आपण शेवटचा केस गळेपर्यंत वाट पहाणार आहोत का?
केस गळणे ही स्त्री पुरुषांमध्ये सामान्य समस्या आहे. थोडे केस गळणे साहजिकच नेहमीसारखे केस गळण्यासारखे अपरिहार्य असते. कारण त्यांच्या जीवन चक्रात शेवटी केस नैसर्गिक रित्या गळतात. रोजचे विंचरणे आणि शैंपू करणे ह्यामुळे केसांची मुळे कमजोर होऊन शेवटी ते केस गळण्यास कारणीभूत होतात. म्हणजे नैसर्गिक केस गळणे हे रोज अंदाजे 50 ते 150 केस गळणे होय. पण जर हयापेक्षा जास्त केस गळायला लागले तर मात्र ह्या गोष्टीबद्दल जागरूक होण्याची हीच वेळ आहे.
पुरुषांचा टकलाचा नमूना हे सर्वसामान्य केस गळण्याचे कारण आहे आणि ते आनुवांशिक वैशिष्ठ्य असू शकते. पण पुरुषांमध्ये अतिशय वेगाने केस गळण्यास सुरुवात झाली तर खूप व्यापक टकलाची सुरुवात झालेली असते. पुरुषांच्या टकलाच्या नमुन्यामध्ये केस गळणे, केसांची रेषा मागे जात आणि डोक्याच्या वरच्या भागात टक्कल येणे हे होय .स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्री पॅटर्न [नमूना] टक्कल पडते ज्याचा परिणाम म्हणून भांग फाटायला सुरुवात होते आणि सगळ्या स्काल्प वर केस विरळ होतात.
केस गळण्याची बरीच कारणे आहेत
- जीन्स [जनुके] – अँड्रोजेनेटिक ऍलोपेशिया मुळे केस गळतात, जेंव्हा व्यक्तिच्या क्रोमोसोम्स मध्ये विशिष्ट प्रकारचे जेनेटिक कोड असतात. हे विशिष्ट प्रकारचे टक्कल एका जनुकाकडून किंवा जनुकांच्या समूहाकडून बहुधा एक तर आईकडून किंवा वडिलांकडून वारसा हक्काने जाते.
- हार्मोन्स [संप्रेरके] – बर्याच प्रकारच्या अँड्रोजेन मुळे स्काल्पच्या वेगवेगळ्या भागात केसांच्या फॉलिकल वर परिणाम घडतात. जे केसांचे फोलीकल अन्द्रोजेन च्या बाबतीत संवेदनशील असतात ते गळू शकतात आणि केस विरळ होण्यास कारणीभूत होतात.
- ताण – केस गळण्याचे हे सर्वात प्रमुख कारण आहे. ताण आपल्या सोबतच असतो. आणि त्यात नवीन काहीच नाही. तरीपण काही विशिष्ट आजार आणि बाळंतपण हे सुद्धा तात्पुरते केस गळण्याचे कारण होऊ शकते. बुरशीमुळे होणारा गोल कृमींचा संसर्ग पण केस गळण्यास कारणीभूत होतो.
- औषधे– ब्लडप्रेशर वर रक्त पातळ करण्याची औषधे, संतती नियमनाच्या गोळ्या, याशिवाय कॅन्सर वर उपचार करणारी केमोथेरपी ची औषधे हे तात्पुरत्या पण प्रचंड प्रमाणात केस गळण्याचे कारण असते.
- काही स्व-प्रतिरक्षित (autoimmune) आजार – हे आजार ऍलोपेशिया अरिटा ह्या टक्कलाला निर्माण करतात. ऍलोपेशिया अरिटा मध्ये रोगप्रतिकारशक्ती फिरते आणि केसांच्या फोलीकल वाढीस प्रतिबंध करते. तरीही केस परत वाढू शकतात आणि त्यांची जाडी पण काही दिवसानी परत मिळवतात.
- सौंदर्यवर्धक प्रक्रिया – शांपू करणे, ब्लीचिंग, केसांना अतिरिक्त कलप वापरणे, ह्यामुळे केस कमजोर आणि नाजुक होऊन संपूर्णतः विरळ होतात. घट्ट वेणी घालण्याने, गरम कर्लर (केस कुरळे करण्याच्या) यंत्राने केसांचे नुकसान होऊ शकते.
- वैद्यकीय स्थिती – थायरोइड, डायबीटीस, आहारामुळे होणारे विकार, ऍनेमिया ह्या सारख्या वैद्यकीय कारणांनी पण केस गळती होते जिच्यावर इलाज करणे अत्यंत आवश्यक आहे.
केस गळण्याचे वेगवेगळे स्तर
सर्वात कॉमन केस गळतीचा प्रकार म्हणजे अँड्रोजेनिक ऍलोपेशिया, जो पुरुष [पॅटर्न] नमूना टक्कल म्हणून प्रसिद्ध आहे. 90% पुरुष ह्या पुरुष नमूना टक्कलाने त्रस्त असतात असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. पुरूषांना हा प्रकार अगदी लहान वयात सुरू होतो आणि जनुकीय पूर्ववृत्ति आणि पुरुष लैंगिक हार्मोन्स ह्यांच्या संयुगानेसुद्धा होतो.
पुरुषी टक्कलाच्या नमुन्याचे केस गळण्याचे बरेच नमुने आणि स्तर आहेत. सगळ्यात सामान्य सुरुवात म्हणजे कपाळावरून केसांची रेषा मागे जाऊ लागते. आणि माथ्यावर केस विरळ होतात.
