गायनॅकोमास्टिया बद्दल माहिती

गायनॅकोमास्टिया ही पुरुषांमध्ये एक अशी परीस्थिती आहे, कि ज्यामध्ये स्तनांच्या पेशी सुजतात, जो इस्ट्रोजेनच्या तुलनेत टेस्टॉस्टेरोनची पातळी कमी झाल्याचा परिणाम आहे. ह्या परिस्थितीचा एक किंवा दोन्ही स्तनांवर परिणाम होतो आणि ती कोणाही मध्येही उद्भवू शकते, जसे नुक्त्याच जन्मलेल्या  शिशुमध्ये, वयात येणाऱ्या मुलांमध्ये किंवा शरीरग्रंथी यांच्या स्रावामध्ये (हॉर्मोन्समध्ये) होणाऱ्या बदलामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये सुद्धा.

मातेच्या इस्ट्रोजेन प्रमाणामुळे नुकत्याच जन्मलेल्या शिशुंमध्ये जवळ जवळ अर्ध्या मुलग्यांवर गायनॅकोमास्टिया चा परिणाम होतो. जन्म झाल्यावर साधारणतः तीन आठवड्यांमध्ये सुजलेल्या स्तनांची परिस्थिती अदृश्य होते. वयात येण्याच्या प्रक्रियेमध्ये होणारे हॉर्मोन्स मध्ये बदल हे सर्वसामान्य असतात आणि जास्तीत जास्त प्रमाणात गायनॅकोमास्टिया होण्यास जबाबदार असतात. तरीपण सहा महिने ते दोन वर्षांत ह्या समस्येचे निराकरण आपल्या आपण होते. काही इतर माणसांमध्ये ५० ते ८० वर्षांच्या वयोगटामध्ये ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. वयस्कर माणसामध्ये टेस्टॉस्टेरोनची प्रमाण कमी व्हायला लागते आणि पुरुषांचे वजन वाढण्याची प्रवृत्ती होते. ही कमी झालेली टेस्टॉस्टेरोनची पातळी स्तन ग्रंथींच्या वाढीला आणि स्तन ग्रंथींच्या खालील भागात चरबीयुक्त पेशी, ज्यात वाढीव  प्रमाणात ग्रंथि युक्त स्तन उती असतात, त्यांच्या संगठीत होण्यास जबाबदार ठरते. बहुतेक चरबीयुक्त पेशी इस्ट्रोजेनशी निगडीत असतात, आणि ही अधिक चरबी टेस्टॉस्टेरोन आणि इस्ट्रोजेन मधील समतोलात व्यत्यय आणू  शकते.

साधारणतः गायनॅकोमास्टियामुळे आरोग्याविषयी कुठल्याही गंभीर समस्या होत नाहीत, पण बऱ्याच पुरुषांना त्याच्याशी संबंधित वेदना आणि नाचक्कीला सोसण्याच्या काही अडचणींना सामोरे जाण्याचा अनुभव येतो. ही परिस्थिती आपल्या आपण काही न करता निवारण पावू शकते, पण जर का ही स्थिती कायम राहिली तर औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया यांची देखील शिफारस केली जाऊ शकते.

गायनॅकोमास्टिया हे काही औषधोपचारांमुळे सुद्धा होऊ शकते, जसे ऍनॅबॉलिक स्टेरॉईड, अँड्रोजेन, अँटी-अँड्रोजेन, अँटी-अँक्साइटी औषधे, अँटी-बायॉटिक्स, केमोथेरपी, हृदयासाठी औषधोपचार आणि एड्सच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे. मद्यपान, मारोवाना (मारिजुआना), मेथादोन आणि हेरोईन चे प्राशन  करण्याने सुद्धा गायनॅकोमास्टिया होऊ शकतो. काही आरोग्याविषयी स्थिती जसे हायपरथायरॉईडीझम, मूत्रपिंड निरुपयोगी होणे, यकृताचे रोग, कुपोषण आणि काही वनौषधी उत्पादने जसे शाम्पू, लोशन आणि साबण सुद्धा गायनॅकोमास्टिया होण्याला जबाबदार असतात.

