आपणास माहित आहे का PRP किंवा Platelet Rich Plasma म्हणजे काय ? PRP ही केस गळण्याच्या मुद्द्यावर एक अत्याधुनिक प्रकट केलेली उपचार पद्धती आहे, परंतु सर्जन लोकांना हिच्या परिणामकारक असण्यावर शंका आहे. त्यामुळे वैद्यकी व्यावसायिकांमध्ये आणि हेयर रेस्टोरेशन स्पेशॅलिस्ट लोकांमध्ये जोरजोरात वाद-विवाद झाले. तरी सुध्दा आता वेळ आली आहे या विषयावर खोलात शिरून विचार करण्याची की, PRP खरोखर परिणामकारक आहे किंवा नाही.

आपणास माहित आहे का PRP काय आहे?

PRP किंवा Platelet Rich Plasma ही एक बिना शस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे जिच्यात व्यक्तीचे 10 ते 20 मिली रक्त काढून त्याचा उपयोग केसांना वाढण्यासाठी उत्तेजित करण्यास केला जातो. पूर्ण प्रक्रियेची सुरुवात रुग्णाच्या शरीरातले रक्त काढून होते. नंतर हे 10 ते 20 मिली रक्त [सेंट्रिफ्यूज] नावाच्या उपकरणात प्रक्रिया करण्यासाठी घातले जाते. आणि त्यात रक्तापासून प्लेटलेट अलग केल्या जातात. प्लेटलेट हा घटक रक्ताच्या घटकांतील वृद्धीचे कारण असलेला घटक असे मानले जाते. या करिता त्यांना रक्तातून वेगळे काढून उपयोगात आणतात. सेंट्रिफ्यूज नंतर आणि प्लेटलेट वेगळ्या करून घेतल्या नंतर शेवटी जो प्लेटलेटने भरलेला द्रव मिळतो त्याला PRP किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतात .

ह्याआधी PRP चा उपयोग हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी बरोबर केसांचा दाटपणा वाढावा म्हणून करीत होते. पण आता आमचे वैद्यक विशेषज्ञ PRP ला जास्त वाढणारे दाट केस मिळावे म्हणून वेगळ्याच उपचार पद्धतीच्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

PRP चे तंत्र –

प्लेटलेट च्या खालील गुणांमुळे केसांच्या वाढीला उत्तेजना मिळते:
१] वृद्धीकरक;
२] वृद्धीकरकतेला परिवर्तित करणे;
३] इन्सुलिन प्रमाणे वृद्धीकरक;
४] वस्क्युलर एन्डोथेलियलचा वृद्धीकरक (रक्तवाहिन्या)
५] केराटिनोसाइटचा वृद्धीकरक (केराटिन वाढण्यासाठी);

ह्या मुळे प्लेटलेटचे हे घटक केसांना वाढण्यासाठी परिणामकारक असण्याचे स्पष्ट होते. PRP मध्ये पुन: प्रस्थापित करण्याचे गुण जास्त प्रमाणात असतात जे आपल्या शरीरात पण वृद्धी कारक असतात. आपण प्लेटलेटचे हे प्रयोजन जाणतो की प्लेटलेट , उपचाराची प्रक्रिया उत्तेजित करतात आणि जखमेतून वाहणारा रक्तस्त्राव थांबवतात. ह्यासाठी आपल्या वैद्यकांनी केसांचा दाटपणा आणि जाडी वाढवण्यासाठी प्लेटलेटच्या ह्या तंत्राचा उपयोग केला.

ह्या तंत्राचा उपयोग २०१३ मध्ये प्रदर्शित केलेल्या एका लेखामध्ये सापडला ज्यात अशी पुष्टी दिली गेली होती की ‘अँड्रोजेनिक अलोपेशिया (हॉर्मोनल बाल्डनेस)’ वर PRP चा उपयोग त्याच्या केस वाढवण्याच्या ह्या कारणामुळे केला गेला होता.

मग PRP सगळ्यांवरच परिणामकारक होते का?

जरी PRP च्या प्रक्रियेमध्ये खूप उत्साहवर्धक तथ्य असले तरी त्याच्या विरुद्ध कारणांनी खरे तर त्याला पराभूत केले आहे. होय, हे स्पष्ट आहे की PRP चे चांगले परिणाम होतात. पण ते तितकेसे प्रभावशाली असत नाहीत.

अत्याधिक संशोधना नंतर ह्या प्रक्रियेबद्दल अचूक उपयोगिता व परिणामकारकतेबद्दल प्रश्न मिटला आणि सिद्ध झाले. तरीही ह्या वृध्दीकारकतेचे अचूक कार्य जे केसांना वाढवते हे अजून स्पष्ट समजले नाही. म्हणून ते PRP प्रक्रियेला केसांच्या गळण्याच्या समस्येवरती विश्वसनीय उपचार पद्धती मानत नाही.

तरीही ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आपण ही प्रक्रिया परिणामकारक आहे असे मानले तरी इच्छित फळ मिळण्यासाठी PRP चे एकच सत्र पुरेसे नाही. त्यासाठी तुम्हाला अनेक सत्र करण्याची गरज लागेल, ज्या मुळे ही प्रक्रिया अतिशय महाग पडते.

म्हणून जर तुमचा PRP प्रक्रियेच्या परिणामकारकते बद्दल प्रश्न असेल तर उत्तर आहे ‘नाही’ !! PRP ही खरोखर केस गळण्याच्या समस्ये वर प्रभावशाली परिणामकारक प्रक्रिया नाही आहे.