अचूक बॉडी कॉन्टोरिंगसाठी हाय डेफिनेशन लेझर लिपोसक्शन

हाय डेफिनेशन लेझर लिपोसक्शन हे पुरुषांना आणि स्त्रियांना एक सुंदर, बांधेसूद, सशक्त दिसणारे शरीर मिळविण्यास मदत करते. न्यूयॉर्क मध्ये अग्रगण्य असणाऱ्या प्लास्टिक सर्जरीच्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध असणारया ह्या हाय-डेफ उपचारामध्ये आधुनिक शिल्पकलेचे तंत्र असते, जे प्रिसिजन कॉंटूरिंगचा वापर करते. सामान्य लिपोसक्शन मध्ये आवश्यक रित्या चरबीचे घट्ट साठलेले थर काढणे याचा समावेश असतो, पण हाय-डेफ बॉडी स्कल्पटिंगमध्ये शरीराला आकार देणे याचा समावेश असतो, जे मानवी स्वरुपाचे सौंदर्य प्रकट करते. एफ.डी.ए मार्फत मंजूर केलेल्या स्मार्टलिपो ट्रायप्लेक्स वर्कस्टेशनच्या सहाय्याने केली जाणारी ही शस्त्रक्रिया असे पुरुष ज्यांना उदरपोकळीत स्नायूंची अधिक परिभाषा किंवा सिक्स पॅक ऍब्स आणि पहिलवानाची छाती हवे असतात, आणि अशा स्त्रिया ज्यांना सडपातळ, ट्रिम असलेले उदर आणि कंबर हवी असते, यांना शिफारस केली जाते. ही क्रांतिकारी प्रक्रिया जवळजवळ सर्व क्षेत्रांवर उपचार करू शकते, ज्यामध्ये कंबर, हनवटी, नितंब, उदर, टाचा, पाठ, हात, मान आणि गुढगे यांच्या समावेश असतो.

 

वेसर हाय डेफिनिशन लिपोसक्शन प्रक्रिया कशी केली जाते?

वेसर हाय डेफिनेशन लिपोजक्शन पध्दती ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे, आणि ही नैसर्गिक रित्या कमीत कमी घात-पात करणारी आहे. प्रक्रिया चालू असताना वेदनेची जाणीव किंवा अस्वस्थतेच्या संवेदना प्रतिबंधित करण्याकरिता ह्या सर्जरीसाठी लोकल ऍनेस्थेशिया (भूल) देणे आवश्यक असते. सर्जन योग्य ठिकाणी एक छोटे (२-४ मी.मी.) भोक करतात, ज्यामधून कॅन्यूला नावाची एक छोटी आणि बोथट व्हॅक्युम ट्यूब आत घालणे गरजेचे असते.

उपचाराच्या ठिकाणी सर्जन सर्वात आधी चरबीचे थर बधीर करून आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्या आकुंचित  करून जखम होणे टाळण्यासाठी ऍनेस्थेटिक सॅलिन सोल्युशन इंजेक्त करतात. यानंतर सर्जन  कातडीमध्ये बधीर झालेल्या क्षेत्रात एक छोटे बोथट यंत्र (प्रोब) घालतात. हे प्रोब चरबीच्या साठ्यांजवळ उच्च-वारंवारता असलेल्या ध्वनीच्या लाटांचे छोटे-छोटे पल्स सोडणे सुरु करते. ही स्पंदने लक्ष्यित चरबी साठ्यांना वितळविण्यास मदत करतात. या ध्वनीच्या लाटा चरबीच्या साठ्यांच्या बाजूच्या निरोगी पेशींच्या समूहावर परिणाम करीत नाहीत आणि त्या अतिशय अचूक असतात. जेव्हा हे चरबीचे साठे वितळतात, तेव्हा सर्जन तो कॅन्यूला भोकात घालतात आणि त्याला वापरून सक्शन पद्धतीच्या सहाय्याने मऊ झालेल्या पेशींचा संग्रह काढून टाकतात. हे कातडीच्या खालील असलेले वारीन चरबीचे थर काढून टाकणे खालील स्नायू आणि टिश्यू यांच्या आकाराला डौलदर बनवण्याकरिता मदत करते, आणि परिणामकारक शरीर चरबीशिवाय सडपातळ आणि पीळदार दिसते.

