हार्मोनल हेयर फॉल म्हणजे काय आणि तो थांबविण्यासाठी कांही मार्ग आहें काय?

केस विरळ होणे,लक्ष्यात येण्यासारखे टकल,केसांची पिछेहाट,ब्रशवर,कंगव्या वर,आणि उशीवर गुंतवळ पडणे,ही सारी टिपिकल केस गळण्याची लक्षणे आहेत. पुरुषाना केस गळण्याच्या समस्ये चा इतका गंभीर अनुभव येत नहीं, तरी सुद्धा भरपूर केस असलेल्या डोक्यावर हळूहळू बदल घडून,भांग मागे मागे जात,केस कमी झालेले दिसते. हे ख़रच खूप निराशाजनक आहें! ही लक्षणे आधी विचारात घेऊन आणि त्याचे मूळ कारण शोधून, खूप उशीर होण्याच्या आत त्याचे निर्मूलन करणे खूप महत्वाचे आहे, संशोधकाना आढळून आले आहे की, स्त्रीयामध्ये हे केस गळणे खूप कारणांनी होउ शकते जसे, ताण तणाव,प्रदूषण,आनुवंशिकता, जीवनशैली आणि चुकीचा आहार आणि तसेच शरीरातील सम्प्रेरके म्हणजे हार्मोन्सचा असमतोल.

एक स्त्री तिच्या आयुष्यात, जन्मापासून पाळी येण्यापर्यंत,लैंगिक आयुष्य ,गरोदरपणा,बाळंतपण, अंगावर पाजणे ,आणि शेवटी रजोनिवृति/पाळी जाणे [मेनोपॉज]अशा बर्‍याच बदलातून जाते. जीवनातील ह्या सर्व घटनांमधून स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्स मध्ये बदल होतात. केसांचे फोलीकल अन्द्रोजेनबद्दल संवेदनशील असल्याने ते गळू लागतात, ज्यामुळे केसांचे फोलीकलची संवेदना ही हार्मोन्सच्या चढ उतारावर अवलंबून असते हे स्पष्टपणे दिसते.

हार्मोन्स मधील असमतोलामुळे केस गळण्याची कारणे

1] संतती नियमनाच्या गोळ्यांचा वापर:- संतती नियमनाच्या गोळ्या किंवा कोण्ट्रासेप्तिव्ह [contraceptive] गोळ्यांमध्ये कृत्रिम प्रोजेस्टेरोन असतात जे पुरुषी हार्मोन्स चे काम करतात. हा विशिष्ट हार्मोन्स केसांच्या फोलीकलला संकुचित करतात आणि त्यामुळे त्यांची हानी होते. म्हणून जेंव्हा पुरुषी हार्मोन्स चे प्रमाण स्त्रीच्या शरीरात प्रचंड वाढले तर ते इंसुलिनला तर विरोध करतेच आणखी ते केस गळण्याच्या समस्येला जन्म देते.

2]थायरोईडच्या कार्यात कमतरता:-ह्या अवस्थेत केस गळण्याबरोबर स्नायूंचा थकवा, विनाकारण वजनात वाढ, सांधेदुखी, कोरडी त्वचा, निद्रा नाश, ह्या गोष्टी पण येतात. केसांचे फोलीकल थायरोईड हार्मोन्स बद्दल संवेदनशील असतात.त्यामुळे केस गळणे आणि इतर बाबींची गुंतागुंत वाढते.

3]पोषक द्रव्यांची कमतरता:-शरीरात विशिष्ट महत्त्वाच्या पोषक द्रव्यांची कमतरता हे सुद्धा केस गळण्याच्या समस्येला निर्माण करते. उदाहरणादाखल विटामीन A,E आणि लोह यांची कमतरता केसांना घातक असते.

