हेयर  ट्रान्सप्लांटसाठी  भारतात वैद्यकीय पर्यटन

भारत हा संस्कृतीच्या वारसाने  समृद्ध, अप्रतिम सौंदर्य आणि निरामय शांत असा देश आहे. लोक भारता कडे केवळ त्याच्या जागतिक आकर्षक सुंदरतेमुळे आकर्षित होत नाही तर त्यांच्या शरीर, मन आणि आत्म्याच्या आरामासाठी आकर्षित होतात. हो, प्राचीन भारत आताच्या भारतापेक्षा वेगळा असेल.  पण हे नाकारून चालणार नाही की, सध्या भारताचे वैद्यकीय पर्यटनासाठी उच्च श्रेणीचे स्थान आहे.

सौंदर्य हे नेहमी आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाशी जोडलेले असते आणि हे नेहमी जतन आणि पुनर्निर्माण करावे लागते. केस हे खरोखर आपल्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग आहे, जो  व्यक्तीचा आत्मसम्मान आणि प्रभा यांच्या वर मानाचा शिरपेंच खोंचते .म्हणून जे केस गळणे ह्या समस्येने किंवा टकलाच्या समस्येने त्रस्त झालेले असतात ते अशा ठिकाणाच्या शोधात असतात, जेथे यशस्वी आणि सुरक्षित हेयर ट्रान्सप्लांट पद्धत असेल. अभ्यासाने हे सिद्ध झाले आहे की भारत हा त्याच्या साधनसामुग्रीच्या, कलेने समृद्ध असल्यामुळे रिस्तोरेषण क्लिनिक मध्ये अग्रगण्य समाजाला जातो. आणि जग भरातल्या लोकांमध्ये हेयर ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आवडते स्थान पटकावून आहे.

अलीकडेच पाश्चिमात्य आणि अमेरिकन ,ज्यांनी भारत आणि इतर आशियाई देशांमधून हेयर ट्रान्सप्लांट सर्जरी करून घेतली त्यांची संख्या ९०,००० पर्यंत पोहोचली आहे .म्हणून हे स्पष्ट झाले आहे की पेशंट हेयर ट्रान्सप्लांट करून घेण्यासाठी भारतात मोठ्या संख्येने येत आहेत ते फक्त त्यांच्या खिशाला परवडणारे दर आहेत म्हणून नव्हे तर FAU हेयर ट्रान्सप्लांट भारतामध्ये जगातल्या इतर भागांपेक्षा जास्त प्रमाणात केला जातो म्हणून.

भारत “अतिथी देवो भव” हा प्राचीन आदर्श जाहीर करीत असतो, ज्याचा अर्थ आमच्यासाठी अतिथी हा देवासारखा असतो हा आहे. म्हणून आपल्या संस्कृती प्रमाणे आपण आपल्या पाहुण्यांची चांगली काळजी घेण्याचा प्रयत्न करतो . म्हणून जेंव्हा पाहुणचाराचा प्रश्न येतो तेंव्हा भारताची कुणीच बरोबरी करू शकत नाही. आपले डॉक्टर्स आणि परिचारिका त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल  आणि पेशंटशी  सहानुभूतीपूर्वक वागणुकीबद्दल जगभर प्रसिध्द आहेत. ते अतिशय प्रशिक्षित ,अनुभवी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत आहेत. भाषा! भाषेची त्यांना काहीच अडचण नाही कारण ते उत्तम इंग्लीश बोलू शकतात. सगळ्यात चांगले हे आहे की ह्या जगातील इतर कुठल्याही मानकांच्या तोडीस तोड असलेल्या ह्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही अतिशय परवडणाऱ्या किमतीत हेयर ट्रान्सप्लांटचे  तंत्रज्ञान मिळवू शकतात.

Read AlsoTreatment Options For Hair Loss

आंतरराष्ट्रीय पेशंटना भारतात वैद्यकीय पर्यटनासाठी आकर्षित करणारे मुद्दे :

१]सुरक्षितता :जास्तीत जास्त  क्लिनिक आणि सुपर स्पेशियालिटी हॉस्पिटल हे चांगल्या शहरात उघडलेले असल्याने रस्ते अपघात ,चोरी किंवा फसवणूक क्वचितच होते. हॉटेल्स सुरक्षित तरीही स्वस्त आहेत. आणि एक दिवसाला $20 ते $80 हयापासून कुठल्याही श्रेणीत उपलब्ध आहेत. जर गरज पडली तर क्लिनिक आणि नर्सिंग होम पण पेशंट ची काळजी घेण्यासाठी आटेण्डटची सोय करून देतात.

2] विमानाची तिकिटे :बर्‍याच क्लिनिकचे एजंट बरोबर लागेबांधे असल्याने ते सामान्य किंवा ऑनलाईन पेक्षा कमी दरात तिकीट मिळवून देतात ज्यामुळे पेशंटला कॉस्मेटिक सर्जरीमधून बाहेर पडल्या पडल्या ह्या  ताण तणावाला तोंड द्यावे लागत नाही.

3] वास्तव्य:  आधी नमूद केल्याप्रमाणे हॉटेल ऑनलाईन वरून वाजवी दरात बुक करता येतात. खरे तर क्लिनिक किंवा हॉस्पिटलच पेशंटच्या विंनंतीवरून हॉटेल च्या लिंक किंवा वेबसाईट पुरू शकतात.

4]शहराचा फेरफटका :पूर्व सूचनेवरून पेशंटला प्रक्रियेच्या आधी किंवा नंतर शहराचा फेरफटका पण मारण्यासाठी योजना केली जाते. बर्‍याच भारतीय शहरांमध्ये समृद्ध ऐतिहासिक ठिकाणे, जसे देवळे आणि पुरातन कालीन इमारती आहेत. म्हणून पेशंट भारताचे सौंदर्य आणि आतिथ्य एकाच वेळी अनुभवतात.

5] खाण्या पिण्याच्या सवयी :ही एक महत्वाची समस्या आहे जेंव्हा इतर संस्कृती किंवा देश यांचा प्रश्न येतो. काही वेळा दुसर्‍या देशातील पेशंटना भारतीय खाद्य पदार्थांशी जुळवून घेणे कठीण पडते. पण ह्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण आता सगळी कडे इटालीयन,असो व चायनीज ,स्पॅनिश,मेक्सिकन सगळ्या प्रकारचे अन्न मागणी केल्याबरोबर उपलब्ध होते. आणखी एक गोष्ट म्हणजे जगातले लोकप्रिय ब्रॅंड हॉटेल्स जसे मक डोनाल्ड, KFC,कॉफी शॉप जवळपास मिळतात. तेंव्हा आता उपास अजिबात पडणार नाही.

म्हणून भारत हा वैद्यकीय पर्यटना साथी सर्वात सोयीचा का आहे ह्याची हजारो करणे आहेत. तेंव्हा तुम्ही सुट्टीत भारतात  येण्याची योजना बनवा आणि  व्यावसायिक लोकांकडून हेयर ट्रान्सप्लांट करून घ्या .