लिपोसक्शन की लिपोलिसिस: वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला प्रमाणबद्ध करणारी कोणती प्रक्रिया आपण निवडली पाहिजे?

आजकाल आपले सौंदर्य वाढविणाऱ्या खूप कॉस्मेटिक प्रक्रिया उपलब्ध आहेत. खरी गोष्ट अशी आहे की,रोज आपण ऐकतो की, कॉस्मेटिक सर्जन आपल्याला सुरक्षित, परिणामकारक आणि अर्थातच सुंदर करण्याचे एकापेक्षा एक पद्धतींचे प्रस्ताव पुढे करतात.  चेहरा आणि शरीर ह्यांच्या साठी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. ह्या सर्व प्रक्रियांमध्ये सर्वात जास्त लोक शरीर प्रमाणबद्ध करण्याची जी प्रक्रिया निवडतात ती आहे, लिपोसक्शन. ह्या प्रक्रियांमध्ये त्वचेच्या खालील भागातून कॉस्मेटिक पद्धतीने आणि कायमस्वरूपी चरबी हटवली जाते. तरीपण ह्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच दंतकथा आणि तथ्य आहेत. जरी हि एक फक्त कॉस्मेटिक प्रक्रिया आहे जी फक्त सौंदर्याच्या हेतूने कामात येते, लोक ह्याला वजन कमी करण्याची सर्जरी समजतात.

मिथक १ लिपोसक्शन हा आहार आणि व्यायाम ह्यांच्याबद्दल एक पर्याय आहे.

आपला जास्तीत जास्त जाडेपणा आणि दु:ख अशामुळे उत्पन्न होते,कारण आपण दिवसात ३० मिनिट सुद्धा योग्य आहार आणि व्यायामाचे पालन करण्याची अनिच्छा असते. आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की, लीपोसक्षण ने एका जागेवरची चरबी कमी केल्याने आदर्श शरीर प्राप्त होण्यास मदत होते. हे आपण नाकारू शकत नाही की लिपोसक्शन एखाद्या जागेवरची चरबी कमी करण्यास मदत करते आणि हट्टी जागेवरची चरबी जिथून योग्य आहार आणि व्यायामाने सुद्धा निघत नाही ती हटवली जाते. परंतु लीपोसक्षण नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी आहार ह्यांच्या फायद्याच्या बदली पर्याय होऊ शकत नाही.  हे हलक्या प्रतीच्या आहाराची सवय आणि निष्क्रियते साठी प्रतिरक्षी( अन्तीडोट) नाही आहे. हे फक्त आपल्या शरीरातून चरबी काढून शरीर प्रमाणबद्ध करते. जर आपण आरोग्यपूर्ण सवयींचे पालन केले नाही तर वजन वाढणे अपरिहार्य आहे.

मिथक २:- लिपोसक्शन हि वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया आहे.

ह्याचे सरळ उत्तर आहे, नाही.

हि शरीर प्रमाणबद्ध करण्याची प्रक्रिया आहे. हि मांड्या,ओटीपोट,हात अशा विशिष्ट भागातून चरबी कमी करून आपल्याला सडपातळ रूप देते. जेंव्हा बाकीच्या शरीर प्रमाणबद्ध करण्याच्या प्रक्रियांबरोबर संयुक्तपणे काम केले तर परिणाम फार सुंदर होऊ शकतो. आपल्याला काय निवडायचे आहे? लीपोसक्षण की वजन कमी करण्याची सर्जरी?अजून माहितीसाठी वाचा-

मिथक ३:- आधुनिक काळात लीपोसक्षण त्वरित आणि जास्त परिणामकारक असते.