4] जुनाट दाह किंवा जळजळ:- अन्द्रोजेन अलोपेशिया हा असा केस गळण्याचा रोग आहे जेंव्हा अन्द्रोजेनची पातळी प्रमाणाबाहेर नसते. पण त्याबरोबर सामान्यत: जळजळ पण येते आणि अशा स्थितीला सेलियाक डिसीज किंवा ग्लुटेन इंटोलरन्स असे म्हणतात. हा दाह स्काल्पवर येतो. आणि फोलिकलला अति संवेदनशील बनविते. हा दाह किंवा जळजळ गहू, दुग्ध जन्य पदार्थ आहारात घेऊन आपण टाळू शकतो.

5] गरोदरपणा, बाळंतपण आणि अंगावर दूध पाजणे:- गरोदरपणात आणि नंतर इस्ट्रोजेन च्या पातळीत बर्‍याच वेळा भराभर चढ उतार होतात. हार्मोन्सच्या अशा अचानक चढ उताराने केस गळण्याची अवस्था निर्माण होते जी अगदी नैसर्गिक असते. जेंव्हा हार्मोन्स ची पातळी समतोल व्हायला लागते तेंव्हा केस गळणे हळूहळू कमी व्हायला लागते. पण जर केस गळणे ह्या समस्ये बरोबर इतर गंभीर समस्या असेल तर ती आधीपासूनच होती का हे शोधण्याची वेळ येते.

भरपूर केस गळण्याची लक्षणे:-

1] भांग फाटणे [मोठा होणे],

2]पोनिटेल पातळ होणे,

3] कपाळावरून केसांची पीछेहाट,

4]केसांच्या ब्रश मध्ये आणि उशीवर केसांचा गुंतवळा.

हे थांबवण्याचा कांही मार्ग आहे का

केस गळण्याला कारणीभूत होणार्‍या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशा समस्या सोडवण्यासाठी लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे. डॉक्टर थायरोइड आणि इंसुलिन च्या पातळीची परीक्षा करायला सांगू शकतात. ह्या स्थितीचे विश्लेषण केल्यानंतर डॉक्टर विशिष्ट आहार,पथ्य  आणि जीवनशैली मध्ये बदलाचा विचार करण्याचा सल्ला देतात. कांही नैसर्गिक उपाय केस गळण्याच्या समस्येवर लढा देण्यास उपयुक्त ठरतात.

केस गळणे थांबविण्यासाठी नैसर्गिक उपायांमध्ये आहारात बदलाचा समावेश असतो जसे प्रोटीन युक्त आहार ज्यामध्ये सोया ची उत्पादने, दूध, चीज, अंडी, चिकन, यांचा समावेश असतो. काजू आणि अळशी, कालव [शिंपले] सुद्धा प्रोटीन चा चांगला स्रोत आहे. लोहाची कमतरता गंभीरपणे केस गळण्यास कारणीभूत होते म्हणून मासे, कोलंबी,ऑयस्टर, कडधान्य, ब्रोकोली आणि संत्री खाल्ली पाहिजे. याशिवाय झिंक ची, तांब्याची कमतरता पण केस गळण्याला कारणीभूत होते म्हणून समुद्रातील अन्न, मासे, मांस, अंडी, कडधान्य, आणि हिरवा भाजीपाला सुद्धा खाल्ला पाहिजे.

ह्याशिवाय सर्जन पेशंटला केस पुन्हा उगविण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट ची शिफारीस करतात. ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्जन डोक्यावर एकीकडचे केस काढून ते टकलावर लावतात. सहसा सर्जन डोक्याच्या बाजूकडून किंवा पाठी मागून केस काढून ते डोनर केस विरळ  केसांवर किंवा रिसिपंट भागावर लावतात. ही प्रक्रिया लोकल भूल देऊन केली जाते. आणि दोन गोष्टींचा ह्यात उपयोग केला जातो: स्लीट ग्राफ्ट आणि मायक्रोग्राफ्ट.ह्यामध्ये सुधारणा लवकर होते आणि काही भयंकर गुंतागुंत होत नाही. उलट मिळालेला रिझल्ट जास्त अपेक्षित असतो आणि नैसर्गिक रूप देतो.