केस गळण्याच्या वेगवेगळ्या पायर्या आहेत. त्या म्हणजे
- पहिली पायरी – ही पौंगडावस्थेतील वरच्या भिवईवरील केसांची रेषा दाखविते. केसांच्या रेषेवर आणि मुकुटावर केस गळतीच्या काही खुणा दिसत नाही.
- दुसरी पायरी – वरच्या भिवईवरती प्रौढ केसांच्या रेषेची आघाडी दिसायला लागते. ह्या पायरीत केस गळती सौम्य असते. आणि पुढच्या भागावर परिणाम दिसायला लागतो.
- तिसरी पायरी – ही टक्कलाची सुरुवातीची पायरी आहे, ज्यात पुरुषांच्या कपाळावर समप्रमाण पिछाडी दिसायला लागते जी एकतर पूर्ण उघडी किंवा तुरळक केसांची बनलेली असते. त्याच्या जोडीला माथ्यावर केसांचा विरळपणा पण दिसायला लागतो.
- चवथी पायरी – ह्यामध्ये कपाळावर पुढच्या बाजूला पिछाडी गडद होत जाते. केस गळती माथ्यावर आणि डोक्याच्या बाजूला स्पष्ट दिसायला लागते.
- पाचवी पायरी – ह्या पायरीत अतिशय केस गळतीची सुरुवात होते जी पाठीमागे घटत जाणार्या केसांच्या रेषेमध्ये आणि माथ्यावर होणार्या गळती मध्ये विरळ केसांची छोटी सीमा रेषा मागे सोडते. कपाळाचे क्षेत्र मोठे आणि लक्षणीय दिसू लागते.
- सहावी पायरी – माथ्यावर जवळ-जवळ सगळेच केस गळतात. आणि टकला भोवती घोड्याच्या नालेसारखा केसांचा आकार होतो.
- सातवी पायरी – ही केस गळतीची अंतिम अवस्था आहे, ज्यात बाजूला आणि डोक्याच्या पाठीमागे अगदी थोडेसे केस शिल्लक राहतात.
तुम्ही सगळे केस गळून जाईपर्यंत वाट बघणार का?
म्हणून तुमचे सर्व केस गळेपर्यंत वाट न बघता ताबडतोब पावले उचलणे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा केस गळतीची प्रारंभीची लक्षणे दिसायला लागतील, तेंव्हा जेव्हड्या लवकर जमेल तेव्हड्या लवकर त्या स्थिती चे निदान करणे आणि इलाज करणे आवश्यक आहे. केस गळतीवर उपचार करण्याचे असंख्य पर्याय आहेत. केस गळतीवर बर्याच औषध योजना आणि नैसर्गिक उपचार ते सर्वात जास्त परिणामकारक उपाय असल्याचा दावा करतात. तरीही हेयर ट्रान्सप्लांट ही सर्वात जास्त परिणामकारक कॉस्मेटिक [सौंदर्यवर्धक] प्रक्रिया आहे जी उत्कृष्ट परिमाण देते.
हेयर ट्रान्सप्लांट ही सर्जिकल प्रक्रिया आहे जिच्या मध्ये डोनर बाजूकडून केसांचे फोलीकल उखडतात जे सामन्यात: डोक्याच्या बाजूला आणि पाठीमागे असतात. आणि ते टक्कलावर किंवा विरळ केसांचा भाग ज्याला रेसिपियंट म्हणतात तेथे रोपण करतात. हेयर ट्रान्सप्लांट मध्ये दोन जास्त सामान्य पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे FUE आणि FUT हेयर ट्रान्सप्लांट.
FUT [Follicular Unit transplantation] मध्ये फॉलिकल चे स्काल्पवर नैसर्गिक रित्या उगवलेले केसांचे गट असतात. आणि एका गटात सामान्यत: 1 ते 4 स्वतंत्र केस असतात. पेशंटच्या डोक्याच्या मागच्या बाजूची पट्टी काढून टकलाच्या भागावर तो केसांचा गट छेदन करून एक-एक ग्राफ्ट बसवितात.
FUE [Follicular Unit Extraction] ही हेयर ट्रान्सप्लांटेशनची दुसरी पद्धत आहे जिच्यात फॉलिकल चा ग्राफ्ट डोक्याच्या मागच्या बाजूने काढून मायक्रोस्कोप मध्ये बघून एक-एक केसांचा ग्राफ्ट घेतात. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे यात शंकाच नाही पण टक्कल जर छोट्याच भागात असेल तर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.
हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रियेनंतर सुधारणेला अत्यंत कमी वेळ लागतो. म्हणून पेशंट अगदी थोड्या दिवसात रोजच्या कामकाजाला सुरुवात करू शकतो. हेयर ट्रान्सप्लांटची किंमत बहुधा डोनर भागावर असलेल्या केसांवर अवलंबून असते. प्रक्रियेच्या किंमतीत इतर घटक देखील जसे, कुठले टेकनिक वापरले गेले, सर्जन चा अनुभव, भौगोलिक स्थान हे पण सामील आहेत. म्हणून लवकर उपाय योजना केली तर ह्यासाठी लागणारी किंमत पण कमी पडते, कारण ह्या प्रक्रियेसाठी ग्राफ्ट ची संख्या कमी लागते.