केशारोपण म्हणजे काय ?

केशारोपण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यांमध्ये त्वचारोगतज्ञ सर्जन डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर केसांचे रोपण करतात. सर्जन बहुधा डोक्याच्या मागील भागाचे किंवा दोन्ही बाजूंचे केस काढून, डोक्याच्या समोरील किंवा वरच भाग जेथे अजिबात केस नसलेल्या किंवा विरळ आहेत अशा ठिकाणी रोपण करून तो भाग भरून काढतात. अमेरिकेमध्ये डॉक्टर्स 1950 सालापासून केशारोपणाची प्रक्रिया करीत आहेत.असे असले तरीही गेल्या काही वर्षात हे तंत्र खूपच प्रगत झाले आहे. केशारोपण प्रक्रिया विशेष करून लोकल अनास्थेशिया भूल देऊन केली जाते. आणि ती दोन प्रकारे केली जाते. 1] स्लीट ग्राफ्ट आणि 2] मायक्रो ग्राफ्ट . स्लीट ग्राफ्ट मध्ये प्रती ग्राफ्ट 4 ते 10 केस असतात. तर मायको ग्राफ्ट मध्ये प्रती ग्राफ्ट 1 ते 2 केस असतात जे टक्कलाच्या जे टकलाच्या आकारमानावर अवलंबून असतात.

केशारोपण कोणासाठी योग्य आहे?

केशारोपणामुळे रुग्णाचे स्वरूप निर्विवादपणे सुधारते आणि त्याचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. जे लोक नमुन्याच्या [पॅटर्न] टकलानी बाधित आहेत आणि ज्यांच्यात केस विरळ होत असल्याची लक्षणे आहेत असे उमेदवार प्रक्रियेसाठी उत्तम समजले जातात. उमेदवार शरीरिकदृष्ट्या पुर्णपणे तंदूरस्त असायला हवेत आणि त्यांची प्रकृती गंभीर क्लिष्ट दुखण्यापासून मुक्त हवी.

केशारोपण हा पर्याय खाली दिलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय नाही.

 • संपूर्ण स्कल्प वर विस्तृत नमुन्याचा केसांचा -हास.
 • त्वचेवरच्या डोनर भागावर केसांची कमतरता.
 • शस्त्रक्रिया किंवा जखमांनी निमण झालेले केलोइड व्रण.
 • केमोथेरपीमुळे नष्ट झालेले केस.

केशारोपण प्रक्रिया

प्रक्रिया सुरू करण्याच्या पूर्वी स्काल्प पुर्णपणे स्वच्छ केला जातो. आणि ज्या जागी उपचार करायचे आहेत ती जागा सर्जन एका छोट्या सुई ने लोकल भूल देऊन बधिर करतात. नंतर स्कालपेलच्या  सहायाने केस असलेल्या स्काल्प च हिस्सा काढला जातो.

पुढे,स्काल्प वरुण कापलेल्या तुकड्याचे सर्जन सूक्ष्मदर्शक दर्शक भिगाखाली बघून धारदार सूरीच्या सहायाने लहान लहान भाग करतो. हे केसांचे पट्टे जेव्हा रिसिपंट क्षेत्रात रोपण केले जातात,तेव्हा जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूप प्राप्त होण्यास मदत होते.

नंतर सर्जन स्काल्पवर ब्लेड किंवा सुईने अगदी बारीक भोके पाडतो जेथे केसांचे ग्राफ्ट हळुवारपणे बसविले जातात. उपचाराच्या एका सत्रात शेकडो किंवा हजारो केस असतात.केसांच्या पुनर्स्थापनेच्या एका प्रक्रियेला 4 किंवा त्यापेक्षा अधिक तास लागतात.

प्रक्रिये नंतर स्काल्पचा उपचार केलेल्या भाग काही दिवसांसाठी मलमपट्टी करून झाकतात. अंतिमत: 10 दिवसानी टके काढतात. डोके समुर्णपणे निरोगी केसांनी भरण्यासाठी एकापेक्षा अनेक सत्रांची आवश्यकता असते.

रोगमुक्तता

सर्जरी नंतर रुग्णांना उपचार केलेल्या भागात हळूहळू जाणवते. त्यांना बर्‍याच दिवसांसाठी वेदनाशामक औषधे दिली जातात. स्काल्प वरची मलमपट्टी कमीत कमी 1ते 2 दिवस ठेवतात. लवकर बरे होण्यासाठी सर्जन ने लिहून दिलेली अनटिबायोटिक्स किंवा अॅंटीइन्फलमेटरी औषधे घेतलीच पाहिजेत असे जारी असले टरी बहुमतांशी लोक सर्जरीनंतर 2 ते 5 दिवसात कामावर रुजू होतात.प्रक्रियेनंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोपण केलेले केस गळून पडतात.थोड्याच महिन्यात नवीन केसांची वाढ सुरू होते. बहुमतांशी लोकांमध्ये असे दिसून येते की,सर्जरीच्या प्रक्रियेनंतर 6 ते 9 महिन्यात 60 टक्के नवीन केसांची वाढ होते.

दुष्परिणाम

केशारोपणाचे दुष्परिणाम सर्व साधारणपणे किरकोळ असतात. आणि काही आठवड्यांनी नाहीसे होतात.

तरीसुद्धा शक्यता असलेले दुष्परिणाम असे आहेत:

 • रक्तस्त्राव आणि जंतुसंसर्ग
 • स्काल्प सुजणे
 • डोळ्याभोवती जखमा
 • ज्या ठिकाणातून केस काढले किंवा ज्या ठिकाणी रोपण केले तेथे पोपडे निर्माण होणे.
 • स्काल्पवर उपचार केलेल्या ठिकाणी संवेदनेचा अभाव
 • स्काल्पवर खाज उठल्याची संवेदना होणे
 • रोपण केलेल्या जागी दाह होणे किंवा जंतुसंसर्ग होणे
 • अनैसर्गिक किंवा नको असलेले केस उगविणे

जर केशारोपण अयशस्वी ठरले तर काय?

केशारोपण अयशस्वी होणे हे अतिशय क्वचितच होऊ शकते. आणि विशेषत: जेव्हा रुग्ण, सर्जनने दिलेल्या सर्जरीच्या अगोदरची आणि नंतरची काळजी घेण्याबद्दलच्या सूचनांचे पालन करतात तेंव्हा मुळीच नाही. प्रत्यक्ष प्रक्रियेतून जाताना येणार्‍या अपयशाचे सगळ्यात सामान्य कारण म्हणजे एखादे फोलीक्युलर यूनिट ग्राफ्ट उपचार न करता फार वेळ शरीराबाहेर ठेवल्याने सुकणे किवा खराब होणे . म्हणून ज्या केसेस केशारोपणात मध्ये अपयश येते त्यात पहिली पायरी अपयशाचे कारण शोधणे होय. आणि त्यानंतर तब्येतीवर उपचार करणे. अशा परिस्थितीत सर्जनचा सल्ला घेतलाच पाहीजे. आणि त्या वर अचूक उपचार केले पाहिजेत .केशारोपणाच्या प्रक्रियेत संभाव्य अपयश टाळण्यासाठी अनुभवी सर्जनची निवड करणेअतिशय महत्वाचे असते.