कायम स्वरूपी आणि तातपुरत्या प्रक्रिया

फेशियल फिल्लर ही चेहर्‍यावरच्या नको असलेल्या सुरकुत्या आणि रेघा नाहीसा करण्याचा प्रसिद्ध मार्गा पैकी एक मार्ग आहे. या फीलर्सचा सर्वात जास्त उपयोग डोळे,नाक,आणि ओठांच्या भोवती केला जातो. या पैकी काही परिणाम कायम स्वरुपी असतात तर काही तात्पुरते असतात . सर्जन चेहर्‍याच्या कातडीच्या खाली फेशियल फिलर्स भरून तिचा आकारमान वाढवितात .आणि ओठांच्या, नाकाच्या आणि डोळ्याभोवतीचा सुरकुत्या नष्ट करतात. हे डर्मल फिलर्स असतात जे त्वचा घट्ट करतात आणि ती ताजीतवानी दिसायला लागते .

फेशियल फिलर्स सामन्यात: दोन प्रकारचे असतात . कायम स्वरुपी किंवा प्रदीर्घ आणि तात्पुरते फेशियल फिलर्स

प्रदीर्घ किंवा कायम स्वरुपी फेशियल फिलर्स– अशी उपचार पद्धती अंगिकारताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण जे परिणाम मिळतात ते जर नीटपणे प्रक्रिया केली गेली असेल तर,कायमचेच राहतात. सर्जनचा अनुभव आणि कौशल्य यांच्या मदतीने परिणाम काय मिळू शकतील याचे भविष्य करता येते. सगळ्यात सामान्य प्रदीर्घ फिलर्स म्हणजे सिलिकॉन, बेल फिल  आणि शरीराच्या इतर भागातून काढलेल्या चरबीचे स्थानांतरण. चरबीच्या स्थानांतरणामध्ये   शरीराच्या इतर भागातून जसे, ओटी पोटावरून किंवा मांड्यां मधून चरबी काढली जाते. आणि अश्या तर्‍हेने सौंदर्याच्या समस्यांवर उपाय काढला जातो. ओठांना उभार आणण्यासाठी सिलिकॉन सुद्धा उपयोगात आणले जाते ज्याने ओठांना मऊपण आणि नैसर्गिक रूप मिळते सिलिकॉन फिल्लर अक्णे आणि व्रणांवर उपचार करण्यास अतिशय उपयोगी पडते . या उलट बेलफिल्ल हे अर्धं–कायम,द्रावण असते जे अक्नेच्या व्रणांवर उपयोगात आणतात. आणि ते कोलाजेणचा उपयोग करून त्वचेचा मुलायमपण सुधारण्यास मदत करते. याचे परिणाम पाच वर्षा पर्यंत टिकतात .

तात्पुरते फेशियल फिलर्स- सगळ्यात सर्व सामान्य वापरला जाणारा फेशियल फिलर्स तात्पुरते परिणाम दाखवतो आणि त्याचा वर वारंवार प्रत्येक वेळी उपयोग करावा लागतो. अशा तर्‍हेची ही इतर सर्जिकल प्रक्रिये पेक्षा सर्वात कमी अपायकारक आहे. तरी ही तात्पुरते फेशियल फिलर्स उत्कृष्ट परिणाम देतात. आणि यशस्वीरीत्या वृद्धत्वाच्या खुणा नष्ट करतात.या फिलर्स सर्वात सुरक्षित मानल्या जातात. सगळ्यात सर्व साधारण तात्पुरते फिलर्स म्हणजे जुवेदर्म,रेस्तिलेन आणि स्कल्पट्रा

तात्पुरते विरुद्ध प्रदीर्घ–  जेव्हा लोक चेहर्‍याचे रूप पुन्हा तरुण करण्या साठी सौंदर्यवर्धक प्रक्रियेचा विचार करतात तेव्हा काही विशेष गोष्टींची दखल घेतली पाहिजे. अशा काही वेगवेगळ्या  सौंदर्यवर्धक प्रक्रिया आहेत त्यापैकी काही कमी अपायकारक प्रक्रिया स्वाभाविक रित्या आकर्षक असतात आणि सामान्यत: अल्प मुदतीच्या त्रास होतो. या उपर या मध्ये स्कार ,व्रण ,जखमा किंवा सूज येत नाही. आणि काही उपचारांमध्ये बोतोक्स. कातडीचे फिलर्स, लेजर आणि IPL थेरपी , रासायनिक सोलण्याची क्रिया उपचार करणे इत्यादि.

बोटाक्स ही कमीत कमी अपायकारक प्रक्रिया आहे जी डोळ्यांच्या बाजूला ,भिवई ,आणि कपाळ या मध्ये येणार्‍या सुरकुत्या निर्माण करणार्‍या स्नायूंना आराम देते . याचे परिणाम सामन्यात: प्रक्रिया केल्यानंतर दोन ते चार महिन्या पर्यंतच टिकतात. त्यामुळे परिणाम कायम ठेवण्यासाठी पेशंटला पुन्हा पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागते त्वचेचे फिलर्स जास्त काल टिकतात परंतु ते पचाराची जागा आणि वापरलेला फीलर्सचा प्रकार यावर अवलंबून असतात सर्जन आणि पेशंट यांच्या निवडीचा पण विचार करावा लागतो .

कायम स्वरुपी फिलर्स अनेक  दोषांमध्ये एक मोठा दोष म्हणजे मिळालेले रिझल्ट दुरुस्त करता येत नाही की परतवता येत नाही . फेस लिफ्ट प्रक्रिया ही त्या पेंकीच एक ही कायम स्वरुपी प्रक्रिया किंवा प्रदीर्घ प्रक्रिया ही एक वर्षापर्यन्त टिकते . सर्जन सामन्यात: फेशियल रेजुविनेशन सर्जरीला कायम स्वरुपी सर्जरी म्हणतात जी त्वचेचा आणि मानेचा घट्टपणा मध्ये खूप सुधारणा घडवून आणते . परिणाम सामान्यत: सात ते दहा वर्ष टिकतात. अर्थात परिणाम आणि त्वचेची काळजी घेण्याचे मार्ग या मध्ये व्यक्ति व्यक्तिमध्ये फरक असतो. एकदा प्रदीर्घ किंवा कायम स्वरुपी प्रक्रिया करून घेतल्या नंतर सात ते दहा वर्षा नंतर पुन्हा दुसर्‍यांदा ही प्रक्रिया करून घेण्याची इच्छा करतात .

अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी प्रक्रिया करून घ्यायची तिचा खर्च! यात काहीच शंका नाही की तात्पुरत्या प्रक्रियेला कायम स्वरुपी प्रक्रिये पेक्षा कमी खर्च लागतो. शेवटी दोन्ही प्रकारच्या तात्पुरत्या आणि कायमच्या प्रक्रिये बद्दल आता विचार करण्याची गरज आहे. कारण तरुण मुलांना त्यांचे रिझल्ट सारखे बदलायचे असतात म्हणून ते तात्पुरत्या प्रक्रिया करून घेतात तर वयस्क पेशंटना मिळालेले रिझल्ट कायम राहावे म्हणून ते प्रदीर्घ प्रक्रियेला प्राधान्य देतात.