हेयर केयर हेयर ट्रान्सप्लांट नंतरची काळजी

प्रौढ आणि किशोरवयीन या दोन्हींमध्ये केस गळती ही एक खरी चिंता आहे. हेयर ट्रान्सप्लांट हे लोकांसाठीसर्व उपायांमध्ये एक सर्वोत्तम आणि शेवटचा उपाय आहे, ज्यांना केसांचे संपूर्ण घनफळ पुनर्संचयीत करावयाचे आहे. पण शस्त्रक्रियेनंतर डोक्याची आणि केसांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे, म्हणून आम्ही इथे काही टिप्पण्या देऊ ज्या तुम्ही शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर वापरू शकता.

सर्जरीच्या नंतर, ट्रान्सप्लांट केलेल्या आणि टाके लावलेल्या भागात निर्जंतुकीकरण केलेले पाणी दर २० मिनिटांनी शिंपडावे. हे सर्जरी नंतर तुम्हाला पहिले १२ तास करावे लागेल. क्लिनिक तुम्हाला सलाईनचे पाणी आणि स्प्रे-बॉटल पुरवेल जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल आणि जेव्हा निर्जंतुकीकरण केलेलं पाणी संपेल, तेव्हा सामान्य नळाचे पाणी वापरू शकता. गरज लागल्यास तुम्ही फ्रीज मध्ये सलाईनचे पाणीसुद्धा ठेवू शकता. मानेभोवती आणि खान्द्यांभोवती एखादा नॅपकिन गुंडाळून घ्या म्हणजे पाणी शिंपडताना ते सर्व खाली गळणार नाही.

रुग्णांनी सक्रियपणे पाणी शिंपडणे गरजेचे आहे, म्हणून दोन्ही हातांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आणि हे सुनिश्चित करा की शिवलेला आणि चिकित्सा केलेला सर्व भाग व्यापला जाईल. आणि ट्रान्सप्लांट केलेल्या भागापासून आपले हात लांब ठेवावे. १२ तास पाणी शिंपडून झाल्यानंतर काही तास झोप काढावी. या काळात खूप पाणी प्यावे आणि साधारण जेवण जेवावे. सर्जरीच्या वेळी कोणी तरी बरोबर असू द्या, जे तुम्हाला नंतर घरी घेऊन जाऊ शकतील, कारण तुम्हाला सर्जरीमध्ये भूल दिल्यामुळे थोडीशी गुंगी आली असेल.

हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी नंतर लगेच शाम्पू वापरायला सुरवात नका करू. तुमच्या डॉक्टरांची टीम तुम्हाला मार्गदर्शन करतीलच पण बऱ्याचवेळा, जवळ-जवळ दोन दिवस तरी शाम्पू न करण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला दिला जातो कारण, जरी तुमचा शाम्पू सर्वात सौम्य, सेंद्रिय आणि संवेदनशील असला, तरी स्काल्प आणि नवीन ग्राफ्ट यांना तो त्रास देऊ शकतो. जरी तुमच्या डॉक्टरने शाम्पू वापरण्यास परवानगी दिली, तरी पहिल्या दोन आठवड्यांकरिता तरी अगदी सौम्य आणि कोमल असे फॉर्मुला उत्पादन वापरणे हे लक्षात ठेवा. तुम्ही बेबी शाम्पूसुद्धा वापरू शकता कारण त्यांत कुठलेही मिश्रित पदार्थ किंवा तीव्र असे डिटर्जंट नसतात. कधी-कधी अँटी-डॅन्डरफ शाम्पूमुळे तुमच्या स्काल्पवर चुण-चुण होते, म्हून अँटी-डॅन्डरफ शाम्पू वापरण्या आधी तुमच्या डॉक्टरांच्या टीमशी संपर्क साधावा.

कुठल्याही प्रकारचे स्टाईलिंग किंवा केसांना उष्णता देणारी यंत्रे वापरण्या आधी, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुमच्या केसांच्या आणि स्काल्पच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला काही आठवडे थांबले पाहिजे. सर्जरी नंतर उष्णता आणि हेयर कॉस्मेटिकने केसांना संकटग्रस्त करण्याअगोदर स्काल्पला काही वेळ बरे होण्यासाठी द्यावा. तुमची हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यासाठी असे क्लिनिक शोधा, जे तुम्हाला नंतरची काळजी घेण्याबद्दल आणि विशेष स्टाईलिंगचे पर्याय याबद्दल मार्गदर्शन देईल. आणि जे नंतरची काळजीसुद्धा पुरवेल आणि ह्याची खात्री घेईल की तुमचे नवीन केस उत्तम परस्थितीत असतील. सर्जरीच्या दोन आठवड्यांनंतर तुम्ही हेअर स्टाईल राखून ठेवण्यासाठी हेयर जेल, हेयर स्प्रे किंवा मूस वापरायला सुरुवात करू शकता. ते वापरण्याअगोदर तुम्ही तुमच्या डर्माटॉलॉजिस्टला विचारून घ्या की त्याची सुरुवात करणे सुरक्षित आहे अथवा नाही. मूसच्या मुळे तुमचे केस आणखी दाट दिसतील आणि तसेच राहतील. केसांवर बाकीच्या कुठल्याही अनुप्रयोग करण्या प्रमाणेच, हेयर डाय आणि इतर रसायने सुद्धा हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी नंतर नाही वापरली पाहिजेत. कारण सुरवातीच्या काळात हेयर फॉलिकल हे शक्यतो फार नाजूक परिस्थितीत असतात आणि डाय किंवा अन्य उत्पादनांमधील रसायनांशी आश्चर्यजनक रूपांत प्रतिसाद देऊ शकतात. जर तुम्हाला केसांचा रंग बदलायचा असेल, किंवा मुळांना टच-अप द्यायचा असेल, तर सर्जरीच्या काही आठवडे आधीच तुम्ही केसांना डाय करू शकता.

ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आराम करा. तुमचे घर सर्जरीच्या आदल्या दिवशीच सुव्यवस्थित करणे फार उपयोगाचे पडेल. यादृच्छिक कामे जसे बाथरूम साफ करणे, व्हॅक्युम करणे किंवा फरशी पुसणे आणि काही भांडी घासणे. यामुळे, तुमचे घर सर्जरीच्या आधी आणि नंतर स्वच्छ राहील आणि तुमच्या घराबद्दल तुम्हाला काळजी राहणार नाही.

विसेष्टः स्कल्प सुजलेले असताना काही दिवस उन्हात बाहेर जाऊ नका. जर तुम्हाला दिवसा बाहेर जाणे अनिवार्य असेल, तर टोपी घाला.

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, उत्तम निकाल मिळवण्यासाठी तुमच्या सर्जनने दिलेला काळजीचा नित्यक्रम कटाक्षाने पाळा.