Also Read: Should you treat Gynecomastia as soon as possible? What are its side effects?

गायनॅकोमास्टियाची लक्षणे

  • गायनॅकोमास्टियाचे सर्वप्रथम लक्षण म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांचे सुजणे. सुजलेले ग्रंथियुक्त स्तन उती शक्यतो दोन्ही स्तनांमध्ये उद्भवतात, पण काही वेळा ते एकतर्फी सुद्धा असते. बऱ्याच वेळा स्तनांची वाढ रबरा सारखी घट्ट स्थितीत असमांतर सापडते. ग्रंथियुक्त स्तन उतींची वाढ स्तनाग्राच्या खाली सुद्धा प्रकट होऊ शकते.
  • स्पर्श केल्याने पुरुषांना वेदना किंवा नाजुकपणा सुद्धा जाणवल्याचा अनुभव येतो.
  • गायनॅकोमास्टिया आणि स्तनांचा कर्करोग यांमध्ये फरक करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण हे जरुरी नाही की कर्करोगाने व्यापलेले स्तन घट्टच होते. स्तनांच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये स्तनाग्रातून स्त्राव, कातडीला सुरकुत्या पडणे, स्तनाग्र दाबले जाणे आणि दंडांच्या खालील लासिकांच्या गाठींमध्ये सूज येणे या सर्वांचा देखील समावेश असू शकतो.
  • स्तनांचा गळू ही देखील एक असामान्य (विलक्षण?) स्थिती आहे जी पुरुषांमधील स्तनांच्या सुजण्याशी संबंधित आहे. ह्या स्थितीमुळे त्रासलेले व्यक्ती ताप, थंडी, सूज यांनी त्रस्त झाल्याचे आढळते आणि वेदना सुद्धा व्हायला सुरुवात होते.

Also Read: Know If Gynecomastia is The Safest Procedure or Not

लक्षणांचे मूल्यमापन

पुरुष रुग्ण, जो सुजलेल्या स्तनांच्या स्थितीमुळे त्रस्त असेल, त्याला तपासतांना सर्जन शक्यतो त्या पुरुषाच्या स्तनांच्या सुजेचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढतो. स्तनाग्रातून स्त्राव किंवा वेदना आणि लैंगिक लक्षण जसे लैंगिक अवयवांची अकार्यक्षमता किंवा कमी झालेली कामवासना सुद्धा पडताळून पहिली  जाते. रुग्णाच्या परिस्थितीचे मूल्यमापन करत असताना डॉक्टर शक्यतो अशा लक्षणांचा तपास करतात जे मुख्यत: स्तनांच्या सुजेला कारणीभूत असू शकतात, जसे वजन कमी होणे किंवा थकवा जे मूत्रपिंडाच्या रोगामुळे किंवा हायपरथायरॉईडीझम मुळेही होऊ शकते. कातडीचे मलीनीकरण जे यकृत किंवा मूत्रपिंड रोग यांच्या लक्षणाची स्थिती दर्शवते आणि संज्ञानात्मक अथवा मनःस्थितीची अस्थिरता जी हायपोगोनॅडिज्म किंवा केस गळतीचे लक्षण दर्शविते. कुठलीही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता ज्यामुळे गायनॅकोमास्टिया होऊ शकेल त्यांच्या अस्तित्वाची स्पष्ट कल्पना असावी यासाठी वैद्यकीय रुग्णाचे मूल्यमापन काळजीपूर्वक केले जाते.

बऱ्याचशा प्रकरणांमध्ये, गायनॅकोमास्टियाचे कुठल्याही उपचाराशिवाय निराकरण होते. पण ज्या प्रकरणांमध्ये गायनॅकोमास्टिया कुठल्या मूलगामी प्रकृती अस्वस्थतेचे कारण असेल, तर त्यावर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते. पुरुषांमध्ये सुजलेल्या स्तनांच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी औषधोपचार, वरून लावायचे मलम आणि गायनॅकोमास्टियाची शस्त्रक्रिया ज्यामध्ये मांसल पेशींना छेदणे आणि लिपोसक्शन यांचा समावेश असतो.