काय रिह्नोप्लास्टी सर्जरी [नाकाची शस्त्रक्रिया] रूप आणखी खुलविण्यास यशस्वी ठरते का?

रिह्नोप्लास्टी सर्जरीचा उल्लेख अशा प्लॅस्टिक सर्जरीबद्दल केला जातो जी लोक त्यांचा देखणेपणा आणि नाकाचे कार्य सुधारण्यास करतात. ह्या पद्धतीमध्ये प्लॅस्टिक सर्जन सर्व साधारणपणे नाकाचे हाड आणि कार्टीलेज यावर  कोरीव काम करून पेशंटला हवे तसे रूप मिळवून देतात. म्हणून स्त्रिया आणि पुरुष जे आपल्या नाकाबाबत समाधानी नाहीत ते नाकाचा आकार बदलून घेण्याची शस्त्रक्रिया करून घेतात.

खूप लोक रिह्नोप्लास्टीला अधिक पसंती देतात कारण जर ती एखाद्या अनुभवी व कुशल कॉस्मेटिक सर्जनने तर ती सुरक्षित आणि परिणामकारक असते. रीहनोप्लास्टी चेहर्‍याची ठेवण संतुलित करते आणि आपल्यामध्ये नव्याने सापडलेला आत्मविश्वास जागवते. रीहनोप्लास्टी ठेवणीमधील दोष दूर करून श्वासाचे त्रास पण बरे करते.

Read AlsoFace Surgery

रीहनोप्लास्टीचे विशिष्ट उद्देश्य

रिह्नोप्लास्टीचा उपयोग  नाकाचा आकार, लांबी, रुंदी,आणि सर्वसाधारण स्वरूप यात फेरफार करण्यासाठी  करू शकतो. काही केसेस मध्ये सर्जन प्रक्रिया चालू असताना हनुवटीला रोपण कराण्याचा सल्ला देतात ज्यायोगे चेहर्‍याच्या ठेवणीत संतुलन राहते. तरीही  रिह्नोप्लास्टीने चेहर्‍याचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे बदलता येते.

1]नाक अरुंद करणे

2]नाकपुड्या रुंद किंवा अरुंद करणे .

3]वाकडे नाक सरळ करणे.

4]नाकाच्या टोकामध्ये बारीक सारिक फेरफार करणे

5]नाक आणि वरचा ओठ हयामधील कोन बदलणे.

वरील सर्व  केसेस मध्ये  कॉस्मेटिक सर्जरीने नाकाचा आकार बदलण्यासाठी जी चीर पाडतात, ती नाकाच्या आत लपविली जाते किंवा बाहेर नैसर्गिक सुरकुत्यामध्ये नजरेस न येईल अशी लपविली जाते.

रिह्नोप्लास्टी प्रक्रिया : प्रक्रिया सुरू होण्या अगोदर प्लॅस्टिक सर्जन विशेषत:  पेशंटला ट्रीटमेंटचा  पूर्ण प्लान बनविण्यास उत्तेजन देतात. कोणत्या तर्‍हेची रीहनोप्लास्टी जास्त उपयोगी ठरेल, कोणते तंत्र सुयोग्य रीतीने ठरेल, किंवा कोणत्या प्रकारची भूल उपयुक्त होईल याची प्लॅस्टिक सरजनशी चर्चा केली जाते.

रिह्नोप्लास्टी एक तर क्लोज्ड रिह्नोप्लास्टी  किंवा ओपन रिह्नोप्लास्टी पद्धतीने करतात.क्लोज्ड रिह्नोप्लास्टी मध्ये नाकाच्या आत छेद देतात तर ओपन रिह्नोप्लास्टी मध्ये नाकपुड्यांच्या बाजूला वर चीर पाडतात. तरीही नाकाचा आकार बदलण्याचे खालील प्रकार आहेत.

