट्यूमरचा संशय आला तर पेशंटला मॅमोग्राम काढायला सांगतात. काही पुरुषांना बायोप्सी  परीक्षा करून घ्यावी लागते ज्यात गाठीचा एक छोटासा तुकडा परिक्षणासाठी काढून घेतात.

गायनोमास्टिया ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे.

ही प्रक्रिया सुरु करण्याआधी सर्जन पेशंटला स्थानीय [लोकल] किंवा सामान्य भूल देण्याचे औषध देऊन बघतात की ,त्याला संपूर्ण प्रक्रिया होतांना काही अस्वस्थता तर वाटत नाही ना? काही केसेस मध्ये ज्यात प्राथमिक रित्या गायनोमास्टिया अतिरिक्त चरबीच्या पेशींमुळे झाला असेल तर केवळ एकट्या लिपोसक्शनने अपेक्षित काम होते. लिपोसक्शन प्रक्रियेत  शरीरावर केलेल्या  छोट्या छोट्या चितांमधून क्यानुलाच्या नियंत्रित हालचालींनी जास्तीची चरबी मोकळी करतात, जी शरीरातून व्हॅक्युम सक्शनच्या सहाय्याने काढून टाकली जाते. उत्कृष्ट निकाल मिळण्यासाठी तंत्रज्ञानाचा कुठलाही पर्याय आपण निवडू शकतो.

ज्या स्तनांमध्ये अतिरिक्त गाठी मय पेशीचा साठा असेल किंवा जास्तीची त्वचा असेल तर ती काढून टाकण्याच गरज असते, ज्यामुळे फुगलेल्या स्तनांचा आकार कमी करता येतो.  काही बाबतीत ह्यावर मात करण्यासाठी टिश्यू एक्सिजन प्रक्रिया खूप परिणामकारक असते ज्यामुळे मर्दानी सपाट छाती करता येते. एक्सिजन हे छातीतील गाठी मय पेशींना आणि जास्तीच्या त्वचेला काढून टाकण्यासाठी गरजेचे असते.

स्तनाग्राच्या बाजूचा गोलाकार भाग कमी करता येतो आणि स्तनाग्रे परत मूळ जागी आणून जास्त नैसर्गिक पुरुषी अंगलट मिळते. चीर पडायचा नमूना किंवा क्रिया विशिष्ट स्थिती आणि सर्जिकल अग्रक्रमावर अवलंबून असतो. प्रक्रिया झाल्यानंतर चीर शिवली जाते. आणि बँडेज  बांधले जाते. बरे होण्याच्या काळात त्वचेला आधार देण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी कोम्प्रेशन गारमेंट किंवा लवचिक बँडेज वापरले जाते.

नेहमी असे आढळते की फक्त एकाच प्रक्रियेने सर्जन समाधान कारक परिणाम मिळवू शकत नाहीत. अशा केसेस मध्ये छातीचा अपेक्षित मर्दानी कप मिळवण्यासाठी ते लिपोसक्शन आणि टिश्यू एक्सिजन प्रक्रिया ह्या दोन्हीची निवड करतात.

 

रोग मुक्तता

प्रक्रिया झाल्यानंतर लगेच उपचार केलेल्या भागाचे ड्रेसिंग केले जाते आणि बँडेज बांधले जाते. सूज कमी करण्यासाठी रोगमुक्ती वाढवण्यासाठी आणि ती होत असताना छातीच्या नवीन अंगलटीला आधार देण्यासाठी सुद्धा लवचिक बँडेज किंवा सपोर्ट गारमेंटचा उपयोग केला जातो.

उत्कृष्ट रिझल्ट मिळवण्यासाठी ऑपरेशन नंतर सर्जन ने पुरवलेल्या सगळ्या सूचना पेशंटने पाळल्या पाहिजेत. पेशंट सामन्यात: कामकाजास  सुरुवात करू शकतो आणि १ ते २ आठवड्यात कामावर ही जाऊ शकतो. पण सर्जन ने परवानगी दिल्या शिवाय कुठलेही श्रमाचे काम चालू ठेवू  शकत नाही. कोम्प्रेशन गारमेंट रोग मुक्तीच्या काळात घालण्याची शिफारस केली जाते ज्यामुळे छातीच्या नवीन अंगलटी ला आधार मिळतो.

 

गायनोमास्टिया चे दुष्परिणाम

गायनोमास्टिया ची सर्जरी झाल्यानंतर क्वचितच गंभीर गुंतागुंत होते. पण कुठल्याही सर्जिकल प्रक्रिये मध्ये काही गुंतागुंत आणि धोके असतातच. गायनोमास्टियात होणारे धोके:

१) अनेस्थेशिया (भुलीचे औषध) मुळे येणारी अलर्जी;

२) रक्तस्राव;

३) रक्ताच्या गुठळ्या होणे;

४) स्तनांमध्ये असमानता;

५) छातीची अंगलट किंवा संरचना वाकडी होणे;

६) स्तनाग्रांच्या संवेदनांमध्ये बदल किंवा उपचाराच्या भागात बधिरता;

७) नीलांमध्ये खोल थ्रोम्बोसिस;

८) जंतुसंसर्ग;

९) हेमॅटोमा किंवा सेरॉमाँ (अंतर्गत रक्तस्राव);

१०) कमजोर रोग मुक्ती आणि सततची वेदना;

११) नको असलेले व्रण.