केस गळतीवर  हेयर ट्रान्सप्लांट व्यतिरिक्त कांही पर्यायी उपाय योजना.  

केस गळती ही सर्व सामान्य समस्या आहे. आणि ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही भेडसावते. बर्‍याच शोधानंतर असे आढळून आले आहे की, पुष्कळ लोक टकलामुळे  बाधित असतात. आणि उरलेले लोक डाएट ,ताण तणाव, आजारपण किंवा ठराविक औषधोपचार ह्यामुळे केस गळतीला तोंड देत असतात. अशी कांही औषधे आणि औषधी द्रव्ये जी उच्च रक्तदाब ,हृदय विकार,नैराश्य, केमोथेरपी, किंवा किरणोत्सार या कॅन्सर, पाळणा लांबविण्याच्या गोळ्या अश्या आजारांवर उपचाराकरिता घेतली जातात ती सुध्दा केस गळतीचं मुख्य कारण असू शकतात.

पर्यायी उपचार पद्धती

या करिता केस गळतीच्या समस्येवर लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपचार करणे महत्त्वाचे ठरते. केस गळतीच्या समस्येवर हेयर ट्रान्सप्लांट हा एक त्यातल्या त्यात उत्तम उपाय आहे. हेयर ट्रान्सप्लांट ही अशी शस्त्रक्रिया आहे ज्यात डोक्याच्या मागील बाजूचे केसांचे फोलिकल काढून जिथे विरळ केस आहेत किंवा टक्कल आहे अशा भागावर लावतात. अखेरीस हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त परिणामकारकरीत्या नैसर्गिक रूप देते.

असे असले तरीही यशाचे परिमाण आणि केसांचे आच्छादन हे पूर्णत: ज्या भागावर उपचार केला आहे तो भाग आणि केसांच्या फोलिकलचे आयुष्य ह्यावर अवलंबून असते.

पण कांही लोक हेयर ट्रान्सप्लांट प्रक्रियेच्या ऐवजी इतर प्रक्रियेवर भर देतात, जो  उत्तम पर्यायी मार्ग असतो.

Read AlsoFace Surgery

औषधोपचार–   रोगेन आणि प्रोपेशिया हीच फक्त अशी औषधे आहेत, जी पुरुषांच्या टकलेपणावर उत्तम उपचार करतात. ही औषधे FDA प्रमाणित आहेत जी

वांशिक केस गळतीला पण कमी करतात. रोगेन हे  एक प्रचलित द्रावण आहे जे मलमासारखे वापरता येते. आणि ते स्काल्पवर जेथे आपणास जास्त केस हवे असतील तेथे तसेच चोळता येते. परंतु प्रोपेशिया ह्या पुरुषी टक्कलासारख्या नमुन्यावर उपचार करण्यासाठी गोळ्या असतात ज्या पुष्कळ तर्‍हेच्या केस गळतीवर मात करण्यास मदत करतात. पण कायमचे केस गेले असतील तर ते एकतर ट्रान्सप्लांट चा नाहीतर इतर पद्धती,जसे मायक्रोग्राफ्टिंग ,स्लीट ग्राफ्टिंग ,किंवा पंच ग्राफ्टिंग आणि स्काल्प रीड्क्सन ह्यांचा उपचार जरूर करावा.         

HAR VOKSE[नैसर्गिक रित्या केसांची वाढ ]

हा एक स्त्री पुरुषांमधील केस गळती कमी करण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांटला एक पर्याय म्हणून विकसित केला गेलेला उपचार आहे. ही प्रक्रिया यू.के.,जर्मनी, फिनलंड, स्वीडन, पोलंड, नोर्वे  आणि उत्तर अमेरिका या सारख्या देशांमध्ये खूप प्रचलित आहे. हा एक अॅंटी हेयर लॉस स्प्रे आहे जो चांगलं रिझल्ट मिळविण्यासाठी दिवसातून दोनदा केसांवर मारावा लागतो . याशिवाय उत्कृष्ट परिणाम होण्यासाठी उमेदवाराला दिवसातून दोन गोळ्या केसांच्या वाढीला पूरक म्हणून घेण्याची सूचना केली जाते. ह्या अशा उपचार पद्धती मधला उत्कृष्ट भाग म्हणजे ह्याचे काहीही गंभीर दुष्परिणाम नाहीत.

स्पायरोनोलक्टोन [Spironolactone ]

ही उपचारपद्धती विशेषत: मुले न होणार्‍या स्त्रियांसाठी आहे. कारण ह्यामध्ये दिवसातून दोनदा घेण्याच्या गोळ्यांचा डोस 50mg ते 100mg प्रमाणे बदलत राहतो. ह्या औषधात पोटॅशियम स्पेरिंग डाय -युरेटीक असते जे अन्द्रोजेनविरुद्ध काम करते. Spironolactone हे स्त्रियांसाठी केसांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी लोकप्रिय आहे.

PRP Therapy -PRP उपचार पद्धती 

ही एक केसांसाठी क्रांतीकारक उपचार योजना आहे जी स्वत:च्या रक्ताचा उपयोग करून प्लाझ्मा सेण्ट्रिफ्यूज करतात. हा सम्पृक्त प्लाझ्मा जेंव्हा स्काल्पमध्ये  टोचला  जातो, तेंव्हा तो केस वाढण्यासाठी असलेल्या केसांच्या तत्वाला उत्तेजित करतो. हल्लीच्या युगात PRP उपाय योजना त्याच्या कमीत कमी जोखि‍मेमुळे खूप लोकप्रिय होत आहे.

कमी दर्जाची लेजरची केसांवर उपाययोजना 

कमी दर्जाची लेझरची उपचार पद्धती हा अजून एक स्त्री पुरुषांच्या विशिष्ट टकले पणावर उत्तम उपचाराचा दृष्टीकोन आहे. ह्या पद्धतीत अशा कमी दर्जाच्या लेझरचा उपयोग करतात जी पुढे केसांना पुन्हा जोम देते आणि केसांचे आरोग्य जोमाने वाढविते. तरीपण ही प्रक्रिया आठवड्यातून तीनदा कमीत कमी 30 मिनिटे करावी लागते. पण ही प्रक्रिया बरीच खर्चिक असते आणि काही लोक ह्यातील संभाव्य दुष्परिणामाच्या भीतीने दुर्लक्ष करतात.

SKALP REDUCTION स्काल्प कमी करणे

 स्काल्प रिडक्शन ही अशी प्रक्रिया आहे जिच्या मध्ये केस नसलेली डोक्यावरची त्वचा काढून त्या जागी उरलेल्या डोक्यावरच्या केस असलेली त्वचा खेचून ती टक्कल असलेल्या त्वचेवर झाकून टाकतात. तरीही ह्या प्रक्रिये मध्ये फक्त अर्धाच टक्कलाचा भाग झाकला जातो. पण ही प्रक्रिया ज्यांना पुढच्या बाजूस टक्कल आहे त्यांना उपयोगी नाही.

इतर किरकोळ पर्याय

इतर पर्याय म्हणजे, केसांचा टोप घालणे [विग] ,केस गळतीवर उपयोगात आणली जाणारी पावडर टक्कल झाकण्यासाठी वापरणे. ही उत्पादने निरनिराळ्या रंगात उपलब्ध असल्याने केसांच्या नैसर्गिक रंगाशी मिळती जुळती असतात. मात्र याबरोबर लोकांनी आरोग्यदायी आहार घ्यावा आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगी बाणवली तर ती परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.