एकसारख्या जुळ्यांचे केस एकसारख्या प्रकारचे असतातच असे नाही.

जेंव्हा लोक जुळे हा शब्द ऐकतात तेंव्हा त्यांना असे वाटते की जुळ्यांना सारखीच कातडी, केसांचा पोत, रंग,त्याचबरोबर, सारखी वैशिष्ठ्ये आणि व्यक्तिमत्व असते. आधी तुम्हाला हे सांगू इच्छितों की जुळे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे एकसारखे, किंवा तंतोतंत सारखे जुळे आणि दुसरा विभिन्न जुळे. तर प्रश्न हा उठतो की एकसारखे जुळे आणि विभिन्न जुळे यांच्यामध्ये काय फरक आहे? तर उत्तर असे आहे की एकसारखे जुळे हे एकाच अंड्याला एकाच पुंबिजाने फलित केलेले असते. जेंव्हा अंडे पुंबिजाने फलित झाल्यानंतर झायगोट [फलित अंडे] पुढे दोन गर्भात विभागले जाते तेंव्हा हे दोन गर्भ एकसारख्या जुळ्यांना जन्म देतात. उलट पक्षी जेंव्हा गर्भाशयात दोन अंडे असतील आणि ते दोन वेगवेगळ्या पुंबिजाने फलित झाले असतील तर सुरुवातीलाच दोन वेगवेगळे झायगोट [फलित अंडे] तयार होतात जे दोन वेगवेगळ्या जुळ्यांना किंवा भ्रातृव्रत जुळ्यांना जन्म देतात.

आता परत एकसारख्या जुळ्यांकडे वळू. तर प्रश्न हा आहे की त्यांचे केस एकसारखेच असतात. का? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास तुम्हाला प्रथम ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल की त्यांचे DNA एकाच प्रकारचे असतात का?
तर बऱ्याच लोकांना  आतापर्यंत असे वाटत आले आहे की एकसारख्या जुळ्यांचे सर्वच एकसारखे असते. आणि ते एका अर्थी खरेही आहे कारण ते एकाच झायगोट चे  भाग असतात. पण ह्या सामान्य विचारांशी विसंगत असे नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळून आले आहे की, जरी एकाच झायगोट मधून वाढत असताना सुरुवातीला त्यांचे DNA एकसारखे असतात, पण प्रत्यक्षात जेंव्हा ते आईच्या गर्भाशयात परिपक्व होत असतात तेंव्हा त्यांचे DNA किंचित वेगळे होतात. असे घडते कारण खरा झायगोट सेलच्या विभागणीतून दोन पुंज तयार करण्यासाठी एकदा किंवा दोनदा विभागाला जातो ज्याचा प्रत्येक भाग एकसारख्या जुळ्यांमध्ये रूपांतरित होतो. जसे जसे हे पेशी पुंज नवीन गर्भात विकसित होते तसे तसे ते परत परत विभागले जाते. अशा घातांकीय विभाजनाच्या परिस्थितीत DNA मध्ये फरक असणे किंवा एकदम उत्परिवर्तन होणे अशा गोष्टी घडतात ज्यामुळे एकसारख्या जुळ्यांमध्ये फरक आढळतो.
बऱ्याच केसेस मध्ये हाDNA मधील फरक त्या मनाने कमी असतो आणि ह्या एकसारख्या जुळ्यांच्या दिसण्यात फारसा फरक पडत नाही. तसेच बऱ्याच जुळ्यांमध्ये सारखा डोळ्यांचा रंग त्वचा,आणि सारख्या वळणाचे केस सुद्धा असतात, पण हे नेहमीच घडते असे नाही. कारण DNA च्या विभाजनानंतर प्रत्येक एकसारख्या जुळ्याचे वेगळे गुणसूत्र होऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या शारीरिक वैशिष्ठ्यांमध्ये बराच फरक पडतो. तेंव्हा ही कांही चिंतेची बाब नाही की तुम्हाला एकसारखे जुळे आहेत जे दिसतात एकसारखे पण त्त्यांच्या त्वचेचा रंग वेगळा आहे किंवा केसांची ठेवण वेगळी आहे किंवा डोळ्यांचा रंग वेगळा आहे किंवा तत्सम आणखी कांही, जरी असले तरी हे नैसर्गिक आहे.

Also Read: What is hormonal hair fall and is there any way to stop it?
नुकतीच  २०१६ मध्ये वर सांगितल्याप्रमाणे सिद्ध करणारी जुळ्यांच्या जन्माची गोष्ट घडली. ह्या केस मध्ये दोन एकसारख्या जुळ्यापैकी एकाचे केस काळे होते आणि तपकिरी डोळे होते आणि काळा रंग होता याउलट दुसरा एकसारख्या जुळ्याला निळे डोळे, गोरा रंग आणि  भुरकट कुरळे केस होते. हा  एकसारख्या जुळ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक फरक होता. ते दोघे जवळ जवळ असे दिसत होते की ते एकसारखे जुळे नाहीतच किंवा ते जुळेच नाहीत. तेंव्हा अशा प्रकारच्या केसेस मध्ये हे नेहमी स्वच्छ दिसते की जुळ्यांना वेगळा त्वचेचा रंग, वेगळी केसांची ठेवण असते. आणि त्यांचे DNA पण वेगळे असतात. खरे म्हणजे हा फरक इतक्या प्रमाणात असतो की दोघांना त्रस्त करणार्‍या केसांच्या समस्या सुद्धा वेगळ्या असू शकतात. असे सुद्धा असू शकते की दोघांपैकी एका एकसारख्या जुळ्याला जाड आणि लांब केस असू शकतात. आणि दुसर्‍या जुळ्या बाळाचे कायम केस गळताना दिसतात इतके की त्याला हेयर ट्रान्सप्लांटची गरज भासते.

Also Read: Best Hair Loss Prevention Tips in 2018 For Teenagers
एकसारख्या दिसणार्‍या जुळ्यांमध्ये फरक असण्याचे आणखी एक कारण आहे. काही बाबतीत असे आढळून आले आहे की एकसारख्या जुळ्यांमध्ये फरक असण्याचे कारण त्यांच्या वातावरणातील फरक, हवेतील फरक, स्थान इत्यादी असते. अशा केसेस मध्ये एक एकसारखा जुळा दुसर्‍या टक्कल पडलेल्या जुळ्याला केसांचे ग्राफ्ट दान करू शकतो. पण जर तुम्हाला असे एकसारखे जुळे असेल आणि तुम्ही हेयर ट्रान्सप्लांट चा विचार करीत असाल तर  हेयर ट्रान्सप्लांट करण्याच्या आधी किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी चांगली केसांच्या विशेषज्ञ कडे जाऊन सल्ला घ्या.