तारुण्यापिटिका आणि व्रण घालवायला लेझरचा उपाय योग्य आहे का?

तारुण्यापिटीकांचे व्रण हे त्यांच्यामुळे होणार्‍या जखमा भरून  येण्यासाठी शरीराचे जे प्रयत्न असतात त्याचा परिणाम असतो. मुळात हे खड्डे किंवा व्रण हे बाह्य त्वचेवर जमा झालेल्या जास्तीच्या कोलाजेन नामक द्रव्याची गुठळी असते. अशा प्रकारे कोलाजेन तेथेच कायमचे राहून मुरूमांचे व्रण बनतात. तथापि कांही बाबतीत सगळेच व्रण हे खरोखरचे व्रण नसतात,तर ते जास्ती चे रंगद्रव्य असते. हे रंगद्रव्य बरेचदा थोड्या महिन्यात किंवा कांही वर्षात फिकट होते, पण त्यांची मुरूमांच्या व्रणासारखी कायमची खूण राहत नाही.

म्हणून मुरूमांचे व्रण घालविण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, जे विशेषत: फक्त प्रभावित क्षेत्रावरच भर देतात आणि बाजूच्या उतींना हानी पोहोचवित नाही. तरीही, लेझरने मुरूमांचे व्रण काढणे हे  एक अत्यंत जोखमीचे काम आहे आणि ते प्रशिक्षित एक्स्पर्ट जे FDA ने मंजूरी दिलेल्या लेझर टेक्नॉलॉजी चा उपयोग करतात अशाच लोकांकडून आणि काळजीपूर्वक रित्या करून घ्यावी .

लेझरने  मुरूमांचे व्रण घालविणे 

लेझर टेक्नॉलॉजी मध्ये, लेझर उच्च तीव्रतेचा प्रखर मोनोक्रोमटिक लाइट निर्माण करते ज्याने कशावरही परिणाम घडतो.  त्वचेमधील पाणी हा लेझर लाइट शोषून घेतो आणि त्यामुळे खराब पेशी बाष्पीभवनाने त्वरित नाश पावतात. हे लेझर किरण त्वचेत आपल्याला पाहिजे तेव्हडे खूप खोलवर जाऊ शकतात. तेव्हा ही उपाय योजना गुंतागुंतीची होऊ नये म्हणून एखाद्या एक्स्पर्ट व्यावसायिकाकडूनच  होईल ह्याची खात्री करून घ्यावी. आता लेझर ट्रीटमेंटची  तीव्रता ही व्रणांच्या प्रकारावर अवलंबून असते. त्वचेच्या पोताप्रमाणे पण लेझर ट्रीटमेंट वेगवेगळी असते. खराब पेशी काढून टाकल्याबरोबर लगेचच नवीन पेशीची उत्पत्ति सुरू होते. नवीन त्वचा नितळ असते आणि ती एकंदरीत त्वचेला तरुण आणि कायापालट झालेले रूप देते.

लेझर ट्रीटमेंट मध्ये, लेझर किरण मुरूमाना कारणीभूत होणार्‍या जंतूंना परिणामकारकरीत्या  मारण्यासाठी मुरूमानी बाधित भागांवर लेझर किरण सोडले जातात. लेझर किरण व्रणाना  विरोध  करणार्‍या कोलाजेनची पण अतिरिक्त वाढ थांबवतात. असे जरी असले तरी  अक्नेवर लेझर ट्रीटमेंट एकाच सेशन मध्ये अंतिम रिझल्ट देऊ शकत नाही. म्हणून हे जरुरीचे आहे की पेशंटने त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेऊन ह्या प्रक्रियेबाबत वास्तववादी अपेक्षा ठेवाव्या.

Read AlsoTreatment Options For Hair Loss

प्रक्रियेनंतर होणारे परिणाम

लेझरने मुरूमांचे व्रण घालविल्यानंतर जखम भरून येण्याचा काळ हा ट्रीटमेंट ची व्याप्ती, ट्रीटमेंटचे क्षेत्र, आणि रोग्याच्या शरीराच्या जखम भरून येण्याचा वेग यावर अवलंबून असतो. तरीही सरासरी,हे परिणाम दिसायला काही आठवडे [अंदाजे दोन ते तीन आठवडे] लागतात. काही वेळा जखम भरून येण्यास काही महीनेसुद्धा लागू शकतात. त्यामुळे पेशंटसाठी सर्जनने  दिलेल्या  सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत महत्वाचे असते.

 लेझरने  मुरुमांचे व्रण घालविण्याच्या वेळी होणार्‍या गुंतागुंती

लेझरने मुरुमांचे व्रण घालविणे  हे अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान आहे. तरीही बरेच लोक लेझर ट्रीटमेंट बद्दल वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. अशावेळी  सर्जनच्या शिफारसीवरच विचार करावा, ज्या योगे कमीत कमी गुंतागुंत होण्याची शक्यता होईल. सर्वसामान्य साईड इफेक्ट म्हणजे लालसरपणा सूज, खाज येणे आणि ट्रीटमेंट घेतलेल्या त्वचेचे सालपटे निघणे. नशीबाने यातील एक ही कायम स्वरूपी नसते आणि काही दिवसातच नाहीशी होते.

लेझर जर गैर प्रकारे हाताळले तर त्वचा भाजण्याचा संभव असतो आणि त्यामुळे त्वचेवर तीव्र रंगद्रवयाचे चट्टे पडतात. भारतीय त्वचेवर त्वचा निस्तेज होण्याचा पण संभव असतो.

Read AlsoSide Effects of Hair Transplant

उपचार संपल्यानंतर घेतली जाणारी दक्षता

मुरूम आणि त्यांचे व्रण घालवण्याची लेझर ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्वचा नाजुक आणि संवेदनशील  [हळवी] झालेली असते. अशी नुक्तीच ट्रीटमेंट घेतलेल्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडू देऊ नये. जर खूप वेळ सूर्याचे किरण पडणार असतील तर सर्जन संनस्क्रीन लोशन ची शिफारीश करतात.

लेझर ट्रीटमेंट चे भारतात  दर 

लेझर ट्रीटमेंटचे प्रत्येक सेशन चा अंदाजे दर, रुपये 1500 किंवा $30.पण तरीही हे रेट क्लिनिक च्या लोकेशन प्रमाणे पण बदलू शकते, एका  सेशन मध्ये कधीच पाहिजे असलेला रिझल्ट मिळत नाही म्हणून ही लेझर सेशन ट्रीटमेंट एका आठवड्यातून अथवा दोन आठवड्यातून करून घ्यावी लागते. समाधानकारक रिझल्ट मिळण्यास पाच किंवा सहा सेशन ची गरज असते.

लेझरने  मुरूम आणि व्रण घालविणे योग्य आहे काय?

ह्याचे उत्तर “हो” आणि “नाही” कारण मुरूमांसाठी लेझर ट्रीटमेंटच्या परिणामकारकतेला सिद्ध करणारे बरेच रिपोर्ट आहेत. लेझर ट्रीटमेंट चे रिझल्ट भरपूर आहेत यात शंका नसली तरी ते कायमस्वरूपी नाहीत. म्हणून  जर कोणी कायमस्वरूपी रिझल्टची  अपेक्षा करीत असतील तर ब्लु लाईट थेरपी हा एक खरोखर योग्य उपाय आहे.पण जर कोणाला जलद उपाय हवा असेल तर लेझर ट्रीटमेंट हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.