व्हेरिकोज व्हेन्स वर घरच्या घरी कसे उपचार करावे?

जेंव्हा नीला रक्तवाहिन्या मोठ्या, विस्तृत होतात आणि त्यात रक्त प्रमाणाबाहेर साठून राहते अशा आजाराला व्हेरिकोज व्हेन्स चा आजार आहे म्हणतात. रोहिण्या ऑक्सिजनमिश्रीत रक्त हृदयाकडून शरीरातील अवयवांकडे घेऊन जातात आणि जेंव्हा सगळे अवयव रक्तातील ऑक्सिजन त्यांच्या कार्याच्या गरजेसाठी उपयोगात आणून असे रक्त आणि टाकाऊ पदार्थ [जसे कार्बन डाय ऑक्साईड ]नीलांमध्ये सोडतात. त्यानंतर निलांमधील रक्त हृदयाकडे परत नेले जाते आणि तेथून फुफ्फुसात नेले जाते जेथे टाकाऊ कार्बन डाय ऑकसाईड काढून टाकून जास्त ऑक्सिजन रक्तात सोडला जातो आणि रोहिण्यांकडून पुन्हा उरलेल्या शरीराकडे जातो. व्हेरिकोज व्हेन्स आजार जेंव्हा नीला रक्ताभिसरण योग्य रीतीने करू शकत नाही तेंव्हा होतो. आणि नीला  रक्तामुळे फुगीर होतात आणि सुजून बाहेर आलेल्या दिसतात. ह्या आजारामध्ये नीला निळसर जांभळ्या किंवा लाल रंगाच्या दिसतात आणि बरेचदा त्या दुखतात. दुसरी लक्षणे म्हणजे बेचैनी, मुंग्या आल्यासारखे वाटणे, धडधड होणे, पायामध्ये जळजळ किंवा जडपणा येणे थकवा येणे इत्यादी. हा आजार अगदी सर्वसामान्य असून स्त्रियांमध्ये जास्त प्रचलित आहे. जरी फक्त सर्जरीने ह्याच्यावर उपचार होऊ शकतात तरी तुम्ही ह्याच्या लक्षणांपासून सुटका मिळविण्यासाठी दुसरे उपचार करू शकतात. तर आता आपण व्हेरिकोज व्हेन्स च्या उपचारात मदत  करणाऱ्या ऍपल  सायडर व्हिनेगर च्या प्रचंड फायद्याबद्दल बोलू.

ऍपल  सायडर व्हिनेगर  व्हेरिकोज व्हेन बऱ्या करू शकेल कारण त्यामध्ये खूप  आवश्यक असे घटक आहेत जे तुम्हाला मदत करतील. त्यात तुमच्या दैनंदिन शरीराच्या कार्यासाठी लागणार्‍या गरजांसाठी महत्त्वपूर्ण असणारे विटामिन्स [A ,B, आणि C] अमिनो ऍसिड कांही एन्झाईम, खनिजे, ऍसिटिक ऍसिड इत्यादी आहेत. हि सर्व रक्तातील दूषित द्रव्ये काढून शरीर स्वच्छ करतात आणि निलांमधून रक्त सुरळीतपणे वाहते. जेंव्हा हे रक्त प्रवाह सुरळीत करतात तेंव्हा निलांमधील जडपणा आणि सूज आणि फुगीरपणा उतरतो. ह्यामध्ये सुज प्रतिबंधक घटक असल्याने मोठ्या प्रमाणात वेदना कमी करते. हे  आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी पायांच्या त्वचेला जास्त शक्ती देते.

तर चला सुरुवात करूया. प्रथम तुम्हाला एक स्वच्छ आणि मऊ कापड लागेल, तुम्ही बँडेज चे कापड किंवा मलमल चे कापड आणि अर्थातच ऍपल  सायडर व्हिनेगर वापरू शकता. आता उपचारासाठी ऍपल  सायडर व्हिनेगर बँडेज तयार करण्याची पद्धत  बघू. यासाठी, बँडेज कपडा किंवा मलमल, ऍपल  सायडर व्हिनेगर च्या द्रावणामध्ये भिजवा आणि नंतर बाधित क्षेत्रावर लावा. सपाट पृष्ठभागावर झोपा ज्यायोगे रक्त शरीरातून खाली पायाकडे वाहणार नाही. तुम्ही एक दोन उशा पण घोट्याखाली आधाराला ठेवू शकता. अर्धा तास ते बँडेज तसेच राहू द्या आणि मग हळुवारपणे काढा. नंतर ते तुम्ही सध्या पाण्याने धुवून काढा. हे दिवसातून दोनदा करा आणि तुम्हाला  नक्कीच लक्षणीय सुधारणा दिसेल. हे  बाधित क्षेत्रावर एकदम करण्या अगोदर तुम्ही  एकदा पॅच टेस्ट करून खात्री करून घ्या. कारण ऍपल  सायडर व्हिनेगर हे आम्लधर्मी असल्याने आणि विशेषत: जेंव्हा तुमची त्वचा नाजूक संवेदनशील असते तेंव्हा ह्यामुळे कदाचित तुम्हाला चट्टे पडण्याची भीती असते.

तुम्ही दुसर्‍या प्रकारे पण प्रयत्न करू शकता. न गाळलेल्या आणि कच्च्या  ऍपल  सायडर व्हिनेगर चे दोन चमचे आणि एक टेबल स्पून कार्बोनेटेड न केलेले पाणी एकत्र करा. चांगले ढवळा. हे द्रावण दिवसातून दोनदा प्या. तुम्ही नाष्ट्या नंतर आणि रात्री झोपण्या अगोदर हे मिश्रण पिऊ शकता. हे रोज प्यायल्याने नक्कीच तुमच्या व्हेरिकोज व्हेन्स बऱ्या होण्यास मदत होईल. ऍपल  सायडर व्हिनेगर च्या वापराचे काही असे पण मार्ग आहेत जसे तुम्ही मास्क किंवा भिजवून वापरू शकता पण वर उल्लेखलेल्या प्रमाणे पद्धत तुम्हाला उत्कृष्ट परिणाम देतील.

ह्या व्हेरिकोज व्हेन्स शरीरावर कुठेही विकसित होऊ शकतात पण जास्त करून त्या पायाच्या खालील भागात आणि मांड्यांवर दिसून येतात. जर त्या मोठ्या झाल्या तर  त्या त्वचेवर दिसतात आणि हाताला जाणवतात पण. काही लहान व्हेरिकोज  व्हेन्स पण असतात ज्यांना स्पायडर व्हेन्स किंवा तेलन्गीक्टासियास असे म्हणतात. ह्या लहान रेषांसारख्या किंवा कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात. पण स्पर्श केल्यास हाताला जाणवत नाही. त्या साधारणतः पायांवर असतात,पण चेहर्‍यावर पण दिसतात. व्हेरिकोज व्हेन्स होण्याची करणे म्हणजे, बराच काळ पर्यंत उभे राहणे किंवा बसणे, जडपणा किंवा स्थूलपण वय, अनुवंशिकता,गरोदरपणा,हार्मोंस मध्ये बदल,काही औषधोपचार,बद्धकोष्ठता,अपुरा आहार,अयोग्य जीवनशैलीची सवय,इत्यादी. जरी ही स्थिती मोठ्या प्रमाणात आरोग्याबाबत घाबरवून  सोडण्यासारखी नसली तरी ती तुमचे आयुष्य अस्वस्थ आणि धावपळीचे बनवू शकते. घरीच उपचार करणे चांगले आहे. एकदा प्रयत्न करून बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटते ते.