होय! आज ह्यामध्ये  वेगवेगळ्या तर्‍हेच्या पद्धती उपलब्ध आहेत ज्या त्वरित परिणाम दाखवण्याचा दावा करतात. ह्यापैकी कांही तर “लंच टाईम’’ प्रक्रिया म्हणून ओळखली जाते जिच्यात छेद आणि बरे होण्याच काळ कमी असतो. तरीही हि गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की “लंच टाईम लिपो” किंवा बाकीच्या खूळ लागलेल्या प्रक्रिया शेवटी हानिकारक होऊ शकतात. सगळ्या लिपोसक्शन प्रक्रिया ज्या कांही बदल घडवून आणतात, किंवा लक्षणीय परिणाम दाखवतात, त्यामध्ये छेद, गुंगीचे औषध, आणि सर्जरी नंतर चा उचित बरे होण्याचा काळ हे सर्व अनिवार्य असते. हो,पण आपल्या शरीराला चांगले दिसण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे असते. कुठलीही गोष्ट निमिषार्धात होत नाही. आता जाणून घ्या लिपोसक्शन आणि लिपोलिसिस मध्ये काय फरक आहे.

मिथक ४:- एक चांगले लिपोसक्शन म्हणजे प्रमाणबद्ध शरीर. जर ह्या प्रक्रियेनंतर आपले वजन वाढले तर किंवा आपण बेडौल दिसायला लागलात तर समजा की हि क्रिया अर्धवट आहे.

काही बाबतीत हे खरे आहे. म्हणूनच कॉस्मेटिक प्रक्रिया करताना नेहमी योग्य शिकलेल्या सर्जन कडे जाण्याचा सल्ला दिला जातो. नेहमी अशी अनियमितता  सर्जरीनंतर रोग्याचे वजन वाढण्यामुळे होते. लिपोसक्शन लक्ष्य केलेल्या क्षेत्रातून चरबीला कायमचे काढून टाकते. तरीही जर कोणाचे सर्जरीनंतर वजन वाढले तर ते शरीराच्या दुसर्‍या भागात ( ज्याला प्रक्रिये दरम्यान लक्ष्य केलेले नसते) सूज येते ( कारण चरबीच्या पेशी वाढतात) ह्याचा परिणाम बेडौल रुपात होतो. ह्यासाठी पेशंटला कॅलरीवर नियंत्रण ठेवणे आणि  लिपोसक्शन केल्यानंतर सुद्धा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

मिथक ५:- लिपोसक्शन केले तरीही चरबी च्या पेशी वाढतात.

जन्मल्यानंतर आपण कुठल्याही चरबीच्या पेशी पैदा करू शकत नाही. चरबीच्या पेशी फक्त आपले वजन कमी करताना किंवा वाढवताना मोठ्या किंवा छोट्या होतात. लीपोसक्षण मध्ये असे अनुवंशिक प्रलक्षित क्षेत्र जिथे जास्त चरबी असते( उदा. ओटीपोट,कुल्ले, मांड्या इत्यादी),तेथून काढली जाते. एकदा पेशींना काढून टाकले म्हणजे त्या कायमच्या गेल्या. जर सर्जरीनंतर आपले वजन वाढले तर बाकी पेशींवर परिणाम होतो आणि त्या आकारात वाढतात. आणि आपण जाड दिसू लागतात. असे होऊ शकते जर आपण कार्बोहायड्रेट  और डायेटरी फैट ने भरपूर खाणे खात राहिलात,ज्याला आपण जंक फूड म्हणतो , तेंव्हा वजन वाढते. तरीही वयस्क माणूस जास्त फॅट पेशी पैदा नाही करू शकत.

मिथक ६:- लिपोसक्शन हा टम्मी टक च्या पेक्षा चांगला पर्याय आहे.

शरीराला प्रमाणबद्ध करणे अनुकुलीत झाले पाहिजे. लिपोसक्शनने पोटाची चरबी काढून टाकली जाते. आणि पोटाची त्वचा ताणली जाते . परंतु त्या भागावरील स्ट्रेच मार्क ,विशेषत: बायकांसाठी, नाही घालवू शकत. जर समस्या जास्त  चरबीची असेल तर लिपोसक्शन हा चांगला पर्याय आहे, पण जर समस्या जास्त चरबी, ढिली त्वचा, स्ट्रेच मार्क, सैल आतली कमरेची पट्टी, ( जिला फाशिया पण म्हणतात) किंवा पोटाच्या स्नायूंची वाईट अवस्था ह्या सर्व कारणांसाठी असेल तर लिपोसक्शन चा उपयोग होत नाही. ह्या बाबतीत फक्त एकच पर्याय राहतो तो म्हणजे टम्मी टक.