हेयर ट्रान्सप्लांट चे दुष्परिणाम

लोकांना टकलाशी लढण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट च्या रूपाने सगळ्यात आधुनिक उपाय सापडल्याने केस गळण्याच्या समस्येवर उत्तम उपाय कुठला, ह्यासाठी आता शोधाशोध करण्याची गरज राहिलेली नाही.  हेयर ट्रान्सप्लांट हि एक अशी सर्जिकल प्रक्रिया आहे जिच्यात डोक्याच्या कडेचे किंवा मागचे केस काढून ते समोर किंवा वरच्या बाजूला लावले जातात. हेयर ट्रान्सप्लांट ही लोकल  अनास्थेशिया [स्थानीय भूल] देऊन करतात आणि म्हणून ती एक सुरक्षित प्रक्रिया समजली जाते. असे असले तरी, हेयर ट्रान्सप्लांट मध्ये धोके नाहीत असे नाही. अशा सर्जिकल पद्धतीबरोबर  न टाळता येणारे धोके पण आहेत.

यापैकी काही दुष्परिणाम सहजपणे टाळता येतील जर हेयर ट्रान्सप्लांट या प्रक्रियेत अत्यंत कुशल असलेल्या अनुभवी सर्जन कडून करवून घेतले तर! पण कांही दुष्परिणाम असे सुध्दा आहेत की ते अगदी विचित्र वाटतात. म्हणून ही प्रक्रिया करून घेण्याच्या अगोदर पेशंटला ह्या सौंदर्यवर्धक प्रक्रीयेबरोबर येणारे महत्वाचे दुष्परिणाम माहित असले पाहिजेत.

Read AlsoTreatment Options For Hair Loss

हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया 

 • ही प्रक्रिया सुरु करण्या अगोदर डोक्याचा पृष्ठ भाग [स्काल्प] एक छोट्या सुईने चांगल्या प्रकारे स्वच्छ केला जातो ज्यायोगे स्काल्प्वरचा एकसंध एरिया बधिर होतो. नंतर धारदार चाकूसारख्या स्कालपेल नावाच्या हत्याराने स्काल्प् वरचा केस असलेला गोल भागाचा तुकडा कापून तो एरिया शिवून टाकतात.
 • नंतर सर्जन ह्या स्काल्पच्या कापलेल्या तुकड्याचे धारदार सर्जिकल चाकू आणि सूक्ष्मदर्शक भिंगाच्या सहायाने बारीक बारीक तुकडे करतात. हे केसांचे फोलीकल धारदार सर्जिकल चाकू आणि सूक्ष्मदर्शक भिंगाच्या सहायाने टकलावर रोपण करतात.
 • हे फॉलीकाल रोपण करताना सर्जन ही खात्री करून घेतात की शेवटचे रोपण केलेले केस नैसर्गिक दिसतील. सर्जन स्काल्पवर ब्लेडने किंवा सुईने रोपण करण्या साठी बारीकशी चीर पाडतात. हे रोपण अशा तर्‍हेने केले जाते की ज्यात एकापण फोलीकाल चे  नुकसान होत नाही.
 • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्काल्प कांही दिवसांसाठी कापसाने अथवा बँडेज ने झाकले जाते. सर्जरीनंतर दहा /बारा दिवसांनी टाके काढतात. पेशंटला उत्तम परिणाम मिळण्यासाठी तीन ते चार वेळा असे सत्र करून घ्यावे लागते.

Read Also: Can Hair Loss Happen Even After Hair Transplant

हेयर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया झाल्यानंतर नंतर काय घडते?

हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रिया झाल्याबरोबर पेशंट थोड्याच दिवसात कामावर रूजू होऊ शकतो. सर्जनच्या सल्ल्याने जोमाने व्यायाम पण करू शकता. प्रक्रिया झाल्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात पेशंट चे केस गळू लागतात  ज्याला आपण “शॉक लॉस” असे म्हणतो .नवीन केसांची वाढ सहा ते नऊ महिन्यात सुरु होते. सर्जन केसांच्या वाढीसाठी मिनोक्षिदिल [रोगेन ] किंवा प्रोपेशिया ही औषधे लिहून देतात.