  • छाटणी रिह्नोप्लास्टी [Reduction] : छाटणी रिह्नोप्लास्टी ही सर्वात जास्त आढळणारी नाकाच्या आकार बदलाची शस्त्रक्रिया आहे जिच्यामुळे पेशंटला त्याच्या चेहर्‍याशी प्रमाणबध्द असे नाक मिळते. यात नाकाच्या धारदारपणात येणारे अडथळे दूर करणे,  नाकाचे लांबट टोक लहान करणे किंवा अति पसरट नाकपुड्या कमी करणे यांचा समावेश असतो. डॉक्टर अशा तर्‍हेने यशस्वीरीत्या हाडाचा किंवा कार्टीलेज च छोटासा तुकडा काढून अपेक्षित रिझल्ट मिळवितात. नाकपुड्यांची लांबी रुंदी कमी करण्यासाठी सर्जनना  अलार बेस रीडक्षन ची जरूरी भासते ज्यामध्ये नाकपुड्या जेथे गालांला जोडलेल्या असतात त्या भागातल्या लहान फुगवट्यांना काढून नाक धारदार केले जाते.
  • वाढीव रीहनोप्लास्टी:[Augmentation] नाकाचा आकार बदलण्याची ही आणखी एक लोकप्रिय पध्दत आहे ज्यात डॉक्टर हाडे किंवा पेशी[tissue ] नाकाच्या टोकावर किंवा रेषेवर रोपण करून बासके नाक सरळ करतात. बर्‍याच वेळा सर्जन शरीराच्या इतर भागातून कार्टीलेज  काढून नाकाच्या पडद्यासाठी उपयोग करतात. हेतु साध्य होण्यासाठी डॉक्टर कृत्रिम किंवा जैविक टिश्यूचा वापर करतात.
  • आघातांनंतरची ऱ्हायनोप्लास्टी (post traumatic rhinoplasty): – जर एखाद्या पेशंटच्या नाकाला इजा झाली असेल तर ह्या विशिष्ट प्रकारची ऱ्हायनोप्लास्टी नाकाचे कार्य आणि रूप ह्या दोन्ही गोष्टींच्या अडचणी दूर करते. ह्या प्रक्रियेमध्ये नाक सरळ करणे, नाकाचा मधला पडदा दुरुस्त करणे किंवा तुटलेले किंवा फ्रॅक्चर झालेले नाक बसविणे यांचा समावेश होतो.
  • पुनर्रचनात्मक ऱ्हायनोप्लास्टी (reconstruction rhinoplasty): – ज्या वेळी पेशंटचे नाक अपघातामुळे किंवा काही गंभीर आजारांमुळे पूर्ण पने नष्ट झाले असेल किंवा काही भाग नष्ट झाला असेल, अशा वेळी पेशंटला पुनर्रचनात्मक ऱ्हायनोप्लास्टीची गरज भासते.
  • पारंपारिक ऱ्हायनोप्लास्टी (ethnic rhinoplastic): – पारंपारिक ऱ्हायनोप्लास्टी मध्ये नाकाचा आकार बदलण्याच्या त्याच पद्धतीचा समावेश असतो ज्यामध्ये सर्जन पेशंटच्या चेहऱ्याच्या ठेवणीतील विशिष्ट ठेवण कायम ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतो.

Read Also:What are the Hair care tips after Hair Transplant

ऱ्हायनोप्लास्टीचे यश

ऱ्हायनोप्लास्टीचे यश अचूक निदान काळजीपूर्वक आखलेली शस्त्रक्रिया आणि बारकाईने केलेली देखरेख यावर अवलंबून असते. ज्या अर्थी बहुतांश शस्त्रक्रिया कुशल पुनर्रचनात्मक सर्जन ने केलेल्या असल्यामुळे अनुकूल परिणाम साधता येतात आणि क्वचितच गुंतागुंत होते. सर्वसाधारण गुंतागुंतीमध्ये सूज येणे, जखमा होणे या गोष्टी होऊ शकतात. पण बरे न होण्यास सहसा न आढळणारा विलंब, जंतुसंसर्ग क्वचितच होतो.

तरी सुद्धा शेवटी यशस्वी ऱ्हायनोप्लास्टीचा अंतिम निर्णय हा पेशंट वरच अवलंबून असतो. जर पेशंटला चांगल्या परिणामामुळे समाधान वाटले तरच सर्जन त्या ऱ्हायनोप्लास्टी सर्जरीला यशस्वी झाली असे म्हणतो. तथापि संपूर्ण पुनर्रचनात्मक सर्जिकल प्रक्रियेमध्ये निष्णात सर्जनची भूमिका असते हे नाकारता येणार नाही. चांगला ऱ्हायनोप्लास्टी सर्जन अचूकतेवर विश्वास ठेवणारा असतो आणि ती प्रक्रोया आणखी परिणामकारक होण्यासाठी त्यांचे कलात्मक कौशल्य दाखवतात. आणि ऑपरेशन नंतरच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून होय, ऱ्हायनोप्लास्टी ही बहुमतांशी पेशंटच्या स्वरूपास उठाव देण्यास यशस्वी होते.