वृद्धी करून घेण्यास कोण योग्य व्यक्ती आहे?

थोड्याच दिवसांपूर्वी नामवंत व्यक्ती केली जेंनर हिने ओठांमध्ये भर घालण्याची प्रक्रिया करून घेतली आणि जाड ओठाचा पायंडा पाडला. कदाचित तिला पाहिल्यावर आणि जाड ओठांची आणि बदकासारख्या ओठांची सोशल मीडियात झालेल्या  लोकप्रियतेमुळे ओठात इंजेक्शन घेण्याचा पायंडा पडला. ओठांवर इंजेक्शन हा ओठ जलद विकसित होण्याचा पर्याय आहे आणि तो 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस टिकतो. हे १८ ते ८० वर्षांच्या बायकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि कोणाचेही रुप भरलेल्या ओठाने अजूनच खुलून दिसते.

ह्या ओठात भर घालण्याच्या प्रक्रिया ज्यांना नवीन आहे असे बरेच अननुभवी लोक असा विचार करतात की ओठ भर घातल्याने ते अनैसर्गिक दिसतील. त्याकरिता हे इंजेक्शन देण्यास एखादा चांगला डॉक्टर किंवा नर्स निवडा आणि ते तुम्हाला समजावून सांगतील की ओठांना बदलणे हे ओठांच्या  आकाराच्या पुनरुज्जीवनासारखे असते आणि ते काळजीपूर्वक रित्या तुमच्या ओठांच्या नैसर्गिक आकारावर भर देतील. ते तुमच्या सौंदर्याचा समतोल कायम ठेवतील.

जर तुमचे ओठ नैसर्गिकरित्या पातळ असतील तर तुम्ही ओठाच्या इंजेक्शन साठी योग्य आहात. कांही व्यक्तींचे अगोदरच सुंदर रसरशीत ओठ असतात आणि काही लोकांचे  जन्मत:च नैसर्गिक पातळ ओठ असतात. पण काही लोकांच्या ओठांचा आकार सामन्यात: नैसर्गिक वृद्धावस्थेमुळे बिघडतो. जसे जसे तुमचे वय वाढते, तुमचे ओठ आकुंचन पावायला लागतात. आणि तोंड बारीक होते. आणि ओठांच्या वर आणि खाली ‘स्मोकर च्या रेषांसारख्या’ रेषा उमटतात. सुदैवाने कुठल्या कारणाने का होईना ओठात भर टाकणे किंवा ओठात इंजेक्शन देणे ह्या गोष्टीने तुम्हाला  रसरशीत ओठ मिळण्यास मदत होते. लिप इंजेक्शन ओठातल्या  आकारातील कमतरतेवर सापेक्षतेने जलद इलाज करते आणि ते सुद्धा ओठाचे कार्य बंद न पडता.

तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही बिनधास्त लिप इंजेक्शन घेऊ शकता. जर तुम्हाला काही आरोग्याविषयी समस्या असतील किंवा तुम्ही कुठला औषधोपचार घेत आहात, किंवा तुम्हाला कशाची अलर्जी असेल तर हे तुमच्या डॉक्टर च्या लक्षात आणून दिले पाहिजे.

तुम्हाला बाजारात  उपलब्ध असतील त्या सर्व पर्यायांची माहिती असायला हवी. Hyaluronic Acid च्या शिवाय रसरशीत ओठांसाठी इतर पण पर्याय आहेत. लिप इंजेक्शन साठी   Juvéderm, Restylane  अणि इतर हे Hyaluronic Acidचे  सगळ्यात सामान्य पर्याय आहेत जे बराच काळ टिकतात. ह्याशिवाय तुमच्या विशिष्ट आवडीनुसार इतर पर्याय पण तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ह्यापैकी एक कोलाजेन इंजेक्शन आहे, पण कोलाजेन इंजेक्शन साठी तुम्हाला ऍलर्जीची चार आठवड्यांची तपासणी करून घ्यावी लागेल कारण ते इंजेक्शन गुरांच्या चामड्यापासून केलेल्या अर्काचे असते. तुम्ही मेद बदल पण करून घेऊ शकता ज्यामध्ये शरीराच्या एखाद्या भागातून मेद कापून काढून तुमच्या ओठात घुसविले जाते.

पण मेद बदल हे तात्पुरते असते कारण तुमचे शरीर ते मेद शोषून घेते. मेद बदल किंवा ओठांमध्ये मेदाची पेरणी ज्या खूप ओठांच्या बाबतीत हस्तक्षेप करणाऱ्या असतात, त्या पण बराच काळ टिकतात. बरेच पेशंट ओठांतील कमी कटकट असलेल्या इंजेक्शनचे उत्तम परिणाम बघून सर्जिकल ओष्ठ वृद्धी करवून घेतात. ओठांमध्ये पेरणीच्या बाबतीत चांगली गोष्ट हि आहे की, हि उत्पादने सामान्यपणे Hyaluronic Acid वर  आधारित असतात जसे Belotero जे ओठांच्या टिश्यू मध्ये इंजेक्शन दिल्याबरोबर मिसळतात आणि थोड्याच वेळात सहजपणे ओठांच्या टिश्यू मध्ये शोषली जातात. आणि त्याचबरोबर खरे म्हणजे ते नवीन कोलाजेन बनविण्यास पण मदत करतात. इतके सगळे पर्याय उपलब्ध असले तरी तुमची गरज काय आहे ते ठरवून एखादी प्रक्रिया आणि भर घालायचा घटक नीट निवडला आहे याची खातरजमा करून घ्या.

तुमच्या ह्या प्रक्रियेकडून वास्तववादी अपेक्षा असल्या पाहिजेत. तुम्ही डॉक्टरांच्या आधीच्या  पेशंटचे ‘आधी’ आणि ‘नंतर’ हे फोटो/चित्रे बघा. तुम्हाला ह्याची काय किमत आहे हे माहित असायला हवे आणि ह्याचा परिणाम किती दिवस टिकतो हे आणि उपचार घेतल्यास शक्यतो काय दुष्परिणाम होतात हे अपेक्षित करून ठेवावयास हवे.

जेंव्हा तुम्ही ओठात इंजेक्शन घेण्यास जाता तेंव्हा डॉक्टर तुमच्या ओठांमध्ये Hyaluronic Acid ची जेल घालतात. हि जेल मृदु टिश्यू आणि मेद जे नैसर्गिक वयोमानाप्रमाणे नाहीसे झालेले आहेत त्यांची जागा घेतात. ह्या प्रक्रियेत ते तुमच्या ओठांना फुगीरपणा देतात. बरेच लोक जेंव्हा नियतकालिकामध्ये ख्यातनाम व्यक्तींचे मोठे आणि जरा जास्तच जाड ओठांचे चित्र पाहतात तेंव्हा ते हुरळून जातात पण कधी कधी कांही लोकांना ओठाच्या इंजेक्शन पूर्ण झाल्यावर विरुद्ध अनुभव येतो. काही आरोग्य स्थिती तुम्हाला ओठांना बदलण्यासाठी चांगला पेशंट बनू देत नाही जसे डायबिटिस. हे इंजेक्शन तुमच्या शरीराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते. तोंडाचा विषाणूंमुळे होणारा किंवा साधा हर्पिस [जुनाट सर्दीचे पुरळ] नावाचा रोग पण तुमच्या ओठांच्या बदलावर वाईट परिणाम घडवते. तेंव्हा सर्जरी करण्या आधी तुमच्या डॉक्टर कडून संभाव्य अनर्थ आणि दुष्परिणाम ह्याबद्दल आधीच माहिती करून घ्या.