 

स्मार्टलिपो ट्रायप्लेक्सच्या सहाय्याने हाय डेफ बॉडी स्कल्पटिंग

लोकल ऍनेस्थेशियाच्या परिणामाखाली केल्या जाणाऱ्या ह्या प्रक्रियेमध्ये चरबीच्या वर-वरच्या थराचा काळजीपूर्वक उपचार करणे याचा समावेश असतो. स्नायूंच्या गटांमधील क्षेत्रातील चरबी निवडक रित्या काढली जाते, ज्यामुळे खालील पिळदार स्नायूंची रचना प्रकट होते. छोटी कॅन्यूला घालण्यासाठी एक लहान प्रवेशिका केली जाते, आणि लेसरची उर्जा चरबीच्या पेशींना हळुवारपणे वितळवण्यासाठी वितरीत केली जाते. वितळलेली चरबी नंतर त्याच प्रवेशिकेमधून हळुवारपणे शोषून काढली जाते. ही पद्धत लहान आणि व्यापक अशा दोन्ही भागात उपचार करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. ही प्रक्रिया कमीत कमी घटक असल्या कारणाने उपचारानंतर काही दिवसांतच सामान्य क्रियाकलाप पुन: सुरू केले जाऊ शकतात. उमेदवारांना अतिशय टोन आणि फिट असा देखावा मिळण्याखेरीज, ही अत्याधुनिक प्रक्रिया कमी सर्जिकल आघात, कमीत कमी अस्वस्थता, रक्तस्राव, जखम आणि गुंतागुंत अशा फायद्यांसह येते.

सायनोश्युअरचे स्मार्टलिपो वर्कस्टेशन सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे अतिरिक्त चरबी वितळविण्यासाठी आणि कातडी घट्ट करण्यासाठी लेसरच्या तीन तरंगलांबी चा वापर करते – १४४०, १०६४ आणि १३२० नॅनोमीटर. प्रभावीपणे कातडी घट्ट करण्यासाठी, रक्तवाहिन्या गोठवण्यासाठी आणि चरबी वितळवण्यासाठी या तरंगलांबी वैयक्तिकरित्या किंवा एकत्रित वापरल्या जाऊ शकतात.

हे लेसर लिपोलीसीस वर्कस्टेशनमध्ये बुद्धिमान वितरण प्रणालीसुद्धा असतात – स्मार्टसेन्स (SmartSense™), थर्मागाईड (Thermaguide™) आणि थर्माविव (Thermaview™) – ज्या रुग्णाला चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी डिजाईन केलेल्या आहेत. ह्या सुरक्षेच्या व्यवस्था प्लास्टिक सर्जनला अतिरिक्त जास्त उपचार करण्यापासून प्रतिबंधित करायला आणि त्वचा तापमानावर नियंत्रण ठेवून त्यानुसार ऊर्जा प्रवाह नियंत्रित करून गुंतागुंत कमी करण्यास मदत करतात.

स्मार्टलिपो ट्रायप्लेक्स ऍबडॉमिनल एचिंग खरोखर मर्दानी रूप साध्य करण्यासाठी प्रयत्नशील पुरुषांकरिता एक सुरक्षित आणि प्रभावी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वैयक्तिकरित्या एकटी किंवा इतर प्लास्टिक सर्जरी प्रक्रीयांसोबत केली जाऊ शकते.

एक कुशल प्लास्टिक सर्जन फरक पाडू शकतो

जर तुम्ही हाय-डेफिनिशन लेसर लिपोसक्शन प्रक्रिया करून घ्यायचा विचार करीत असाल, तर लेझर लिपोजक्शनमध्ये तज्ञ असणारा प्लास्टिक सर्जन निवडण्याचे सुनिश्चित करा, ज्याला वरवरची शरीरशैली बाह्य स्वरूप कसे प्रभावित करते याची माहिती असेल. गुणवत्तेचा परिणाम प्रदान करण्यासाठी या प्रक्रियेस संपूर्ण निपुण शल्यक्रियात्मक कौशल्य, कलात्मक दृष्टी आणि महत्त्वपूर्ण तपशीलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. तुम्हाला सानुकूलीत हाय डेफ बॉडी स्कल्पटिंग प्रदान करण्यासाठी सर्जन स्मार्टलीपो ट्रायप्लेक्स टेक्नॉलॉजीच्या क्षमतेचा उपयोग करण्यात विशेषज्ञ असावा. सुरक्षित, मानक उपचार आणि संपूर्ण पुनर्प्राप्ती पर्यंत उत्कृष्ट पाठपुरावयाची काळजी घेण्यासाठी AAAASF द्वारा मान्यप्राप्त सुविधा निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.