हाताच्या वरच्या भागाचे लिपोसक्शन ब्राकियोप्लास्टी इतके चांगले आहेत काय ?

तगडे आणि मजबूत हात असणे कधीही चांगले वाटते. काही दणकट खांदे, ट्रैसेप आणि बायसेप मुळे आपण आकर्षक आणि आत्मविश्वास पूर्ण दिसण्यास मदत होते. हे उघड आहे की,व्यायाम शाळेत व्यायाम करणे ,योग्य आहार आणि पळणे नेहमीच आपल्याला सगळ्यांपेक्षा उत्तम दिसण्यास मदत करतात असे नाही. त्यामुळे बरेच लोक अशा सर्जिकल पर्याय निवडण्यासाठी  आमच्या मिनीयापोलीस एरिया प्रॅक्टीस कडे येतात.

चांगले खांदे आणि ट्रैसेपला रूप आणण्यासाठी आर्म लिफ्ट सर्जरी (ब्राकियोप्लास्टी )आणि लिपोसक्शन  हे दोन्ही प्रभावी पर्याय आहेत. चला तर मग आपण ह्या सर्जरी आणि त्यांचे उपयोग ह्यांची आत्ताच तुलना करूया.

आर्म लिफ्ट सर्जरीबद्दल:-

आर्म लिफ्ट सर्जरी हि अशी प्रक्रिया आहे ज्यात खांदे आणि ट्रैसेप च्या भागावरील ढिली त्वचा काढली जाते . ह्या प्रक्रिये मध्ये साधारणतः: एक चीर पाडली जाते जी काखेच्या आतील भागातून निघून कोपरापर्यंत जाते. ह्या चीरेतून अतिरिक्त त्वचा काढली जाऊ शकते,आणि खालचा भाग समायोजित केला जातो. सर्जरी नंतर पेशंट चे हात फार सुंदर शिल्पा सारखे प्रमाणबद्ध आणि वळसेदार होतात जे ढिली, लोंबणारी त्वचा आणि स्ट्रेच मार्क पासून मुक्त असतात.

आर्म लिफ्ट सर्जरी साठी योग्य उमेदवार :-

आर्म लिफ्ट सर्जरी साठी योग्य व्यक्ती म्हणजे असे लोक ज्यांना खांद्याच्या भोवती आणि ट्रैसेप च्या बाजूला ढिल्या त्वचेची लक्षणीय समस्या असते. ह्या लोकांचे खूप वजन एकदम कमी झालेले असते, बहुधा नैसर्गिक रित्या किंवा बेरियात्रिक सर्जरी मुळे. उमेदवाराची प्रकृती चांगली असावी आणि कुठला गंभीर आजार नसावा ज्यामुळे समग्र प्रकृतीसाठी ऐन वेळी कुठली समस्या उभी राहणार नाही.

आर्म लिपोसक्शन बद्दल :-

आर्म लिपोसक्शन मध्ये खांदे आणि ट्रैसेप चे लक्ष्य केलेली चरबी काढून टाकली जाते. आर्म लिपोसक्शनच्या दरम्यान एक छोटी धातुची ट्यूब जिला कॅनूला म्हणतात, ती काखेत आणि ट्रैसेप च्या भागात घुसविली जाते.  काळजीपूर्वक रित्या आणि सावधानीने नियंत्रित शोषण उपयोगात आणून , एक प्लास्टिक सर्जन अवांछित त्वचेचे पॉकेटस् काढून टाकतो ,जे व्यायाम आणि आहार ह्याने शक्य होत नाही. आर्म लिपोसक्शन च्या मुळे अधिक मर्दानी रूप आणि प्रमाणबद्ध खांदे आणि ट्रैसेप मिळतात.

आर्म लिपोसक्शन साठी आदर्श उमेदवार-

आर्म लिपोसक्शनसाठी असे लोक आदर्श आहे जे हातावरील चरबीच्या अवांछित पॉकेटस्मुळे त्रस्त आहेत. त्यांची  प्रकृती साधारणतः चांगली असायला हवी आणि लिपोसक्शन प्रक्रियेबद्दल त्यांना माफक यथार्थ अपेक्षा असायला हव्या. जरी लिपोसक्शन स्नायूंच्या टोन मध्ये भर घालू शकत नाही तरी हे खान्द्यांच्या स्नायुंना आकर्षक दिसावे ह्यासाठी मदत करते. आणि त्यामुळे ट्रैसेप अधिक उंच दिसतील.

जेंव्हा लिपोसक्शन, आर्म लिफ्ट सर्जरी पेक्षा अधिक चांगले  होऊ शकते.

लिपोसक्शन पूर्णपणे फक्त चरबी हटवण्यासाठी आणि शिल्पी कामासारखे दंड घडवण्याच्या उद्देशाने उपयोगात आणतात. ह्याचा अर्थ असा आहे की हे त्वचा ताणणे किंवा स्ट्रेच मार्क घालवणे या पेक्षा फक्त वरील कारणांसाठी उपयुक्त आहे, जर पेशंटचे हात/दंड मऊ आहेत आणि त्वचा ढिली पडण्याबाबत काही तक्रार नसेल तर साधारणपणे लिपोसक्शन चा उपचार हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.

जेंव्हा आर्म लिफ्ट सर्जरी लिपोसक्शनपेक्षा अधिक चांगली होऊ शकते.

आर्म लिफ्ट सर्जरी ढिली त्वचा आणि लोंबणारी त्वचा ह्या बाबतीत एक चांगला पर्याय आहे. जेंव्हा लिपोसक्शन हाताच्या एका भागाला लिफ्ट करण्याच्या कमी येते तर आर्म लिफ्ट ,त्वचेची शिथिलता कमी करण्याच्या समस्यांसाठी  योग्य आहे. जास्तीचे वजन कमी करण्या साठी आर्म लिफ्ट संभाव्यत: संशोधन करून हात आणि त्याचबरोबर छाती च्या वरच्या भागातील शिथिलता सुद्धा कमी करता येते.

आपल्या गरजेप्रमाणे पुरी करून देणारी अनुकुलीत सर्जरी.

ह्यामध्ये कधीही सगळ्यांसाठी [सब घोडे बारा टक्के] एकसारखा दृष्टिकोन ठेवून सर्जरी केली जात नाही, ह्याच कारणासाठी पेशंटला, सल्ला मसलत करण्यासाठी आमच्याकडे स्वत: येऊन आमच्या प्रॅक्टीसला भेट द्यावी लागेल. आम्ही पेशंटच्या अद्वितीय मागण्या पूर्ण करण्यासाठी बनवलेली व्यक्तिगत काळजी घेऊ. अर्थात रिझल्ट पूर्णपणे अनुकुलीत असेल आणि पेशंटला ते जसे दिसतात ते पाहिल्यावर खूप आनंद होईल.

शरीराला प्रमाणबद्ध करणे आणि शिल्पी काम याबद्दल आणखी जाणून घेऊ या.

आर्म लिफ्ट सर्जरी, लिपोसक्शन आणि आपल्या जास्त बांधेसूद आणि शिल्प कामा करिता

इतर बऱ्याच पर्यायांसाठी आमच्या कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी सेंटर ला जरूर संपर्क करा. आमची टीम आपल्या समग्र रूपाला डौलदार करण्यास आपला साथ देतील.