प्रक्रीये नंतरचे संभाव्य दुष्परिणाम 

हेयर ट्रान्सप्लांट ही एक सोपी प्रक्रिया आहे जी झाल्यानंतर कांही छोट्या गुंतागुंती होऊ शकतात. असे असले तरी ह्या गुंतागुंती सगळ्यांमध्ये सारख्याच असतील असे नाही. व्यक्ती व्यक्तिनुरूप  दुष्परिणाम बदलू शकतात.

 • केस विरळ होणे: हेयर ट्रान्स प्लांट करून घेतलेल्या काही लोकांच्या बाबतीत असे आढळून आले की आधीच्या पेक्षा त्यांचे केस विरळ झाले आहेत. हे अत्यंत साहजिक आहे आणि त्याबद्दल घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही स्थिती ऑपरेशन नंतरचा धक्का ह्या कारणाने उद्भवते आणि सर्जरीच्या काही महिन्यानंतर केसांचा घनदाटपण मूळ पदावर येतो.
 • रक्तस्त्राव: हेयर ट्रान्स प्लांट चा दुष्परिणाम कधी कधी जास्त रक्तस्त्राव होण्यात पण होतो अर्थात सगळ्यांनाच होतो असे नाही. उपचार केलेल्या जागेवर जास्त भर देण्याने पण रक्तस्त्राव होतो. तरीही जर रक्तस्त्राव थांबत नसेल तर मात्र ही गंभीर बाब समजून सर्जन चा सल्ला घ्यावा.
 • वेदना : ह्या प्रक्रियेमध्ये वेदना कमीत कमी असतात . म्हणून क्वचितच एखादा पेशंटला वेदनेवर औषध लागते. डॉक्टर बऱ्याच पेशंटना, taylenol सारखे सौम्य वेदनाशामक लिहून देतात जे वेदना कमीत कमी करतात आणि पेशंटला आराम मिळतो.
 • खाज :खाज सुटणे हा एक दुसरा दुष्परिणाम आहे जो विशेषत: ट्रान्सप्लांट केलेल्या जागेवर येतो. हे जखमेवरील खपल्यांमुळे होते थोड्या दिवसात त्या काढाव्या लागतात. आणि हा प्रोब्लेम घालविण्या साठी स्काल्प सौम्य शाम्पूने नियमितपणे धुवावा लागतो.
 • बधिरपण :नव्याने ट्रान्सप्लांट झालेला भाग कांही दिवस ते कांही आठवडे पर्यंत बधिर होतो. परंतु हे तात्पुरते असते.
 • जंतूसंसर्ग: क्वचितच हेयर ट्रान्स प्लांट सर्जरी मध्ये जंतु संसर्ग होतो कारण प्रक्रियेच्या आधी आणि नंतर प्रती जैविके दिली गेली असतात. म्हणून इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते फक्त पेशंटनेच उपचार केलेल्या जागेची योग्य ती स्वछता बाळगली नाही तर.
 • गाठ :केस ट्रान्स प्लांट केलेल्या जागेवर, जिला रीसिपंट जागा म्हणतात, तिथे गाठ उद्भवू शकते. पण ही अवस्था फक्त काही आठवडेच राहते. सिस्ट किंवा गाठ ही  पुळीसारखी किंवा त्याही पेक्षा लहान असते.
 • व्रण राहणे : केलोईड स्कॅरिंग म्हणजे केलोईड व्रण हे हेयर ट्रान्स प्लांट सर्जरीमध्ये आले तरी ते वांशिक कारणाने येतात. अगदी थोड्या पेशंट मध्ये व्रण राहतात जे नंतर खच पडल्यासारखे दिसतात.